र्क तुटल्याने पुढे काय झालं? ह्याचा शोध अजुन इसरो घेते आहे.
विक्रम चा कॉम्प्युटर अश्या सर्व गोष्टींना हाताळण्यासाठी बनवला गेला होता. अश्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी निर्माण झाल्यावर पृथ्वीवरून कमांड ची वाट न बघता निर्णय घेण्याची क्षमता त्याला ह्यासाठीच देण्यात आली होती. त्यामुळे संपर्क तुटला तरी विक्रम ल्यांडर ला एकहाती चंद्राच्या जमिनीवर उतरवण्याची त्याची क्षमता होती. ह्या क्षमतेमुळेच विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमिनीवर आदळलं असं इसरो ने म्हंटलेलं नाही. कदाचित विक्रम ल्यांडर ने त्याला चंद्रावर उतरवलं ही असेल. रोव्हर प्रग्यान आता चंद्राच्या जमिनीवर विहार ही करायला लागलं असेल कारण ह्या सगळ्या प्रक्रिया पुर्ण करण्यास विक्रम वरील कॉम्प्युटर पूर्णतः सक्षम बनवला गेला होता. पण प्रग्यान रोव्हर वर पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा नाही. ते विक्रम ल्यांडर च्या माध्यमातुन पृथ्वीशी संपर्क करणार होतं. ह्या सगळ्यामुळे जोवर विक्रम रोव्हर चा ठावठिकाणा लागत नाही तोवर नक्की काय घडलं ह्या बद्दल इसरो ही उत्तर देऊ शकणार नाही. (विनीत वर्तक ©)
आता इसरो सगळ्या घटना पुन्हा एकदा तपासुन नक्की काय घडलं तसेच आपल्या ऑर्बिटर च्या माध्यमातुन इतर देशांच्या माध्यमातुन विक्रम चा शोध घेतल्यावर नक्की काय घडलं हे सांगु शकेल. काल शेवटच्या क्षणापर्यंत अगदी व्यवस्थित असलेल्या संपर्क यंत्रणेने अश्या मोक्याच्या क्षणी दगा देणं इसरो च्या वैज्ञानिकांच्या मनात शंकेची पाल नक्कीच उत्पन्न केली आहे. कारण अचानक ठिपक्याने आपला रास्ता सोडुन सरळ खाली येणं व त्या नंतर संपर्क तुटणं हे नक्कीच आशादायी चित्र नव्हतं. पण काही झालं तरी आपण इथवर पोहचलो हे काही कमी नाही.
मला इकडे नक्कीच भारताच्या पंतप्रधानांचा आदर वाटतो ज्या पद्धतीने काल त्यांनी वैज्ञानिकांच्या पाठीवर थोपटलं तो आधार आणि आश्वासक हात त्या १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करतं होता. त्यात एक जाबदारीची जाणीव होती. अपयशाच्या ह्या क्षणी हे सगळे १३० कोटी भारतीय तुमच्या पाठीशी आहेत हा विश्वास त्यांनी त्या क्षणी सगळ्या वैज्ञानिकांना आणि स्पेशली इसरो चे अध्यक्ष के. सिवान ह्यांना दिला. आज सकाळी पुर्ण देशाला उद्देशुन केलेलं भाषण म्हणजे त्यांच्या आवडत्या भाषणापैकी सर्वोत्तम आहे. आज कोणतही राजकारण नाही, अपयशाचा लवलेश नाही तर ह्या गोष्टी विज्ञानाच्या तराजूत अपेक्षित असतात असं सांगताना येणारा काळात आपण पुन्हा उभे राहु हा विश्वास त्यांनी सगळ्याच वैज्ञानिकांना दिला त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन कारण जेव्हा देशाचा पंतप्रधान समोर उभं राहुन असं सांगतो ती गोष्ट मनाला खूप उभारी देणारी असते. (विनीत वर्तक ©)
गेली ११ वर्ष इसरो मधील प्रत्येकाने ह्या मोहिमेवर खुप मेहनत घेतली होती. त्यामुळेच जेव्हा पंतप्रधान इसरो मधुन बाहेर पडत होते तेव्हा इसरो चे अध्यक्ष के. सिवान ह्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत संपूर्ण इसरो च्या भावना त्यांच्या त्या अश्रुत दिसतं होत्या. इसरो मधील वैज्ञानिक, संशोधक पैश्यासाठी नाही तर देशासाठी काम करतात आणि म्हणून एक अपयश सुद्धा किती खोलवर टोचते ह्याचा प्रत्यय ह्या वेळी पूर्ण देशाला दिसला असेल. आज प्रत्येक भारतीय ह्या मोहिमेने एक झाला. एक भारतीय म्हणुन प्रत्येकाने कालचा प्रत्येक क्षण अनुभवला. अपयशाच्या क्षणी जेव्हा ह्याच १३० कोटी भारतीयांच प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधानांनी त्यांना आपल्या कवेत घेऊन सांत्वन केलेला क्षण हा प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी आणणारा पण त्याचवेळी वैज्ञानिकांना एक आत्मविश्वास देणारा असा कायम लक्षात राहील. कदाचित आपल्या कवेत घेऊन त्यांनी इसरो चिफ के.सिवान ह्यांना म्हंटल असेल, 'अजुन सर्वोत्तम यायचं आहे.... 'ये दिल मांगे मोअर'.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://vartakvinit.blogspot.com/2019/09/blog-post_6.html