कृषिक अँप Krushik app


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Другое


Krushik app

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Другое
Статистика
Фильтр публикаций


फूल बाजारात फुलांची आवक चांगली झाली. मात्र, तुलनेने मागणी कमी आहे. परिणामी गेल्या आठवड्यातील भाव स्थिरच असल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ९०-१२०, अ‍ॅष्टर : जुडी २०- ३०, सुट्टा १५०-२००, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव)
गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, आॅर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : १००-२००.
➖➖➖➖➖➖
मोफत पीकनिहाय बाजारभाव माहितीसाठी कृषिक अॅप च व्हाटअसप चॅनल नक्की जॉइन करा 📱
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A


*पूर्वहंगामी ऊस पिक सल्ला* 🎋🎋
✨*मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी*
ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे, तेवढीच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा अवश्यकता असते. मल्टी मॅक्रोन्यूट्रीयंट (नत्र ८ %, स्फुरद ८ %, पालाश ८ %) आणि मल्टी मायक्रोन्यूट्रीयंट (ग्रेड-II : फेरस २.५ %, मँगेनीज १ %, झिंक ३ %, कॉपर १ %, मॉलीब्डेनम ०.१ %, बोरॉन ०.५ %) या द्रवरूप खतांची एकरी प्रत्येकी २ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि ३ लिटर प्रति ३०० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.
*खोडवा ऊस पिक सल्ला* 🎋🎋
✨*सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर*
ऊस तोडणी केल्यानंतर नवीन येणारे फुटवे पिवळे किंवा केवडा पडल्यासारखे दिसतात अशा ठिकाणी माती परिक्षण करावे. त्यानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी ८ किलो झिंक सल्फेट, १० किलो फेरस सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स ही खते वापरावीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱📱 *कृषिक प्रदर्शन २०२४ नोंदणी* 📱📱
*त्वरित आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरून(कृषिक अॅप) करून घ्यावी.* 📱📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US




🟢🟢 𝐊𝐑𝐔𝐒𝐇𝐈𝐊 𝟐𝟎𝟐𝟒 🟢🟢
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कृषिक २०२४- नोंदणी विशेष सवलत ✍🏼
प्रात्यक्षिक आधारित भव्य कृषी प्रदर्शन
प्रती व्यक्ती प्रती दिवस शुल्क रु. ६० (कृषिक अॅपद्वारे नोंदणीवर रु. २० सवलतीसह शुक्ल रु ४०)
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित “कृषिक २०२४- प्रात्यक्षिक आधारित भव्य कृषी प्रदर्शन ” दि. १८ ते २२ जानेवारी २०२४
ठिकाण : कृषी विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱📱 कृषिक प्रदर्शन २०२४ नोंदणी 📱📱
त्वरित आपली नोंदणी पुढे दिलेल्या लिंक वरून करून घ्यावी. 📱📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US


राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ‘इतक्या’ हजारांची मदत! वाढीव मंडळांना फक्त ८ सवलती, आर्थिक मदत नाहीच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : सकाळ
दिनांक : 21-Nov-23
पावसाळ्यात सरासरीपेक्षा ५० ते ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. या पार्श्वभूमीवर ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. मात्र, वाढीव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना केवळ सवलतीच मिळणार असून आर्थिक मदत परवडणारी नसल्याने त्या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांनाच अर्थसहाय मिळेल, असे मदत व पुनवर्सन विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.राज्यातील १० जिल्ह्यांमधील ३५५ गावे आणि ९५९ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी ३७७ टॅंकर सुरु झाले आहेत. धरणे व मध्यम- लघू प्रकल्प साठ्यातील पाणीसाठी देखील झपाट्याने कमी होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जाणवू लागला आहे. पावसाअभावी खरीप वाया गेला, परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही कमीच झाल्याची वस्तुस्थिती आहे. सॅटेलाईट सर्व्हेत राज्यातील काही तालुक्यांमध्येच दुष्काळी स्थिती असल्याचे नमूद झाले. परंतु, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत एक हजार २१ महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर झाला.
मात्र, ४० तालुक्यांनाच दुष्काळी सवलतीसह आर्थिक मदत मिळणार आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव येतील. त्यानंतर तेथून संबंधित ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मदत वितरीत करण्याचा निर्णय अपेक्षित आहे. पण, मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यास वाढलेल्या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
‘एसडीआरएफ’अंतर्गत राज्य सरकारने सात हजार कोटींची तरतूद यापूर्वीच केली असून त्यातून ही मदत वितरीत होईल. मदतीसाठी केंद्र सरकारकडेही ‘एनडीआरएफ’मधून मदत मागणीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी ‘या’ ८ सवलती
- शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट
- शेतकऱ्यांकडील पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू विजबिलाबात ३३.५ टक्के सूट
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता
- आवश्यक त्या गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे
- ‘महावितरण’ने शेतीपंपाची वीज जोडणी खंडीत करू नये
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅपच्या व्हाटअसप चॅनेल खालील लिंक वरून जॉइन करा 👇🏼👇🏼👇🏼
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A


*गहू पिक सल्ला*
खपली गहू लागवड
खपली गव्हास साधारण १०-२३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. तापमान थोडे वाढले तरी खपली गहू ते सहन करू शकतो. तसेच पाण्याचा ताणदेखील सहन करू शकते. खपली गहू काळ्या, कसदार जमिनीत चांगला येतो. चांगल्या निचर्‍याच्या जमिनीची निवड करावी. मातीचा सामू ६-८ दरम्यान असावा. खरिपाचे पीक निघाल्यावर जमिनीची चांगली मशागत करावी. उन्हाळ्यात शेणखत टाकले नसल्यास एकरी ४ टन शेणखत मिसळावे. २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद, १६ किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित २४ किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. एक एकर पेरणीसाठी ४० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी १६ ते २० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया गुळाच्या द्रावणाबरोबर करावी. बियाणे सावलीमध्ये सुकवून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेवून पाभरीने किंवा पेरणी यंत्राच्या साह्याने एकसारखे बी पडेल याची दक्षता घ्यावी. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सें.मी. खोल करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता एकेरी करावी.
✨सुधारित जाती
आघारकर संशोधन संस्था, पुणे: एमएसीएस-२९७१
धारवाड कृषी विद्यापीठ, कर्नाटक: डीडीके-१०२५, डीडीके-१०२९
प्रादेशिक संशोधन केंद्र, वेलिंग्टन, तामिळनाडू: एचडब्लू-१०९८
*हरभरा पिक सल्ला*
बी.बी.एफ. पद्धतीने लागवड
रब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी या हंगामात हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.
🌱हरभरा लागवड पद्धती
👉चार ओळी, ३० सें.मी. अंतर
एका वरंब्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी (३० सें.मी. अंतरावर) घ्यावयाच्या असल्यास, सरी घेण्यासाठीच्या खुणा म्हणजेच फाळातील अंतर १५० सें.मी. ठेवावे. ट्रॅक्‍टरचलीत बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. यामुळे १२० सें.मी. अंतराचा रुंद वरंबा तयार होतो. त्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी ३० सें.मी. अंतरावर बसतात. दोन्ही बाजूच्या सर्‍या ३० सें.मी. रुंदीच्या पडतात.
👉तीन ओळी, ३० सें.मी. अंतर
एका वरंब्यावर ३० सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घेताना, ९० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा लागतो. त्यात जमिनीच्या प्रकारानुसार दोन्ही बाजूच्या सर्‍या ३० सें.मी. रुंदीच्या मिळू शकतात. त्यासाठी दोन फाळातील अंतर १२० सें.मी. ठेवून, बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर ठेऊन चालवावे लागते. सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सर्‍या या गरजेनुसार ३० सें.मी. किंवा कमी-जास्त रुंदीच्या मिळू शकतात.
👉तीन ओळी, ४५ सें.मी. अंतर
एका वरंब्यावर ४५ सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घ्यावयाच्या असल्यास, १३५ सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा. त्यासाठी दोन फाळातील अंतर १८० सें.मी. ठेवून बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. दोन्ही बाजूच्या सर्‍या या ४५ सें.मी. रुंदीच्या पडतात. त्यांची रुंदी कमी-जास्त करता येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅपच्या व्हाटअसप चॅनेल खालील लिंक वरून जॉइन करा* 👇🏼👇🏼👇🏼
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A


