मराठी व्याकरण (Official)™


Channel's geo and language: India, Hindi
Category: Quotes


★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट
➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 40 सराव प्रश्न
💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ अत्यंत महत्वाचे 60,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Quotes
Statistics
Posts filter


पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : उचलली जीभ लावली टाळ्याला.
Poll
  •   (1) अविचाराने भलते बोलणे
  •   (2) गोड बोलणे
  •   (3) कधीतरी बोलणे
  •   (4) बडबड करणे
301 votes


पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : हातात कंकण बांधणे.
Poll
  •   (1) हातात पैसा येणे
  •   (2) पिच्छा पुरविणे
  •   (3) बंधन घालणे
  •   (4) नशीबाला दोष देणे
297 votes


पुढील म्हणीचा अर्थ ओळखा: केसाने गळा कापणे.
Poll
  •   (1) अपमान करणे
  •   (2) नाश करणे
  •   (3) आत्महत्या करण्यास भाग पाडणे
  •   (4) विश्वासघात करणे
278 votes


बहुव्रीही समासाचे अचूक विग्रह असलेले उदाहरण कोणते? a) सत्यव्रत -सत्य हेच व्रत. b) सत्यव्रत -सत्य हेच व्रत ज्याचे तो. c)सत्यव्रत- सत्य असलेले ते व्रत. d) सत्यव्रत - सत्य असे व्रत.
Poll
  •   (1) केवळ (a) आणि (d) बरोबर
  •   (2) केवळ (b) आणि (c) बरोबर
  •   (3) केवळ (b) बरोबर
  •   (4) केवळ (d) बरोबर
215 votes


'चुलतसासरा' यातील समास ओळखा. a) कर्मधारय समास b) मध्यमपदलोपी समास c) अव्ययीभाव समास d) तत्पुरूष समास पर्यायी उत्तरे :
Poll
  •   (1) फक्त (a) आणि (b) बरोबर
  •   2) फक्त (b) बरोबर
  •   (3) फक्त (a) आणि (c) बरोबर
  •   (4) फक्त (d) बरोबर
225 votes


'तोंडी लावणे' या शब्दाचा समास ओळखा.
Poll
  •   (1) उपपद तत्पुरूष समास
  •   (2) अलुक् तत्पुरूष समास
  •   (3) नञ् तत्पुरूष समास
  •   (4) कर्मकर्तरी प्रयोग
262 votes


बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.
Poll
  •   (1) चक्रपाणि, अनंत
  •   (2) रामलक्ष्मण, पापपुण्य
  •   (3) यथाशक्ती, दरदिवस
  •   (4) राजवाडा, रक्तचंदन
259 votes


'आजन्म' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
Poll
  •   (1) अलुक तत्पुरूष समास
  •   (2) कर्मधारय समास
  •   (3) अव्ययीभाव समास
  •   (4) द्विगु समास
257 votes


खालील वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. राधिका केर काढते.
Poll
  •   (1) राधिकेने केरास काढले.
  •   (2) राधिकेने केर काढला.
  •   (3) राधिकेकडून केर काढला.
  •   (4) राधिकेकडून केरास काढवले गेले.
245 votes


📚 शब्दसमूहाबद्दल एक शब्द 📚

१)अविस्मरणीय - कायमचे लक्षात राहणारे

२)उत्क्रांती - कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल

३)क्रांती- कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल

४)दंतकथा - तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट

५) भाकडकथा - निरर्थक सांगितलेल्या गोष्टी

६) हरिकथा - विष्णूंच्या कथा

७)मिनाक्षी - माशासारखे डोळे असणारी

८) मृगाक्षी - हरिणासारखे डोळे असणारी

९) डोळस - डोळयांनी पहावयास समर्थ

१०)मदिराक्षी -जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहे अशी


मध्यमपदलोपी समासाची उदाहरणे ओळखा.
Poll
  •   (1) आईवडील, कौरवपांडव
  •   (2) चहापाणी, भाजीपाला
  •   (3) बरेवाईट, खरेखोटे
  •   (4) बटाटेभात, पुरणपोळी
3417 votes


खाली दिलेल्या विधानातून बरोबर असणाऱ्या विधानाचा योग्य पर्याय लिहा.
Poll
  •   (1) विशेषण = वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द.
  •   (2) समास = दोन किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया.
  •   (3) उद्देश्य = नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द.
  •   (4) प्रयोग = सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याची क्रिया
2632 votes


'पालथ्या घड्यावर पाणी' या म्हणीतून काय सुचविले जाते ?
Poll
  •   (1) मोठे नुकसान झाले .
  •   (2) केलेले प्रयत्न वाया गेले.
  •   (3) योग्य वेळी फायदा मिळवता आला नाही.
  •   (4) दुर्दैव ओढवले.
2768 votes


समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो, त्यावरून तत्पुरूष समासाचे प्रकार पडतात. खालील चतुर्थी तत्पुरूष समासाच्या प्रकाराचे उदाहरण अचूक सांगा.
Poll
  •   (1) वादग्रस्त - वादाने ग्रस्त
  •   (2) स्वर्गप्राप्त - स्वर्गाला प्राप्त
  •   (3) डोईजड - डोईला जड
  •   (4) भक्तिवश - भक्तिने वश
2332 votes


ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता ?
Poll
  •   (1) उपपदतत्पुरूष
  •   (2) षष्ठी तत्पुरूष
  •   (3) चतुर्थी तत्पुरूष
  •   (4) व्याधिकरण तत्पुरूष
2474 votes


'पार्वतीने नीलकंठास वरले' यातील समास ओळखा. (a) बहुव्रीही समास (b) द्वंद्व समास (c) तत्पुरुष समास (d) अव्ययीभाव समास पर्यायी उत्तरे :
Poll
  •   (1) फक्त (a) आणि (b) दोन्ही बरोबर
  •   (2) फक्त (a) बरोबर
  •   (3) फक्त (c) आणि (d) बरोबर
  •   (4) फक्त (d) बरोबर
2321 votes


दोन शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय, शब्दयोगी अव्यय किंवा इतर शब्द गाळून त्यांचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो. त्या शब्दाला काय म्हणतात ?
Poll
  •   (1) साधित शब्द
  •   (2) सामासिक शब्द
  •   (3) अभ्यस्त शब्द
  •   (4) पूर्णाभ्यस्त शब्द
2190 votes


. 📚 वाक्प्रचार 📚

१)अकलेचा कांदा असणे -बेअकली असणे.

२)अकलेचे तारे तोडणे -अविचाराने बडबड करणे.

३)अकरावा रुद्र असणे -अतिशय तापट असणे.

४)अग्निदिव्य करणे -कठीण कसोटीतून पार पाडणे

५)अघळपघळ भाषण करणे -पुष्कळसे आणि मन मोकळे करून बोलणे.

६)अडीच कांड्यावर येणे - वयात येणे.

७)अति खाणे मसणात जाणे-आधाशीपणे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होत असतात कधी कधी मरणही ओढवते.

८)अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे -थोडीशी संपत्ती किंवा थोडेसे गुण प्राप्त झाले की गर्व करणे.

९)अर्ध्या वचनात असणे -उत्सुकतेने दुसऱ्यांचे शब्द झेलणे.

१०)अधःपतन होणे - विनाश होणे.


'आपली पाठ आपल्याला दिसत नाही.' या म्हणीची समानार्थी म्हण-
Poll
  •   (1) दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.
  •   (2) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
  •   (3) आपला हात जगन्नाथ.
  •   (4) एका हाताने टाळी वाजत नाही.
4441 votes


गटाबाहेरचा शब्द कोणता ?
Poll
  •   (1) अपुरा
  •   (2) नास्तिक
  •   (3) बेडर
  •   (4) जलद
4507 votes

20 last posts shown.

76 779

subscribers
Channel statistics