ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे मंगळवारी वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या त्या मातोश्री होत...