दुष्काळी तालुक्यांसाठी केंद्राकडे मागणार मदत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : पुढारी
दिनांक : 08-Nov-23
यंदा राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधीच्या निकषानुसार 40 तालुक्यांत दुष्काळ जाहिर केला आहे. या भागातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने 3 हजार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. तत्पूर्वी, उद्या बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या 40 तालुक्यांपैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे असून, दुष्काळामध्येही सरकार राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. एनडीआरएच्या निकषामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात दुष्काळ जाहीर करायचा झाल्यास पर्जन्यमान कमी झालेली गावे विभागीय महसुली मंडलनिहाय निवडण्याची शक्यता असून त्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅपच्या व्हाटअसप चॅनेल खालील लिंक वरून जॉइन करा
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A


दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : पुढारी
दिनांक : 06-Nov-23
खरीप हंगाम २०२३ करिता राज्यातील ४० तालुक्यांत सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता इतर जिल्ह्यांतही दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यवाही करत आहे.सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित तालुक्यांतील मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमतरता विचारात घेतली जाणार आहे. याशिवाय आवश्यक निकष निश्चित करून या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. या विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मंत्रिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या घटकांचा विचार करून १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांमध्ये गंभीर व १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. आता केंद्र शासनाच्या निकषात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात कमी पाऊस पडला आहे त्याचा विचार करण्यात येणार आहे, असेही मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आजच पुढे दिलेल्या लिंक वरून /गुगल प्ले स्टोअरवरून कृषिक अॅप अपडेट/ डाऊनलोड करून मोफत सेवेचा लाभ घ्या📲📲 👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en




राज्यातील 36 कारखान्यांची 345 कोटी एफआरपी थकीत?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : पुढारी
दिनांक : 31 -oct-23
राशिवडे : शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. त्यातच नैसर्गिक वातावरणाचाही फटका बसत आहे. त्यामुळे ऊस पीकच अडचणीत आले असताना, राज्यातील 36 कारखान्यांनी 345 कोटींची एफआरपी अद्यापही अदा केलेली नही. यापैकी सतरा कारखान्यांच्या मालमता विक्रीतूनच ही देय रक्कम अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्यातील गळीत हंगाम दोन आठवड्यांतच सुरू होत आहे. मुहूर्त साधून बॉयलरही पेटवले आहेत, तरीसुद्धा राज्यातील 36 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफआरपीचे 182 कोटी, तर त्यापूर्वीच्या हंगामातील 163 कोटी, असे सुमारे 345 कोटी रुपये अदा केलेले नाहीत. वारंवार आदेश देऊनही हे कारखाने शेतकर्‍यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता 17 कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्त करून शेतकर्‍यांची देय रक्कम अदा करण्याच्या द़ृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.
राज्यात गेल्या गळीत हंगामात (सन 2022-23) सहकारी आणि खासगी, अशा 211 साखर कारखान्यांनी 1,053.91 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 105.40 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले. या उसापोटी शेतकर्‍यांना 35 हजार 532 कोटींची एफआरपी महिनाभरात मिळणे अपेक्षित असताना वर्षभरानंतरही 36 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे पैसे दिलेले नाहीत.
आयुक्तालयाच्या पाठपुराव्यामुळेच 500 कोटी देण्यात यश
राज्यात 99.50 टक्के एफआरपी शेतकर्‍यांना मिळाली असून, काही कारखान्यांनी शेतकर्‍यांचे पैसे थकविले होते. परंतु, आयुक्तालयाच्या पाठपुराव्यामुळेच 500 कोटी रुपये शेतकर्‍यांना मिळवून देण्यात यश आले आहे. आता मात्र एफआरपी अदा न केलेल्या कारखान्यांना मालमत्ता विक्री करून देयके अदा करण्याची कटू वेळ येणार आहे. प्रामुख्याने सध्या तरी 17 कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीतून देयके अदा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
ऊस पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en


