TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
कृषिक अँप Krushik app

20 Mar 2020, 15:33

Open in Telegram Share Report

*आजचा कृषी सल्ला*
*केळी*🍌
पाण्याच्या बाबतीत केळी पीक अत्यंत संवेदनशील असते. एकूण पीक कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची आवश्‍यकता असते. मृगबागेस दररोज ठिबक सिंचन पद्धतीने मार्च महिन्यात १६ ते १८ लिटर, एप्रिल महिन्यात १८ ते २० लिटर आणि मे महिन्यात २० ते २२ लिटर पाणी प्रति झाड देण्याची आवश्यकता आहे. कांदेबागेस या तीन महिन्यांमध्ये दररोज प्रति झाडांस १० ते १४ लिटर पाणी द्यावे. घड निसवण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या मृग बागेस हजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया आणि ७ किलो म्युरेट ऑफ पोटॉश द्यावे. तर मुख्य वाढीच्या अवस्थेतील कांदेबागेस १३ किलो युरिया आणि ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला ठिबक सिंचनद्वारे द्यावे. व्यवस्थित पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पीक सशक्त राहते आणि त्याच्या प्रतिकार क्षमतेत वाढ होते.
*संत्रा-मोसंबी-लिंबू*🍊🍋
झाडावरील फांद्या कापणीनंतर कात्री किंवा सिकेटर सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणात (१ ते २ टक्के) बुडवून निर्जंतुकीकरण करावे. झाडांच्या बुंध्यावर ब्रशने ६० सें.मी. उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी. बोर्डोपेस्ट बनविण्यासाठी मोरचूद १ किलो ५ लिटर पाण्यात एका बादलीत तसेच चुना १ किलो ५ लिटर पाण्यात दुसऱ्या बादलीत रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे घटक एकत्र करून बारा तासांमध्ये पेस्ट लावावी.
*आंबा*🥭
उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट १ टक्के (म्हणजेच १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणे फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना करावी. फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना फळगळ कमी करण्यासाठी, फळाचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळांसाठी, फळामधील साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. हापूस आंबा फळाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी ५५ टक्के तीव्रतेचे गोमूत्र द्रावण फळे वाटाण्याचा आकाराची असल्यापासून पुढे आठवड्याच्या अंतराने उपलब्धतेनुसार ३ ते ६ वेळा फवारावे.
*आता मिळवा मोफत कृषि सल्ला, कृषि मार्गदर्शन,व गाव पातळीवरील हवामान अंदाज फक्त कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे "कृषिक अॅप" वर तर आत्ताच डाऊनलोड करा*📲📲
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&h
Krushik/कृषिक - Apps on Google Play
Raintree Computing Pvt. Ltd. in association with Agricultural Development Trust (ADT), Baramati has developed "Krushik app” for farmers which includes below mentioned features: Weather forecast: Next 15 days village level weather forecast. Agro-advisory: Crop advisory (Kharif, Rabi, Fruits, Vegetab...

230 0 0
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot