🏹आदित्य अकॅडमी🏹

@aditya2050 Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Maharashtra 1st Online Academy
⚛Notes
⚛Newspaper Editorials
⚛Test Series
⚛Short News
⚛New Books
⚛Govt Job Notifications
⚛Motivation
t.me/aditya2050
Admin:- @aditya345
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
17.09.2019 17:23
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
12 702
подписчиков
~4.3k
охват 1 публикации
~2k
дневной охват
~4
постов / нед.
34.2%
ERR %
3.34
индекс цитирования
Репосты и упоминания канала
8 упоминаний канала
124 упоминаний публикаций
56 репостов
GS AND CSAT SACHIN DHAWALE
GS AND CSAT SACHIN DHAWALE
MPSC UPSC Katta Bhushan Sir
😊....Reality of life....😊
🎯 माझी MPSC 🎯
NCERTeBOOK
TOPPER 777 Chalu Ghadamodi
Free
Каналы, которые цитирует @aditya2050
UMED-MPSC ✅
MPSC✍️ExamWarriors™
Bhushan Dhoot Academy
MPSC SIMPLIFIED(official)
MPSC YouTuber's
MPSC YouTuber's
MPSC YouTuber's
MPSC YouTuber's
MPSC YouTuber's
MPSC YouTuber's
House Of Books
MPSC YouTuber's
K'Sagar Publications
K'Sagar Publications
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
DNYANADEEP ACADEMY PUNE
Tax Assistant_Jadhav Sir
English Mantra
Oneness🌠
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
GDC ACADEMY
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
*देवा,अजून किती मृत्यू हताशपणे पाहायचे रे?*

*शहापूर* तालुक्यातील टाकीपठारावरचे *ढाढरे* ... १० जणांच्या एकाच कुटुंबातील ८ जण गेलेत, तेही केवळ १३ दिवसांत ...
*आता केवळ २च शिल्लक ... मुलगी वय वर्षे ९, आज्जी वय वर्षे ९०* ...
बाकी सारे थेट ढगात ...

भाबडे वनवासी बांधव आपली तपासणी करुन घ्यायला - दवाखान्यात जायला भितात, लसी टोचून घ्यायला घाबरतात ... *आपल्या भावंडांचे प्रबोधन करायला सोबतीने कोणास यायला आवडेल? हिम्मत करुन साधेल?*

*पठारावरील भविष्य वाचवलं पाहिजे* अन् त्यासाठी काही ना काही आटापिटा तरी केला पाहिजे, या एक नि एकाच भावनेनं दक्षिणेतील सारे आरामदायी प्रवास थांबवून डॉ संदीप दादा थेट ठाणे ग्रामीण पट्ट्यात गेलाय ... गेल्या ५ दिवसांत काय कळलं तर आपल्या संपर्कातील *पठारासह जव्हार-मोखाडा, पेठ-सुरगाणा सारेच जात्यात आहेत* ... यांच्यावर अन्याय झाला तरी या आपल्याच भावंडांनी कधीही टाहो फोडला नाहीये; *कारण त्यांना आवाजच नाही* ...

*आता तर मुडदे पडताहेत आणि मुडदे काहीच बोलू शकत नाहीत* ...

*गड्यांनो, येताय सोबतीला?*

संपर्क:-
अजित शिंदे
98604 51777
Читать полностью
*नैराश्य आलंच तर 'हेल्पलाईन'ची मदत घ्या*

- फोर्टिस हेल्पलाईन : ८३७६८०४१०२ (२४ तास, १४ भाषांत उपलब्ध)

- आसरा : ९८२०४६६७२६ (हिंदी आणि इंग्रजी)

- किरण मानसिक आरोग्य (शासकीय) : १८००५९९००१९ (२४ तास उपलब्ध)

- मनोबल हेल्पलाईन : ७४१२०४०३०० (मराठी)