आले पिक सल्ला
फुले येणे
शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर आल्याला फुले येण्यास सुरवात होते. त्यास ‘हुरडे बांड’ असे म्हणतात. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून गड्ड्यांची वाढ होण्यास सुरवात होते. आल्याची फुले तशीच झाडावर ठेवल्यास कोणताही तोटा होत नाही. परंतु, फुले कापून काढल्यास त्यांच्या देठाच्या कापलेल्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. परिणामी कंदकूज रोग लागण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून आले पिकामध्ये फुले काढण्याचे टाळावे.
हळद पिक सल्ला
ऑक्टोबर हीट
दुपारच्या वेळी साधारणतः तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यानंतर हळदीची पाने गोलाकार झालेली दिसतात. हा कोणताही रोग नसून, जास्त उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पिकाची नैसर्गिक क्रिया आहे. अशी पाने तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा सरळ होतात
➖➖➖➖➖➖➖➖➖
हळद व आले पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en


राज्यातील साडेतेरा लाख शेतकऱ्यांना आज मिळणार नमो किसान योजनेचा पहिला हप्ता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : पुढारी
दिनांक : 26-oct-23
पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी केवायसी विशेष मोहीम राबविल्यामुळे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्या आदेशावरुन ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात आली होती. कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता या मोहिमेद्वारे केली होती.पीएम किसान योजना सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.
राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
मोफत बाजारभाव व आठवडी मोफत सल्ला, मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en




𝐅𝐀𝐂𝐄𝐁𝐎𝐎𝐊 𝐋𝐈𝐕𝐄
सस्नेह नमस्कार,
🏛अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती
कृषिक अॅप, यांच्यातर्फे आयोजित परिसंवाद
शेतकरी उत्पादक कंपनी🏭🏭
या विषयावर 'फेसबुक लाइव Facebook Live' च्या माध्यमातून
लाईव्ह ऑन
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक :श्री. संतोष गोडसे ,विषय विशेषज्ञ,
(कृषी विस्तार) कृषि विज्ञान केंद्र, बारामती
📅 बुधवार दि. २५ ऑक्टोबर २०२३
⌛️दुपारी ४ ते ५
🙏विनित,
कृषिक अॅप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
Krishi Vigyan Kendra Baramati Agricultural Development Trust,Baramati


रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर ; गहू-मसूरच्या MSP मध्ये सर्वाधिक वाढ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 19 -oct-23
केंद्र सरकारने हंगाम २०२४-२५ साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. यात राज्याचं महत्वाचं रब्बी पीक असलेल्या हरभऱ्याच्या हमीभावात १०५ रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदाच्या रब्बीत हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये हमीभाव असेल. तर गव्हाचा हमीभाव १५० रुपयांनी वाढवण्यात आला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक ४२५ रुपये वाढ करण्यात आली.केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१८) हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीला मान्यता दिला. रब्बी हंगामात हरभरा हे राज्याचे मुख्य पीक आहे. देशात कडधान्याचा पुरवठा कमी असल्याने मागील काही आठवड्यांपासून हरभऱ्याचा भाव वाढला. तसेच देशातील दुष्काळी स्थिती आणि कडधान्याचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात केंद्र सरकार हरभऱ्याच्या हमीभावात किती वाढ करते, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण सरकारने हमीभावात केवळ १०५ रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदा हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ४४० रुपयांवर पोचला. मागील हंगामात हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव होता.सरकारने गव्हाच्या हमीभातही १५० रुपयांची वाढ केली. गव्हाचा हमीभाव २ हजार २७५ रुपयांवर पोचला. मागील हंगामात गव्हाचा हमीभाव २ हजार १२५ रुपये होता. मोहरीच्या हमीभावात २०० रुपयांची वाढ करून ५ हजार ६५० रुपये करण्यात आला. सूर्यफुलाच्या हमीभावात मात्र केवळ १५० रुपयांची वाढ करण्यात आली. यंदा सूर्यफुलाला ५ हजार ८०० रुपयांचा आधार मिळेल.मसूरला सर्वाधिक वाढ
केंद्र सरकारने हरभरा उत्पादकांची काहिशी नाराजी केली असली तरी मसूर उत्पादकांना मात्र काहिसा दिलासा दिला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक ४२५ रुपये वाढ केली. मसूरचा हमीभाव आओता ६ हजार ४२५ रुपयांवर पोचला. मसूर हे काही प्रमाणात तुरीला पर्याय समजली जाते. देशात तुरीचा तुटवडा असून भाव वाढलेले आहेत. काही करूनही तुरीचे भाव कमी होत नसल्याने तुरीला पर्याय ठरू शकणाऱ्या मसूरचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा उद्देश आहे. हमीभावात चांगली वाढ झाल्याने शेतकरी पेरा जास्त वाढवू शकतात. सरकारने खरेदीचीही हमी दिली आहे. पण देशात कमी पडलेला पाऊस आणि धरणांमधील कमी पाणीसाठी यामुळे उत्पादनवाढीवर मर्यादा येऊ शकतात.
दीडपट हमीभावाचे पुन्हा गाजर🥕🥕
रब्बी हंगामातील हमीभाव जाहीर करताना पुन्हा एकदा सरकारने उत्पादन खर्चावर नफा दिल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, यंदा गव्हाला उत्पादन खर्चावर १०२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला. कारण गव्हाचा उत्पादन खर्च ११२८ रुपये असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. तर हरभऱ्याचा उत्पादन खर्च ३ हजार ४०० रुपये असून त्यावर ६० टक्के नफा गृहीत धरून ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला. तसेच मोहरीला ९८ टक्के, मसूरला ८९ टक्के, बार्लीला ६० टक्के आणि सूर्यफुलाला ५२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला, असे केंद्राने म्हटले आहे.
पीकनिहाय हमीभावात केलेली वाढ
पीक…वाढ…हमीभाव
हरभरा…१०५…५४४०
गहू…१५०…२२७५
मसूर…४२५…६४२५
मोहरी…२००…५६५०
सूर्यफुल…१५०…५८००
बार्ली…११५…१८५०
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेती पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en


