*ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं? ध्येयाचे प्रकार? - भाग १*
आपण उद्योजक आहात किंवा होऊ इच्छिता. तुम्ही करोडो रुपयांचे व्यवसाय करणार्या अशा मोठ्या कंपनी/संस्था पाहिल्या असतील. त्यांची उलाढालीची व नफ्याची वार्षिक टारगेट्स असतात. आपल ध्येय काय आहे? मन, शरीर, बुद्धी हे आपल्याकडील महत्त्वाचे भांडवल आहे, हे आपण जाणतो. त्याचा वापर करून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, मिळवू शकतो. आपण स्वत: सीइओ असून आपले मन आपला मॅनेजर आहे, आपलं काम आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो, असे समजून घेऊ. यशस्वी व्यक्ती आपल्या मनाचा वापर करून कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात, घडवून आणू शकतात. ज्या वेळी मन ध्येयाने प्रेरित होतं, त्या विषयावरच मन एकाग्र होतं, त्या वेळी यश मिळतं, असंही आपण पाहिलं. आज आपण ध्येय कसं ठरवावं व कसं साध्य करावं याविषयी विचार करू या. अर्थातच, मनाच्या वापराने हे कसं करायचं याची चर्चा आपण करू या.
ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?
ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक काळात काय हवे आहे? काय मिळवायचे आहे? ध्येय, उद्दिष्ट, goal, target या सर्वांचा सोपा अर्थ आहे, आपल्या सर्व गोष्टी करण्याचे कारण! आपण जे काही करतोय त्याने आपल्याला काय मिळवायचे आहे, कोठे पोहोचायचे आहे ते म्हणजे ध्येय? दुसर्या शब्दात सांगायचं तर, तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ, पैसा, मेहनत, विचार, लक्ष कोठे लावले आहेत, ते तुमचे लक्ष, ध्येय, सेरश्र. तुम्ही मागील सात दिवसांतील १६८ तासांपैकी ८० तासांत काय मिळवायचा प्रयत्न करीत होतात ते तुमचे ध्येय! आता यावर जर तुम्ही नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे नक्की काही एक ध्येय आहे किंवा नाही. तुम्ही स्वत:साठी काही करत आहात की दुसर्याच्या ध्येयाचा एक भाग झाला आहात? तुम्ही स्वत: ठरवून काही क्रिया करीत आहात की तुम्ही फक्त प्रतिक्रिया देत आहात? काय करावं, याचा गोंधळ तुमच्या डोक्यात झाला आहे काय? या प्रश्नांची उत्तरे द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे ध्येय तुम्ही ठरविले आहे का?
एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी तिचा ध्यास घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. धरसोड करणार्या व्यक्तीस कोणतंही यश मिळत नाही. तुमचे श्रम, पैसा, वेळ, लक्ष, मेहनत विखुरले गेले तर कोणतेही एक लक्ष्य साध्य होत नाही. जगातील यशस्वी कलाकार, क्रीडापटू, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी यांची चरित्रे अभ्यासली असता, ते सगळे तन-मन-धन लावून एकाच विषयाचा, ध्येयाचा विचार करीत होते असे दिसून येते. आपणाला एखादा चित्रपट पाहायचा असेल, तर कशी तयारी करतो? किती त्यासाठी काहीही करतो? किती वेळ त्याचा विचार करतो? जर तीन तासांच्या चित्रपटासाठी आपण एवढा विचार व कृती करतो, तर जीवनातील पाच, दहा, वीस वर्षांसाठी आपले काही ध्येय निश्चितच असायला हवे. त्यामुळे जगण्याला दिशा मिळते, अर्थ प्राप्त होतो, उत्साह वाढतो. आपल्यातील सुप्त गुण व शक्ती आपल्याला कळतात.
*उर्वरीत लेख पुढील भागात*