मुंबई -
डॉ. वंदना कामत
७६७८०७४८६६
अक्षिता पाटील
९९६७७५३६९६

रत्नागिरी :
उल्का पुरोहित
९३२६६७८७८२,
सीमा कदम
९२२६५७५२४१

पुणे
अण्णा कडलासकर
९२७००२०६२१

नाशिक
योगेश अहिरे
९८८१२९०२६४

- निमहन्स : ०८० - ४६११०००७

- भारतातील समाजकार्य कार्यकर्त्यांची राष्ट्रीय संघटना व नगरच्या सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाने ८४४८४४०७७३ ही मोफत हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. ही हेल्पलाइन सकाळी ९ ते रात्री ९ याकाळात सुरू राहणार असून फोन करणाऱ्यांची माहितीही गुप्त ठेवली जाणार आहे.
Читать полностью
२८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव मांडला.

महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’, अशी वल्गना केली. विधानसभेत ‘त्रिराज्य’ स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात ‘लोकमान्य’ पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.

दिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी ‘द्वैभाषिकाची’ घोषणा केली. ‘विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ’, अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि‘या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची ‘री’ ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ ची स्थापना झाली.

ऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत ‘महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु‘यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधानी झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले.

आता तुमच्या लक्षात आलेच असेल की या चळवळीचे नाव 'अखंड महाराष्ट्र चळवळ' असे का ठेवण्यात आले आहे.
Читать полностью
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ते अखंड महाराष्ट्र चळवळ
दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६(ही संख्या आता वाढली आहे) हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले.

पार्श्र्वभूमी
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपणास १९२० पर्यंत मागे नेता येतो. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य यांची सांधेजोड करून राष्ट्रीय शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज प्रतिपादन केली. याच काळातील लोकशाही स्वराज्य पक्षाच्या (काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी) उद्देशपत्रिकेत व पक्षाच्या कार्यक्रमात भाषावार प्रांतरचनेचा आगह धरला व महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषी प्रांत व्हावा अशी घोषणा केली. १९१७ च्या कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. पट्टभी सीतारामय्या यांनी आंध प्रांत स्वतंत्र करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला अॅनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय, म. गांधी यांनी विरोध केला, तर लो. टिळक यांनी पाठिंबा दिला. म. गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्यावर १९२१ च्या नागपूर अधिवेशनात म. गांधी यांनीच ‘भाषावार प्रांतरचनेचा’ ठराव मांडला. कॉंग्रेसची फेर उभारणी भाषा तत्त्वावर केली यामुळे कॉंग्रेस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. १९२८ मध्ये कामकरी शेतकरी पक्षाने पं. मोतीलाल नेहरू कमिटीसमोर भाषावार राज्याची मागणी करून महाराष्ट्राची मागणी पुढे केली. नेहरू कमिशननेसुद्धा भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केली.

१५ ऑक्टोबर, १९३८ रोजी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ‘वर्‍हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत’ असा शब्द मुद्दाम वापरण्यात आला. कारण ‘सी. पी. अँड बेरार’ प्रांतातून वर्‍हाड वगळून त्याचा स्वतंत्र विदर्भ प्रांत करण्यात यावा अशी शिफारस मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ल यांनी केली होती. १९३९ च्या नगरच्या साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा’ प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल, त्याला ‘संयुक्त महाराष्ट्र’ असे नाव द्यावे असा ठराव झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा शब्दप्रयोग येथपासून वापरात आला. ‘सी.पी.अँड बेरार’ प्रांताच्या विधीमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी ‘वर्‍हाड’ च्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत ‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ स्थापली. १९४१ मध्ये पुण्यात डॉ. केदार यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ स्थापण्यात आली.

बेळगांव साहित्य संमेलन
दिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी ‘हरिजन’ मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. ‘भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी’, असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून ‘अकोला करार’ केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी ‘मुंबई कुणाची’ हा कार्यक‘म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची ‘जेव्हीपी’ समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्‍हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत - वर्‍हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले.
Читать полностью
👆ज्यांना प्लाझ्मा दान करायचे असेल त्यांनी मला 9763600585 वर संपर्क करा.
इमर्जन्सी मदत हवी - कोरोना पेशंट साठी * Blood Plasma

रक्त गट - B Positive

■ पेशंटचे नाव : उत्तम हरिभाऊ गायकवाड

पेशंटचे वय : 65

हॉस्पिटल नाव - इम्पल्स हॉस्पिटल, अहमदनगर

पेशंट कोविड positive आहे का : हो

पेशंट सोबतच्या 1 नातेवाईकाचे नाव- सुजित गायकवाड,
संपर्क:- 73853 84487
विद्यार्थी मित्रहो,

आपण भूतकाळात काय केले? वर्तमानकाळात काय करत आहोत? आणि भविष्यकाळात काय करणार आहोत? हे कुणीच पाहत नाही. पण या तिन्ही काळात आपण कुठे चुकलो आहोत हे पाहण्यासाठी सर्व टपून बसलेले असतात.

सध्याचा काळही असाच आपल्यावर टपून बसलेला आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पहायची,त्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी पार पाडायची असतील तर ती अधिकारी होण्याच्या आधीपासूनच पार पाडायला शिका.जर तुम्ही या संकटग्रस्त काळात मदतीला पुढे येत नसाल तर हा काळ तुम्हांला कधीच माफ करणार नाही पण यापेक्षाही मोठी शिक्षा म्हणजे तुम्ही स्वत:च स्वत:चा कधीही सामना करु शकणार नाही.

समाजात जसे चोरटे-भामटे असतात तसेच डोळ्यात मदतीची आर्त हाक घेऊन तुमच्यापुढे येणारे लोकही असतात. प्रत्येकवेळी मागणारा अभिनय करत असतोच असे नाही. पूर्वीच्या काही अनुभवांवरुन एकदम मनाची दारे बंद करु नका. माणसे वाचायला शिका. जरा खोलवर जाऊन तपास केलात तर कुणाच्या डोळ्यात लालसा आहे आणि कुणाला खरोखर मदत हवी आहे, हे तुम्हाला आपोआप उमजेलच.

Form an image in your mind of what you want to happen, then do what it takes to make it happen.

दीपक गायकवाड
संपर्क:- 9763600585
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
Читать полностью
विद्यार्थी मित्रहो,

आपण भूतकाळात काय केले? वर्तमानकाळात काय करत आहोत? आणि भविष्यकाळात काय करणार आहोत? हे कुणीच पाहत नाही. पण या तिन्ही काळात आपण कुठे चुकलो आहोत हे पाहण्यासाठी सर्व टपून बसलेले असतात.

सध्याचा काळही असाच आपल्यावर टपून बसलेला आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पहायची,त्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी पार पाडायची असतील तर ती अधिकारी होण्याच्या आधीपासूनच पार पाडायला शिका.जर तुम्ही या संकटग्रस्त काळात मदतीला पुढे येत नसाल तर हा काळ तुम्हांला कधीच माफ करणार नाही पण यापेक्षाही मोठी शिक्षा म्हणजे तुम्ही स्वत:च स्वत:चा कधीही सामना करु शकणार नाही.

समाजात जसे चोरटे-भामटे असतात तसेच डोळ्यात मदतीची आर्त हाक घेऊन तुमच्यापुढे येणारे लोकही असतात. प्रत्येकवेळी मागणारा अभिनय करत असतोच असे नाही. पूर्वीच्या काही अनुभवांवरुन एकदम मनाची दारे बंद करु नका. माणसे वाचायला शिका. जरा खोलवर जाऊन तपास केलात तर कुणाच्या डोळ्यात लालसा आहे आणि कुणाला खरोखर मदत हवी आहे, हे तुम्हाला आपोआप उमजेलच.

Form an image in your mind of what you want to happen, then do what it takes to make it happen.

दीपक गायकवाड
संपर्क:- 9763600585
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
Читать полностью
Ⓜ️4Motivation

This is one of the most valuable lessons I've ever learned. There are a large number of critics out there who all have an opinion. If you have your voice out there with your own opinion, you're sure to attract some people who like to pick fights. These are emotional vampires who will drain you dry of your resolve and self-confidence. Don't bother fighting them. It's best to just ignore them. There's no rule that says you have to pay attention to negative or combative individuals.
Читать полностью
महत्वाची सूचना
आपला अभ्यास होत असेलच यात शंका नाही.त्यामुळे वेगळे असे काही यावर्षी मी सांगत नाही आहे. आता तुम्ही सर्व जबाबदार विद्यार्थी व उद्याचे अधिकारी आहात.
आपला अभ्यास संभाळत आपली एक जबाबदारी म्हणून जिथे अत्यावश्यकता आहे त्या ठिकाणी मदतीला पुढे या. उद्या हीच कामे तुम्हांला एक अधिकारी म्हणून पार पाडावी लागणार आहे.
Репост из: Nitin Barhate
MPSC Mains | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास 4 महिन्यात कसा करावा?

http://dhunt.in/e2edu?s=a&uu=0xfcbfe492025480a6&ss=wsp
Source : "Careerनामा" by Dailyhunt
*आपल्या गृपच्या सर्व सदस्यांसाठी Mass PT Standing & Sitting Exercise*

https://youtu.be/5Y7Qmkk-1nM

लॉकडाऊनमध्ये एवढे तरी आपण नक्कीच करु शकतो.
Attached file
*बोधिवृक्ष फाऊंडेशन*

आपल्या संपूर्ण टिमसाठी आज आनंदाचा क्षण आहे. आपल्या वृक्षलागवड व संवधर्नासाठी स्थापन झालेल्या 'बोधिवृक्ष फाऊंडेशन'ची महाराष्ट्र शासनाने विशेष दखल घेतली आहे. आजच आपल्या सर्व उपक्रमाची त्यांनी मुलाखत घेऊन माहिती करुन घेतली आहे. खालील PDF मध्ये आपल्या काही उपक्रमांच्या माहितीचे फोटो अपलोड केले आहेत. (जे अगोदर शासनाकडे पाठविले आहेत)

तरी काही विद्यार्थ्यांचे व सदस्यांचे फोटो अजूनही मिळालेले नाहीत. तरी खालील उपक्रम राबवित असतांना आपले फोटो (वैयक्तिक) तर 9763600585 या माझ्या WhatsApp क्रमांकावर पाठवावे. सर्व फोटो महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.

*उपक्रम*
१) सीड्सबॉल उपक्रम
२) सेल्फी विथ ट्री
३) देशी बियाणे संग्रहण
४) कंपोस्टखत
५) वृक्षभेट
६) इतर खत निर्मिती

(वरील उपक्रमाचे फोटो पाठविता येतील जे आपण मागील ३ वर्षांपासून राबवित आहोत)

*सर्व फोटो आज रात्री ११वाजेपर्यंत पाठविता येतील*

*दीपक गायकवाड*
*बोधिवृक्ष फाऊंडेशन, मनमाड*
- संपर्क:- 9763600585
Читать полностью
पहिल्यांदाच मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी........

१) अभ्यासक्रम व बेसिक पुस्तके आधी वाचून काढा.
२) अभ्यासक्रमाच्या दोन प्रती आपल्याला रोज दिसतील अशा ठिकाणी लावा.
३) पहिल्या प्रतीवर नेहमी वाचल्या जाणाऱ्या उत्तम संदर्भ पुस्तकांची नावे उपघटकांसमोर लिहा.
४) दुसऱ्या प्रतीवर जे घटक वाचून झाले आहेत त्यांना हायलाईट करा व रिव्हिजनसाठी वापरल्या जाणाऱ्या पुस्तकाचे नाव लिहून ठेवा.
५) रोज मिळत असलेल्या तासांचे नियोजन करत वेळापत्रक आखा व ते कठोरपणे पाळा.
६) नवीन पुस्तकांना शेवटच्या टप्प्यातच पहा तोपर्यंत ते पुस्तक कसे आहे यावर इतरांकडून माहिती मिळालेली असेल.
७) आयोगाने पूर्व परीक्षेत मागील २/३ वर्षांचे प्रश्न विचारुन एक झटका दिला आहे. त्यामुळे चालू घडामोडी GSसोबत लिंक करुन अभ्यास करा.
८) प्रश्नपत्रिका सोडविण्याची घाई करु नका. उपघटक वाचून झाल्यानंतरच त्यावरील प्रश्न सोडवा. जेणेकरून एक रिव्हिजन होईल.
९) आपल्या मनात कोणत्याही शंकाना जागा देऊ नका. काहीही असेल तर त्यांचे निरसन करुन घ्या.
१०) शेवटी अभ्यास तुम्हीच करणार आहात. तेव्हा तुम्हांला जे जमेल, जे शक्य होईल तेच करा. ऐकावे जनाचे करावे मनाचे!