राज्यस्तरीय रब्बी हंगाम आढावा बैठक संपन्न
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : महासंवाद
दिनांक : 18 -oct-23
पुणे, दि. 17 : शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
कृषीमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक २०२३-२४ साखर संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले यांच्यासह सर्व कृषी संचालक आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, ज्वारी, बाजरीसारख्या तृणधान्य, डाळवर्गीय पिकांचे महत्व आज लक्षात येत आहे. त्यामुळे या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. रब्बी हंगामात उत्पादनात वाढ होईल याबाबत अधिकाऱ्यांनी आत्मविश्वासाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
यंदा काही विभागात धरणांतील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर असल्याने उन्हाळी आवर्तने देणे कठीण आहे. त्यामुळे हे क्षेत्र रब्बी पिकांच्या, चारा पिकांच्या उत्पादनाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावा. करडई, जवस, तीळ, मोहरी, पिवळी ज्वारी आदी कमी लागवड असलेल्या तृणधान्य, गळीत धान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना या उत्पादनांना चांगला भाव मिळेल याची हमी दिली पाहिजे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.
राज्यातील भरडधान्य उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी कृषी उद्योग महामंडळाने त्यांचे ब्रॅण्डिग करुन ऑनलाइन प्लॅटफार्म उपलब्ध करावा तसेच ॲमेझॉनसारख्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मशी जोडणी करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी कृषी सहसंचालकांकडून विभागनिहाय रब्बीची पेरणी, पाण्याची परिस्थिती, बियाणे उपलब्धता, खते उपलब्धता याबाबत आढावा घेतला. खतांचे लिंकिंग होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे कृषी मंत्री म्हणाले.
राज्यातील सर्व ठिकाणचे पिकांचे उत्पादन, खर्च, खते उपलब्धता आदी बाबी रोज अद्ययावत होऊन डॅशबोर्डवर दिसतील, अशी यंत्रणा तयार करावी, असेही मंत्री श्री. मुंडे म्हणाले.
यावेळी त्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचाही आढावा घेतला. यांत्रिकीकरणअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना उप अभियानाच्या किमान ७५ टक्के निधी वितरणाचे उद्दिष्ट २ आठवड्यात पूर्ण करुन केंद्र शासनाकडून पुढील टप्प्याची मागणी करावी. मोठ्या ट्रॅक्टरसारख्या यंत्राशिवाय कमी खर्चात नाविन्यपूर्ण औजारे बनविणाऱ्यांचे प्रयोग पाहून अशी औजारे उपलब्ध करता येतील का याबाबतही प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अपर मुख्य सचिव अनुप कुमार म्हणाले की, शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकाला प्रत्यक्ष पडणारी किंमत यात मोठी तफावत असून त्यामध्ये बदल करण्यासाठी मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये तसेच स्मार्ट प्रकल्पात या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
यावेळी कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले की, रब्बी पिकांच्या सरासरी ५३ लाख ९८ हजार हेक्टरच्या तुलने यंदा ५८ लाख ७६ हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे. ज्वारीचे क्षेत्र २० लाख हेक्टर, गहू १० लाख हेक्टर, मका ५ लाख हेक्टर, हरभरा २१ लाख ५२ हजार हेक्टर, गळीत धान्यांचे ८७ हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे. रब्बी ज्वारीचे बियाणे मिनी किट २०० ग्रॅमवरुन २ किलोग्रॅम करुन ३ लाख ३० हजार किटचे वितरण प्रभावी केल्यामुळे ज्वारी पेरणीला प्रोत्साहन मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सहकार आयुक्त श्री. कवडे यांनी रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणाची माहिती दिली. रब्बी हंगामात २० हजार ७८२ कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून डिसेंबरपर्यंत ते गाठले जाईल असे त्यांनी सांगितले.
बैठकीस कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, सर्व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक, जिल्हा कृषी विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेती पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en


‘नमो महासन्मान’ योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 17 -oct-23
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार असून, पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक साह्य करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर आता राज्य शासनानेही महासन्मान योजनेची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेत जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.या योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार प्रतिहप्ताप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार प्रतिवर्ष मिळणार आहेत. यानंतर आता राज्य शासनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहे. राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण दसऱ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारी सुरू आहे.जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांना ही मदत सुरुवातीला मिळाली होती, नंतर केंद्र सरकारने आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असलेले नोकरदार यांना यातून वगळले. त्यामुळे ही संख्या काहीशी कमी झाली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थींना आधार, कार्ड बँक खात्याशी लिंक करणे व आधार तसेच बँक खाते यापूर्वीच लिंक असेल तर त्याची ई-केवायसी प्रक्रिया करून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेती पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
माहिती अद्ययावत करा!
पीएम किसान सन्मान योजनेसाठी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता राज्य शासनही रक्कम देणार असल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (७/१२ उतारा आदी) तयार ठेवावा लागणार आहे.


नवरात्रोत्सवामुळे फुले, फळांना मागणी वाढली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य : सकाळ
दिनांक : 16 -oct-23
मार्केट यार्ड, ता. १५ : पावसाने नुकसान झाल्याने रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होती. सर्व प्रकारच्या फळभाज्यांना साधारण मागणी होती. आवक घटल्याने भाजीपाल्यामध्ये हिरवी व सिमला मिरचीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. इतर बहुतांश भाजीपाल्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. दरम्यान, नवरात्रोत्सवामुळे फुले आणि फळांना मागणी वाढली आहे.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सात टेम्पो, कर्नाटक व गुजरात येथून कोबी तीन टेम्पो, आंध्रप्रदेश व तमिळनाडूतून शेवगा तीन टेम्पो, इंदूर येथून पाच टेम्पो गाजर, कर्नाटकातून घेवडा तीन टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची आठ टेम्पो आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ७०० गोणी, भेंडी, गवार व कोबी प्रत्येकी पाच टेम्पो, टोमॅटो आठ हजार क्रेट्स, काकडी सात टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची आठ टेम्पो, भुईमूग शेंगा ५० गोणी, कांदा ६० ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ६० ट्रक आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : २००-२८०, बटाटा : १००-१८०, लसूण : ६५०-१५५०, आले सातारी : ८००-११००, भेंडी : २५०-४००, गवार : गावरान व सुरती ः ४००-६००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ३५०-५५०, दुधीभोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : २००-३००, कारली : हिरवी ः २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : ४००-५००, पडवळ : २००-३००, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : ८०-१२०, वांगी : २००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ५००-५५०, तोंडली : कळी ः ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ६००-८००, गाजर : २००-२५०, वालवर : ४००-६००, बीट : ८०-१००, घेवडा : ३००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : ११००-१३००, पावटा : ४००-४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांचे भाव स्थिर
मार्केटयार्ड येथील घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीची एक लाख २५ हजार तर मेथीची ५० हजार जुडी आवक झाली. पितृपंधरवड्याच्या तुलनेने मागणी कमी झाली होती. परिणामी, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव स्थिर होते.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-२५००, मेथी : १५००-२२००, शेपू : ४००-८००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-६००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ३००-६००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-८००, चवळई : ३००-७००, पालक : १२००-१८००.कलिंगड, खरबूज, सीताफळ महागले
येथील फळबाजारात फळांना मागणी वाढली आहे. परिणामी कलिंगड, खरबूज, पपई, सीताफळ, डाळिंब, पेरू, लिंबू आणि मोसंबीच्या भावात वाढ झाली तर चिक्कू, अननस आणि संत्र्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवरात्रोत्सवातील उपवासामुळे फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. परिणामी भावात वाढ झाली आहे.
केरळ येथून अननस पाच ट्रक, मोसंबी ९० टन, संत्रा ३० टन, डाळिंब ४० टन, पपई आठ टेम्पो, लिंबू ७०० गोणी, कलिंगड चार टेम्पो, खरबूज तीन टेम्पो, पेरू ७०० क्रेट्स, सीताफळ ३५ टन, चिक्कूची दोन हजार बॉक्स आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ४०-१३०, संत्रा : (१० किलो) : २००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १००-२७५, गणेश : १०-५०, आरक्ता ः २०-८०, कलिंगड : १०-१६, खरबूज : २०-३०, पपई : १५-३५, पेरू (२० किलो) : ५००-७००, चिक्कू (१० किलो) : १००-५००.झेंडूच्या भावात घसरण
येथील फूल बाजारात नवरात्रोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली आहे. मात्र, आवक जास्त होत असल्याने झेंडूच्या भावात घसरण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २५०-३५०, अ‍ॅष्टर : जुडी ः १२-२०, सुट्टा ः ८०-१५०, कापरी :
२०-४०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३५, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : ६०-८०, शेवंती काडी ः ८०-१५०, लिलियम (१० काड्या) ः ८००-१०००, आॅर्चिड ः ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : ६०-८०, जुई ः ६००-८००.
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेती पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅप खालील लिंक वरून नक्की डाउनलोड करा 🌧⛈ 👇🏼
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en




🔴🔴 𝐅𝐀𝐂𝐄𝐁𝐎𝐎𝐊 𝐋𝐈𝐕𝐄 🔴🔴
➖➖➖➖➖➖➖➖➖
अॅग्री क्लीनिक व अॅग्री बिजनेस केन्द्र योजना (ACABC scheme) 📄📑
’खालील लिंक वर क्लिक करून'फेसबुक लाइव 𝐅𝐀𝐂𝐄𝐁𝐎𝐎𝐊 𝐋𝐈𝐕𝐄'
मध्ये सहभागी व्हा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
https://www.facebook.com/Krushikapp/videos/340734515160667/?mibextid=YxdKMJ

Показано 20 последних публикаций.