मिशन मेगा भरती - 2020

@MissionMegaBharati2019 Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

2020 च्या मेगाभरतीची परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...
जॉईन- https://telegram.me/MissionMegaBharati2019
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
17.09.2019 17:22
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
14 592
подписчиков
~0
охват 1 публикации
~4
дневной охват
~7
постов / нед.
N/A
ERR %
11.8
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1109 упоминаний канала
0 упоминаний публикаций
90 репостов
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
🎯 Mission_Success 🎯
🎯 Mission_Success 🎯
Каналы, которые цитирует @MissionMegaBharati2019
State Board Prashansanch
SAIMkattaBookWorld
SAIMkattaBookWorld
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkattaBookWorld
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
Rojgarkatta
SAIMkattaBookWorld
Rojgarkatta
Rojgarkatta
Rojgarkatta
SAIMkattaBookWorld
SAIMkattaBookWorld
SAIMkattaBookWorld
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
SAIMkatta
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: State Board Prashansanch
स्टेट बोर्डच्या संपूर्ण नवीन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित...

महाराष्ट्रातील पहिला व एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच

फक्त
स्टेट बोर्ड प्रश्नसंच


संपादक-
समाधान निमसरकार

लेखन व संकलन
डॉ.वैभव माळवे (Dy,SP)

8 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक- https://amzn.to/3i32uu2

तसेच खालील लिंक वर प्रकाशनपूर्व नोंदणी करू शकता-
https://bit.ly/3cZhDKN

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
Читать полностью
एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम व्हीएम यांनी पश्चिम हवाई कमांडची सूत्रे स्वीकारली:-

📚एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम,व्हीएम यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे हवाई अधिकारी कमांडिंग इन चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली.

📚एअर मार्शल बी सुरेश पीव्हीएसएम, एव्हीएसएम,व्हीएम आणि एडीसी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.

📚एअर मार्शल व्ही आर चौधरी, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ तुकडीत लढाऊ वैमानिक म्हणून ते 29 डिसेंबर 1982 मध्ये रुजू झाले.

📚38 वर्षाच्या आपल्या झळाळत्या कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारची लढाऊ विमाने आणि प्रशिक्षण विमानाची  उड्डाणे केली आहेत. मिग -21, मिग-23एमएफ, मिग-29 आणि सुखोई -30 या विमानांच्या  उद्द्नांचा उड्डाणाचा  3800 तासाचा अनुभव आहे.

📚भारतीय हवाई दलाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. फ्रंटलाइन फाइटर स्क्वाड्रनचे ते कमांडिंग ऑफिसर होते. एअर व्हाइस मार्शल म्हणून त्यांनी हवाई दल मुख्यालय वायू भवन इथे  सहाय्यक चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (एअर डिफेन्स), असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (कार्मिक अधिकारी) म्हणून काम केले आहे.

📚आताच्या नियुक्तीपूर्वी पूर्व हवाई कमांडचे वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर म्हणून ते काम करत होते. वेलिंग्टन इथल्या  डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे ते  माजी विद्यार्थी आहेत.

📚त्यांच्या अद्वितीय  सेवेचा गौरव म्हणून 2004 च्या जानेवारीत त्यांना वायू सेना पदकाने तर 2015 च्या जानेवारीत अति विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले.  
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Читать полностью
Репост из: SAIMkattaBookWorld
आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व स्पर्धापरीक्षा पुस्तकांची......

HOME DELIVERY

खालील लिलेल्या लिंकवर जाऊन आपली ऑर्डर नोंदवा

ऑर्डरसाठी लिंक-https://bit.ly/3cZhDKN

किंवा

ऑर्डरसाठी खालील नंबरवर संपर्क किंवा वॉट्सअप्प करा-
•9595382922
•9422872805

SAIMkatta Book World-सॅमकट्टा बुक वर्ल्ड

( टीप -पिनकोडसह सर्व पत्ता लिहणे आवश्यक)
Репост из: SAIMkattaBookWorld
लवकरच होणाऱ्या आरोग्य विभागातील विविध पदासाठी अतिशय उपयुक्त अभ्याससंदर्भ...

आरोग्य विभाग तांत्रिक माहिती,गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका तसेच सराव तांत्रिक प्रश्नसंच असणारे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक....

आरोग्य विभाग मार्गदर्शक

•आरोग्य विभाग तांत्रिक माहिती
•गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका
•तांत्रिक सराव प्रश्नसंच
--------------------------------------------------------
संपादक-
•समाधान निमसरकार

लेखन व संकलन-
•डॉ.राहुल सोनवणे (BAMS)
(सहायक कक्ष अधिकारी/राज्य कर निरीक्षक)
-------------------------------------------------------
खालील पदांच्या परीक्षेसाठी उपयुक्त
■आरोग्य विभागाअंतर्गत 54 पदे
■आरोग्य सेवक/आरोग्य सेविका
■परिचारक/परिचारिका
■औषध निर्माता (जिल्हा परिषद)
■आरोग्य पर्यवेक्षक (जिल्हा परिषद)

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon वर सवलतीत उपलब्ध

आजच खरेदी करा

खरेदीकरण्यासाठी लिंक-https://amzn.to/2GuzXN3

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922.
Читать полностью
Репост из: SAIMkatta
*Inspire Talk-3*

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ ▬▬▬▬▬▬

Dr.Sudarahan Rathod (DySP/ACP) -26 July - 1.30pm -Sunday)

🎯Reserve your Date & Time for watching live Interview

🖱️click on the following link & set Reminder for the same

https://youtu.be/mzPSeDTjHP0
Репост из: SAIMkatta
13 सप्टेंबर 2020 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त....

CSAT Comprehension अंतिम सत्य®
------------------------------------------------------
संपादक-
•समाधान निमसरकार

लेखक-
•सुदर्शन राठोड (Dy.SP/ACP)
•मनोज पवार (FSI)
•योगेश राठोड
-----------------------------------------------------
पुस्तकाची वैशिष्ट्ये:-

●200+ उतारे आणि 75+ निर्णय क्षमतेचे उदाहरण.
●सर्व उताऱ्याची आयोगाच्या उताऱ्या सारखी मांडणी.
●प्रत्येक संचाची आयोगाप्रमाणे 6+2+2 (इतर विषय+ विज्ञान+भाषा) या प्रमाणे मांडणी.
●प्रत्येक संचात विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रत्येकी 2 उतारे.
●विज्ञान व तंत्रज्ञानाच्या 45 पेक्षा अधिक उताऱ्यांचा समावेश.
●उताऱ्यांची लांबी आयोगाच्या उताऱ्याइतकी.
●प्रत्येक संचानंतर सर्व प्रश्नांचे विस्तृत स्पष्टीकरण
---------------------------------------------------
आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाइन Amazon वर उपलब्ध

खरेदी करण्यासाठी लिंक-https://amzn.to/2Sl7bpd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
Читать полностью
Репост из: SAIMkattaBookWorld
राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी अतिशय उपयुक्त अभ्याससंदर्भ....

स्टेट बोर्डच्या 32 पुस्तकांवर आधारित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव स्वतंत्र पुस्तक
---------------------------------------------------
फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

संपादक-
•समाधान निमसरकार

लेखन व संकलन
•डॉ.वैभव माळवे (Dy,SP)
•गणेश सुरेश काळे
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाईन amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.

आताच खरेदी करा

खरेदी करण्याची लिंक-https://amzn.to/2Jf3UEo
-------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
Читать полностью
Репост из: SAIMkatta
कर सहायक परीक्षा-2019

निकालाची घोषणा

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Репост из: SAIMkatta
कर सहायक परीक्षा-2019

सविस्तर निकाल

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Attached file
Репост из: SAIMkatta
कर सहायक परीक्षा-2019 निकाल

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
कोरोना’मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयएएस टीना डाबी यांची ब्रिक्सच्या अँबेसेडर पदी नियुक्ती:-

📚सध्या देश कोरोना व्हायरसच्या संकट अडकला आहे. ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि कोरोना संक्रम रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या ताकदीने प्रयत्न सुरु आहेत. राजस्थान मधील भिलवाडा जिल्ह्याने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपलं एक खास मॉडेल तयार केलं असून त्याचं भारतासह जगभरात चर्चा आणि कौतुक करण्यात आलं आहे.

