TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
महाराष्ट्र बिझनेस

28 Mar 2020, 16:00

Open in Telegram Share Report

*देशभर पसारा असणाऱ्या कंपन्यांना सर्वच ठिकाणी एकच किंमत ठेवणे कसे जमते?*

तुम्ही जर PAN MAHARASHTRA किंवा PAN INDIA (PAN stands for Presence Across Nation) तुमचे प्रोडक्ट मार्केट करण्याचा विचार करत असाल तर प्रोडक्ट च्या किमतीवर कंट्रोल कसा ठेवला जातो. उदाहरणार्थ कोलगेट चे उदाहरण – कोलगेट टूथपेस्ट चे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅंट गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेश मध्ये आहेत म्हणून या राज्यात दहा रुपयांची कोलगेट दहा रुपयांना आणि बाकी राज्यात जास्त किमतीला मिळते असं नाही. ती पेस्ट संपूर्ण भारताच्या रिटेल मध्ये दहाच रुपयांना मिळते. किंमत एकच असल्याने जाहिरातींमधून एक नेशन वाईड ब्रँड ची इमेज कोलगेट ची तयार होते, कंपनीला ऑफर्स आणि डिस्काउंट ठरवणे सोपे होते. बारा महिने सगळी कडे किंमत सारखी ठेवण्यामागे कंपनीचे संपूर्ण भारत भर स्टोकिस्ट जे मजबूत जाळे आहे हे सहज कळते.

तुम्ही जर महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून फिजिकल प्रोडक्ट मार्केट करण्याचा विचार करत असाल तर जास्त खप असलेल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी थोडे थोडे प्रोडक्ट स्टोक करा आणि लॉजिस्टिक चा खर्च कसा कमी करता येईल हे प्रामुख्याने पहा.

देशभर वा जगभर पसारा असणाऱ्या मोठ्या कंपन्यांना संपूर्ण देशात व जगभरात माल पोचवत असताना किमतीचे नियोजन कसे जमते. सर्वच ठिकाणी एकच किंमत ठेवणे कसे जमते? डिस्ट्रिब्युशन कसे जमते? हा प्रश्न खूप जणांना पडतो. बऱ्याचदा नवउद्योजकांना अनुभव नसल्यामुळे हा प्रश्न सतावत असतोच. यामुळे सुरुवातीच्या काळात आपल्या उत्पादनाची किंमत ठरवताना थोडा गोंधळ उडतो.

पण या प्रश्नच उत्तर खूप मोठं किंवा किचकट नाही!

प्रोडक्शन कॉस्ट संबंधी

१. कंपन्यांचा प्रोडक्ट चा दर देशभरात सारखाच असू शकतो. परंतु बाहेर देशात तोच दर असेल असे नाही.

२. देशभरात एकच प्रोडक्शन कॉस्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ते प्रोडक्ट बाहेर देशात पाठवताना ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते, तसेच स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्यानुसार बाहेर देशात किमतीत बदल होतो.

३. सामान्यपणे प्रोडक्शन कॉस्ट हि एकेका प्रोडक्ट वर काढत नाहीत, सगळे उत्पादन मिळून मग एकेका प्रोडक्ट ची सरासरी प्रोडक्शन कॉस्ट काढली जाते. एक प्रोडक्ट बनवायलाच खूप दिवस लागत असतील तरच फक्त प्रोडक्ट नुसार प्रोडक्शन कॉस्ट पहिली जाते.

किंमत एकंच ठेवण्यासाठी काय करतात?

१. काही कंपन्या सर्व उत्पादने एकाच प्लांट मध्ये बनवतात. आणि देशभरात ठराविक ठिकाणी गोडाऊन बनवतात, आणि या गोडाऊन अंतर्गत स्टॉकीस्ट डिस्ट्रिब्युटर्स नेमतात. या गोडाऊन मधे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर माल जमा केला जातो. मोठ्या प्रमाणावर माल एकाच वेळी वाहतूक केल्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट बरीच कमी होते. हि ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट मधे आधीच गृहीत धरलेली असते.

२. काही कंपन्या देशभरात आपले प्लांट उभे करतात. प्रत्येक प्लांट अंतर्गत गोडाऊन असतात. आणि या गोडाऊनच्या मार्फत स्थानिक स्टॉकीस्ट व डिस्ट्रिब्युटर असतात.

३. काही कंपन्या देशभरातील इतर कंपन्यांना आपले व्हेंडर्स नेमतात. या व्हेंडर्स कडून या कंपन्या आपले प्रोडक्ट बनवून घेतात. आणि आपल्या स्थानिक डिस्ट्रिब्युशन चैन कडून वितरण करतात.

४. काही कंपन्या आपल्या एकाच प्लांट मध्ये उत्पादन घेतात. आणि आपल्या खाली स्टॉकीस्ट नियुक्त करतात. हे स्टॉकीस्ट बऱ्याचदा राज्यस्तरावर असतात. यांच्या अंतर्गत वितरण व्यवस्था काम करते.

५. उत्पादनाचा खर्च सरासरी पकडला जातो. म्हणजे जर आपण एखादी वस्तू बनवत असू, तिचा उत्पादन खर्च १०० रुपये आहे. आत अति वस्तू स्थानिक बाजारात विकताना अतिरिक्त खर्च नाही, पण बाहेर ठिकाणी पाठवताना ट्रान्सपोर्ट खर्च वाढणार असतो. मग अशावेळी सरासरी खर्च पकडला जातो आणि तो सर्व प्रोडक्ट साठी गृहीत धरला जातो. हा खर्च पकडून मग त्यावर नफा धरून किंमत ठरविली जाते.

६. काही प्रकारात प्रोडक्ट ची किंमत कमी जास्त होऊ शकते. काही उत्पादक स्थानिक मार्केटमधे ट्रान्सपोर्ट कॉस्ट येत नाही म्हणून स्वस्त विकतात, आणि बाहेर ठिकाणी ट्रान्सपोर्ट कॉस्ट अतिरिक्त वाढवून किंमत ठरवतात. पण याचे प्रमाण कमी आहे.

हे सर्व मार्ग प्रोडक्ट वा इंडस्ट्री नुसार ठरवावे लागतात.

सामान्यपणे प्रोडक्शन कॉस्ट काढताना शेवट पर्यंतचा खर्च पकडला जातो. एकेक प्रोडक्ट च्या नफ्याचा हिशोब केला जात नाही. एकूण उत्पादन खर्च किती, त्यानुसार प्रोडक्ट कॉस्ट किती, आणि त्यावर नफा किती असा हिशोब करतात. कमीत कमी किती नफा कमवायचा याचा आकडा ठरवून घेतला जातो.

MRP वर डीलर ना सगळीकडे शक्यतो सारखाच नफा दिला जातो. त्यात कमी जास्त केले जात नाही. राहिलेल्या किमतीत आपल्या उत्पादनाचा खर्च आणि आपला नफा याचे गणित सुळावले जाते.

वर सांगितलेल्या वेगवेगळ्या मार्गांनी कंपन्या आपली वितरण व्यवस्था मॅनेज करत असतात. अशावेळी ट्रान्सपोर्ट मध्ये जास्तीत जास्त १% चा फरक पडतो, यापेक्षा जास्त नाही. वाहतूक खर्चाचा एकूण प्रोडक्शन खर्चामध

707 0 0
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot