प्रश्न:-
#Imp_Current_Affairs | #current_affairs_Quiz
--------------------------
• ब्रिटीश-इंडियन लेखक सलमान रश्दी यांच्या कोणत्या पुस्तकाला मान बुकर पुरस्कारासाठी नामांकन जाहिर झाले आहे:- Quichotte
सलमान रश्दी यांचे सप्टेंबर २०१९ मध्ये प्रकाशित होणारे Quichotte या पुस्तकाला या वर्षाच्या मान बुकर पुरस्कारासाठी नामांकन जाहिर झाले आहे. सलमान रश्दी यांन १९८१ मध्ये मिडनाइट चिल्ड्रेन या पुस्त्कासातठी हा पुरस्कार मिळाला होता.
• जुलै २०१९ मध्ये पार पडलेल्या हीरो इंटरनेशनल फुटबॉल कप, ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :- उत्तर कोरिया
• ७- १९ जुलै २०१९ या कालावधीत हीरो इंटरनेशनल फुटबॉल कप फुटबॉल स्पर्धा अहमदाबाद, भारत येथे पार पडली अंतिम सामन्यात उत्तर कोरियाने ताझिकिस्तानचा १-० असा पराभव करीत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत सीरियाने तिसरे स्थान प्राप्त केले तर भारताला चौथे स्थान प्राप्त झाले
• कोणत्या महिला क्रिकेटर खेळाडूने महिला टी-20 स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत ? :-मेग लेनिंग
• २६ जुलै २०१९ रोजी ऑस्ट्रेलिया संघाची मेग लेनिंग हीने अंतरराष्ट्रीय महिला टी-20 स्पर्धेत ६३ चेंडूत १३३ धावा हा सर्वोच्च धावा केल्या. या अगोदर हा पराक्रम लेनिंग व नेदरलंडची स्टेरी कालिस या दोघींच्या नावावर होता . दोघीनीही १२६-१२६ धावा केल्या होत्या
• २०२२ मध्ये बर्मिंघम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी कोणत्या तीन नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे :- पॅरा टेबल टेनिस , महिला टी-20 क्रिकेट व बीच व्हालीबॉल
• ७१ राष्ट्रकुल खेळ संघाने मान्यता दिल्यानंतर महिला टी-20 क्रिकेट, बीच व्हालीबॉल
आणि पॅरा टेबल टेनिस या खेळांचा २०२० मध्ये होणाऱ्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश केला आहे. या स्पर्धेत पुरुषांपेक्षा महिला खेळाडूना अधिक पदक प्राप्त होणार आहे . पुरुषांसाठी १३३ तर महिलांसाठी १३५ पदक उपलब्ध असणार आहे.
तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धा ---------------- या ठिकाणी पार पडणार आहे :- गुवाहाटी
तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धा गुवाहाटी या ठिकाणी १८ ते ३० जानेवारी २०२० या दरम्यान पार पडणार आहे. यात १० हजाराहून अधिक खेळाडू आणि अधिकारी भग घेतील. भारतीय ऑलिम्पिक संघ, स्कूल गेम्स फेडरेशन आणि आसाम स्पोर्ट्स असोसिएशन आयोजन करणार आहे. दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धा २०१९ मध्ये पुणे येथे पार पडल्या होत्या
• १४ वे जागतिक शिक्षण शिखर समेलन कोठे आयोजित केले होते:- नवी दिल्ली
• ९ ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत १४ वे जागतिक शिक्षण शिखर समेलन नवी दिल्ली येथे आयोजित केले होते या दोन दिवसाच्या शिखर स्मेलनासाठी ८ देश व भारतातील १७ राज्यांच्या प्रतिनिधीनी सहभाग नोंदवला होता
९- ११ ऑगस्ट २०१९ या कालावधीत कोणत्या उद्देशाने देशभरात ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ हे अभियान राबवले होते :- रेल्वे स्टेशनवर कोणीही हक्क न सांगितलेल्या आणि अपरिचित वाहनांची ओळख पटविणे.
रेल्वे विभागाच्या सर्व जागा, परिसर आणि वाहनतळांवर ठेवलेल्या बेवारशी वाहनांचा तपास करण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम ९- ११ ऑगस्ट २०१९ या कालावधीत ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ या नावाने राबवली . हे अभियान देशभरात ४६६ स्टेशन वर राबवले.
एक देश एक शिधापत्रिका’ ही योजना १ ऑगस्ट २०१९ पासून कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली आहे. :- महाराष्ट्र, गुजरात ,आंध्र प्रदेश आणि तेलंगण
राष्ट्रीय पातळीवर एकच शिधापत्रिका ग्राह्य धरण्याच्या उद्देशाने एक देश एक शिधापत्रिका’ ही योजना १ ऑगस्ट २०१९ पासून महाराष्ट्र, गुजरात ,आंध्र प्रदेश आणि तेलंगण या चार राज्यात सुरु करण्यात आली आहे. संगणकीकृत योजनेची व्याप्ती वाढल्यानंतर आंध्रप्रदेश, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगण आणि त्रिपुरा या 11 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेच्या राज्यांतर्गत अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे
● अधिक माहितीसाठी वाचा दि मंथली अपडेट्स जनरल नॉलेज हे मासिक
● किंमत फक्त रु 30/-
● मार्च 2020 चा अंक प्रसिद्ध
● अंक पोस्टाने पाठविला जाईल
● आपणास अंक हवा असल्यास 9518368602 यावरती संपर्क साधा