📚विशेष म्हणजे हा ‘भिलवाडा मॉडेल’ तयार करण्यामागे यूपीएससी २०१५ च्या परीक्षेत संपूर्ण देशातून टॉप केलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांची संकल्पना आणि मेहनत आहे. नुकतेच त्यांची ब्रिक्स मध्ये मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे.

📚टीना डाबी ‘भिलवाडा मॉडेल’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्या यूपीएससी मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत होते, मात्र आता त्यांच्या प्रशासनातील उत्कृष्ट कामांबद्दल देशभरात कौतुक होत आहे. नुकतेच त्यांची गंगानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाडाच्या एसडीएम असताना टीना डाबी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी विविध उपकरण आणि संकल्पना राबवून यशस्वी ‘भिलवाडा मॉडेल’ तयार केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सध्या सिव्हिल सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये हुशार आणि धाडसी महिला अधिकारी म्हणून टीना डाबी यांचे नाव आघाडीवर घेतले जाते.

काय आहे ‘भिलवाडा मॉडेल’ जाणून घ्या

📚देशात कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी भिलवाडा देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट बनलं होतं. त्यानंतर भिलवाडा मध्ये कोरोना संक्रम रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यावेळी एसडीएम टीना दाबी यांनी याला आळा घालण्यासाठी काम सुरू केलं.
📚भिलवाड्याच्या साऱ्या बॉर्डर्स सील केल्या आणि कोरोनाला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाने सहा कलमी कार्यक्रम हाती घेतला. 1) जिल्ह्याला आयसोलेशनमधे टाकणं, 2 ) हॉटस्पॉट ओळखणं, 3) घरोघरी जाऊन सर्वे करणं, 4) पॉझिटिव पेशंटच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना काही करून शोधणं, 5) क्वारंटाईन, आयसोलेशन सुविधा वाढवणं आणि 6) ग्रामीण भागात यंत्रणा सज्ज ठेवणं.

📚प्रत्येक घरात जाऊन ४.४१ लाख कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. १,९३७ आरोग्य पथकांनी हे काम केलं. यात २२ लाख ३९ हजार लोकांकडून आरोग्यविषयक माहिती जमवण्यात आली. 9 दिवसात तब्बल 24 लाख लोकांची टेस्ट करण्यात आली. टेस्टचा हा देशातील सर्वात मोठा आकडा आहे. असं करणारं भिलवाडा हे देशातलं पहिलं शहर आहे.

ब्रिक्स पॅनेलच्या मानद सल्लागार म्हणून नियुक्त होणाऱ्या एकमेव आयएएस अधिकारी

📚गंगानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस टीना डाबी यांना ब्रिक्स सीसीआय यंग लीडर्स (इंडिया) सुकाणू समितीचे मानद सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. समितीत मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झालेल्या त्या एकमेव आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे हे पद तीन वर्षे (2023 पर्यंत) असेल.

📚ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांमधील तरुणांना जोडण्यासाठी ब्रिक्स सीसीआयने युवा लीडर्ससाठी पुढाकार घेतला आहे. टीना डाबी याना भारतातील तरुणांचे रोल मॉडेल म्हणून पहिले जात आहे.

टीना डाबी यांच्याबद्दल…

📚टीना डाबी यांनी यूपीएससी परीक्षा 2015 मध्ये संपूर्ण देशातून प्रथम क्रमांक मिळविला होता.

📚विशेष म्हणजे त्यावेळी त्या फक्त 22 वर्षांच्या होत्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नातून राष्ट्रीय पातळीवरील एक कठीण परीक्षा पास केली होती.

📚अकरावीमध्येच असताना सिव्हिल सर्व्हीसमध्येच जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अभ्यास केला होता. तसेच दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून 20 व्या वर्षी पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली होती.

📚 त्या सर्वात तरुण यूपीएससी टॉपर्स आहेत. इतकेच नव्हे तर टीना डाबी यांनी परीक्षेमध्ये देशात अव्वल स्थान पटकावणाऱ्या पहिल्या दलितही आहेत.

By- चालू घडामोडी अंतिम सत्य


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Читать полностью
12537 पदांची महा पोलीस भरती

लेखी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी

ऑनलाईन टेस्ट सीरिज

*एकूण 20 टेस्ट*
*फी 350/-*

प्रत्येक विद्यार्थ्याला SAIMkatta चे 340 रू किमतीचे 125+ पोलीस भरती वर्गीकृत प्रश्नपत्रिका संचओमकार करिअर अकॅडमीचे मराठी व्याकरण व प्रश्नपत्रिका संच मोफत व घरपोच डिलिव्हरी

प्रवेशासाठी संपर्क:

OMKAR CAREER ACADEMY

8070903232 / 98070480875
Читать полностью
Репост из: SAIMkatta
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Репост из: SAIMkatta
फक्त पोलीस भरतीच्या अभ्याक्रमानुसार वर्गीकृत केलेले पहिले आणि एकमेव पुस्तक...

12000
पोलीस भरती
125+वर्गीकृत प्रश्नपत्रिका

पोलिस भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

संपादक-
समाधान निमसरकार

पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमानुसार
■सामान्यज्ञान
■अंकगणित
■बुद्धीमता चाचणी
■मराठी व्याकरण

28 जुलै 2020 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाईन Amazon वरसुद्धा लवकरच उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
Читать полностью
Репост из: SAIMkatta
अब्दुल रसूल कुर्बान हुसेन:-

📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.

📚 कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.

📚त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते.

📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

📚त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.

📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

युट्युब चॅनेल-https://www.youtube.com/SAIMkattaOfficial
Читать полностью
Репост из: SAIMkatta
एचसीएल टेकमध्ये अध्यक्षपदी महिला विराजमान

📚देशातील पहिल्या पाचमधील माहिती तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या अध्यक्षपदी संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर-मलहोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📚 ८.९ अब्ज डॉलरच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध तंत्रज्ञान कं पनीचे नेतृत्व करणाऱ्या रोशनी या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

📚आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्जाधीश, तरुण उद्योजक, महिला व्यावसायिकांच्या यादीत त्यांची अव्वल म्हणून नोंद झाली आहे. कंपनीतील पद व नेतृत्वबदलाची माहिती भांडवली बाजारालाही देण्यात आली.दरम्यान, कंपनीच्या समभागावर सत्रअखेर गुंतवणूकदारांच्या नफे खोरीने विक्री दबाव अनुभवला गेला.

📚एचसीएल टेक्नॉलॉजिजचे जूनअखेर तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष सप्ताहअखेर जाहीर झाले. त्याचबरोबर रोशनी या पिता शिव नाडर यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेत असल्याची घोषणाही करण्यात आली.

📚 शिव नाडर हे या पदावरून पायउतार होत असून रोशनी यांच्याकडे एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार कायम राहणार आहे. ९.९ अब्ज डॉलरच्या एचसीएल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत एचसीएल टेक्नॉलॉजिजसह एचसीएल इन्फोसिस्टिम्स, एचसीएल हेल्थके अर आदी व्यवसाय कंपन्या आहेत.

युवाध्यक्षा

📚प्रसार माध्यमांमध्ये विशेष रुची असलेल्या शिव यांच्या कन्या रोशनी या एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या संचालक मंडळात सर्वप्रथम २०१३ मध्ये रुजू झाल्या.

📚 येथे त्यांनी उपाध्यक्षपदाची भूमिकाही बजाविली. एचसीएल समूहात येण्यापूर्वी त्यांनी सीएनएनसारख्या इंग्रजी वाहिन्यांमध्ये वृत्त निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडली.

📚 एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाची माळ त्यांच्या गळ्यात वयाच्या २७ व्या वर्षीच पडली. ४० च्या आतील युवा उद्योजक म्हणून त्या फोर्ब्ससारख्या यादीत त्या झळकल्या आहेत.


स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

युट्युब चॅनेल-https://www.youtube.com/SAIMkattaOfficial
Читать полностью
Репост из: SAIMkatta
अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास एमपीएससी तयार

📚शासनातील अराजपत्रित पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. आता राज्य शासनाने निर्णय घेऊन भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

📚फडणवीस सरकारच्या काळात अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी महापरीक्षा संकेतस्थळाची निर्मिती करून ऑनलाइन परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र या प्रक्रियेदरम्यान गोंधळ आणि अनेक गैरप्रकार होत असल्याचे उमेदवारांकडून निदर्शनास आणण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने महापरीक्षा संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला.

📚या संकेतस्थळाला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया अन्य कोणत्याही पद्धतीने न राबवता एमपीएससीकडे सोपवण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे.

📚दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून सर्व शासकीय कार्यालयातील अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया राबवण्याबाबत एमपीएससीकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला एमपीएससीकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास तयार असल्याचे पत्राद्वारे १४ जुलै रोजी कळवण्यात आले आहे.

📚आता राज्य शासनाने एमपीएससीकडे अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया सोपवल्यास राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. तसेच एकूणच भरती प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकेल.

गेल्या पाच वर्षांत निर्णयच नाही:

📚एमपीएससीकडून २०१५ मध्येही अराजपत्रित पदांची आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत तयारी असल्याचे शासनाला कळवण्यात आले होते.

📚त्यानंतरच्या पाच वर्षांत शासनाच्या स्तरावर कोणताही निर्णय न होता खासगी संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे आता तरी राज्य शासन भरती प्रक्रियेची जबाबदारी एमपीएससीकडे सोपवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

📚सर्व संवर्गाच्या पदभरतीबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावास आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता या पुढील कार्यवाही शासन स्तरावर होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील भरती प्रक्रिया राबवण्याची आयोगाची तयारी आहे.

सुनील अवताडे, सहसचिव, परीक्षा पूर्व आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Читать полностью
Репост из: SAIMkatta
पोलीस दलात १२ हजार पदांची मेगा भरती:-

📚बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

📚गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

📚 डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

📚या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.


स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

युट्युब चॅनेल-https://www.youtube.com/SAIMkattaOfficial
Читать полностью
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त व लेखिका नीला सत्यनारायण यांचे निधन:-

📚महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त व लोकप्रिय लेखिका नीला सत्यनारायण यांचं आज करोनामुळे निधन झालं. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान सकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७१ वर्षांच्या होत्या.

📚१९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

📚कर्तव्यकठोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीला सत्यनारायण तितक्याच संवेदनशील होत्या. प्रशासकीय कामाच्या धबडग्यातून वेळात वेळ काढून त्या लेखनाचा छंद जोपासत होत्या.

📚नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले होते.

📚उद्योजक व्यवसायाशी संबंधित त्यांनी लिहिलेले ‘सत्यकथा’ आणि वनविभागाच्या सचिव म्हणून आलेल्या अनुभवांवरील ‘एक दिवस (जी)वनातला’ हे पुस्तकही गाजले होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलं होतं. कविता लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या होत्या.

📚 काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनही केलं होतं. सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं.

नीला सत्यनारायण यांची साहित्यसंपदा

•आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
•आयुष्य जगताना
•एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
•एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर)
•ओळखीची वाट (कवितासंग्रह)
•जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
•टाकीचे घाव
•डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
•तिढा (कादंबरी)

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Читать полностью
जून 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक

📚आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने जून, 2020 (तात्पुरता) आणि एप्रिल, 2020 (अंतिम) साठीचे भारतातील घाऊक किंमत निर्देशांक प्रसिद्ध केले आहेत.

📚घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) ची तात्पुरती आकडेवारी प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला (किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी) मागील महिन्याच्या दोन आठवड्यांच्या कालावधीसह प्रसिद्ध केली जाते आणि देशभरातील संस्थात्मक स्रोतांकडून आणि निवडक  निर्मिती उद्योगाकडून प्राप्त आकडेवारीसह संकलित केली जाते.

चलनवाढ

📚मासिक डब्ल्यूपीआयवर आधारित महागाईचा वार्षिक दर जून, 2020 मध्ये (-1.18 %) (तात्पुरता) आहे, जो मागील वर्षीच्या याच महिन्यात (जून 2019) 2.02% होता.
विविध वस्तू गटांच्या निर्देशांकाचा सारांश खालीलप्रमाणे आहे: -

प्राथमिक वस्तू

📚जून 2020 मध्ये या प्रमुख गटासाठी निर्देशांक (2.28%) वाढून 139.3 (तात्पुरता) झाला, मे 2020 मध्ये हा निर्देशांक 136.2 (तात्पुरता) होता. मे, 2020 च्या तुलनेत कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (16.30%), खाद्य वस्तू (1.7%) आणि बिगर-खाद्य वस्तू (1.71%) च्या किंमती वाढल्या. मे 2020 च्या तुलनेत खनिजांच्या किंमती (-1.72%) कमी झाल्या.

इंधन आणि ऊर्जा

📚जून 2020 मध्ये या प्रमुख गटाचा निर्देशांक (5.50%) वाढून 88.3 (तात्पुरता) झाला, मे 2020 मध्ये हा निर्देशांक 83.7 (तात्पुरता) होता. मे 2020 च्या तुलनेत खनिज तेलांच्या समूहाच्या किंमती (12.54%) वाढल्या. कोळसा आणि
विजेच्या किंमतीमध्ये काहीही बदल झाले नाहीत.

तयार उत्पादने

📚जून 2020 मध्ये या प्रमुख गटाचा निर्देशांक (0.42%) वाढून 118.6 (तात्पुरता) झाला, मे 2020 मध्ये हा निर्देशांक 118.1 (तात्पुरता) होता. मे 2020 च्या तुलनेत जून 2020 मध्ये तयार उत्पादनांच्या 22 एनआयसी दोन-अंकी गटांपैकी, अन्न उत्पादन; रेकॉर्ड केलेल्या माध्यमांचे मुद्रण आणि पुनरुत्पादन; तयार कपडे; रसायने आणि रासायनिक उत्पादने; औषधे, औषधी रासायनिक आणि वनस्पती उत्पादने; रबर आणि प्लास्टिक उत्पादने; इ. 13 गटांच्या किंमतींमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे.

📚तर, मे 2020 च्या तुलनेत जून महिन्यात पेय; तंबाखूजन्य पदार्थ; कापड; चामडे आणि संबंधित उत्पादने; लाकूड आणि लाकडाची आणि कॉर्कची उत्पादने; कागद आणि कागदी उत्पादने; यंत्रसामग्री आणि उपकरणे आणि फर्निचर यांच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. मे, 2020 च्या तुलनेत जूनमध्ये संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्पादनांचे उत्पादन स्थिर आहे.
जून, 2020 मधील डब्ल्यूपीआयची आकडेवारी सुमारे 70 टक्के प्रतिसाद दराने संकलित केली आहे.

अन्नधान्यावर आधारित घाऊक किंमत निर्देशांक

📚प्राथमिक वस्तू गटातील ‘अन्न वस्तू’ आणि तयार उत्पादने गटातील ‘अन्न उत्पादने’ यांचा समावेश असलेल्या खाद्य निर्देशांक मे 2020 च्या 146.1 च्या तुलनेत जून, 2020 मध्ये 148.6 झाला आहे. अन्नधान्य गटाच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दरात वाढ होऊन तो जून 3.05 टक्के राहिला. मे 2020 मध्ये हा दर 2.31 टक्के होता.


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Читать полностью