देशातील पहिले अशोकचक्र मराठवाड्याच्या मुक्तीसाठी!
रवींद्र केसकर, उस्मानाबाद पायाच्या मांडीत सर्रकन येऊन बंदुकीची गोळी घुसली. रक्तबंबाळ अवस्थेत पाऊलही पुढे टाकता येईना. समोरून एलएमजी गोळ्यांचा पाऊस सुरू. स्वतःला जमिनीवर फरफटत नेऊन शत्रूला एकट्याने गारद केले. गंभीर जखमी असताना रांगत जाऊन शत्रूच्या तळावर हातगोळे फेकले. ही जीवघेणी जखम अखेर जीवावर बेतली...