#पोलीस म्हणजे………
पोलीस म्हणजे फीरता वारा
पोलीस म्हणजे वाहता झरा।
पोलीस म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।
पोलीस अंगावरील शहारा
पोलीस रात्रीचा पहारा।
फक्त पोलीसच आहे
सुख अन दु:खाचा सहारा।।
पोलीस जन हिताचा नारा
पोलीस आहे अनमोल हिरा।
पोलीस म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।
पोलीस म्हणजे धाक दरारा
त्याचाच आहे वचक सारा।
काहीही करु शकतो पोलीस
जर असेल तो नितीनं खरा।।
पोलीसावर प्रेम करुन पहा
एकदा तरी पोलीसावर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।
जीवाला जीव देईल तुमच्या
त्याचा हात धरुन पहा।
त्याचं नाव काळजावर
एकदातरी कोरुन पहा।।
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा।
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा।।
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।
एकदा तरी पोलीसावर
प्रेम करुन पहा।
तो रोज मरतो तुम्ही
एकदातरी मरुन पहा।।
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
पोलीसाच्या यातना सोसुन पहा।।
एकदा तरी पोलीसावर
तुम्ही प्रेम करुन पहा…
महाराष्ट्र पोलीस
@BhushanSirMotivation
पोलीस म्हणजे फीरता वारा
पोलीस म्हणजे वाहता झरा।
पोलीस म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।
पोलीस अंगावरील शहारा
पोलीस रात्रीचा पहारा।
फक्त पोलीसच आहे
सुख अन दु:खाचा सहारा।।
पोलीस जन हिताचा नारा
पोलीस आहे अनमोल हिरा।
पोलीस म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।
पोलीस म्हणजे धाक दरारा
त्याचाच आहे वचक सारा।
काहीही करु शकतो पोलीस
जर असेल तो नितीनं खरा।।
पोलीसावर प्रेम करुन पहा
एकदा तरी पोलीसावर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।
जीवाला जीव देईल तुमच्या
त्याचा हात धरुन पहा।
त्याचं नाव काळजावर
एकदातरी कोरुन पहा।।
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा।
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा।।
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।
एकदा तरी पोलीसावर
प्रेम करुन पहा।
तो रोज मरतो तुम्ही
एकदातरी मरुन पहा।।
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
पोलीसाच्या यातना सोसुन पहा।।
एकदा तरी पोलीसावर
तुम्ही प्रेम करुन पहा…
महाराष्ट्र पोलीस
@BhushanSirMotivation