अभ्यासक्रम भिंतीवर लावण्यास का सांगितला जातो?

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ते बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ते बनणे हीच ती आकांक्षा होय."

२४ सप्टेंबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रासच्या (आताचे चेन्नई) पार्क टाऊनमध्ये जाहीर सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त केले होते.

'घरातल्या भिंतीवर' जे वाक्य लिहले जाते ते दिवसरात्र आपल्या नजरे समोर असते. त्यामुळे त्याचे दृढीकरण होते, व जीवनाचा तो एक भाग होतो. त्याच बरोबर त्यांनी 'शासनकर्ते असा शब्द वापरला, राजकारणी नाही. शासन ही बहुआयामी संकल्पना आहे.

शासन म्हणजे केवळ राजकारण नाही, तर शासनात लोकशाहीचे सर्व स्तंभ येतात. न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे, संसद, कायदे मंडळ या सर्वांवर आपला प्रभाव असायला हवा. तरच आपण शासनकर्ते होऊ शकतो.

दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
Читать полностью
काही विद्यार्थ्यांनी 'प्रश्नपत्रिका विश्लेषण' या गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात अनेक विद्यार्थी रोज फोन करत आहे. अर्थातच प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे अनन्य साधारण महत्व आहे.पण मित्रांनो यामुळे आपल्याला मुख्य परीक्षेसाठी दिलेला संपूर्ण अभ्यासाक्रमातील काही टॉपिक्स मागे राहता कामा नये. अभ्यासक्रमातील प्रत्येक उपघटकाचे वाचन झालेच पाहिजे. कोणत्याही उपघटकाला ऑप्शनला टाकता येणार नाही.

प्रश्नपत्रिका विश्लेषण नक्की कसे करावे?
प्रश्नपत्रिका विश्लेषणामुळे प्रत्येक उपघटकाचे योग्य प्रकारे न्याय देता येत नाही ही अनेक विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यावर काय करता येईल हे पाहूयात.
१) प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा अत्यंत साधा सोपा अर्थ म्हणजे प्रश्न कोणत्या उपघटकावर आधारित आहे व त्यासाठी कोणते पुस्तक वाचायचे.
२) ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी ऐवढे जरी केले तरी बराचसा अभ्यासक्रम कव्हर होतो.
३) रोज एका विषयाची किंवा तुम्हांला जसा वेळ आहे त्यानुसार जास्त विषयांच्या एका वर्षीच्या प्रश्नपत्रिका पहा.
४) अभ्यासक्रम समोर ठेवून प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कोणत्या उपघटकावर आला आहे ते एका वहित लिहून काढा.
५) ज्या उपघटकावर प्रश्न आला आहे फक्त तेवढाच भाग आपल्या नोट्स किंवा संदर्भ पुस्तकांतून वाचा. शक्य असल्यास मायक्रो नोट्स काढा.
६) तुम्ही रोज याप्रकारे नियोजन केले तर अभ्यासक्रमातील बराचसा भाग हळूहळू कव्हर होतांना दिसेल.
७) काही प्रश्न वेळेनुसार अपडेट करुन घ्यावे लागतील (जसे:- आकडेवारी आधारित प्रश्न, विविध निर्देशांक, पुरस्कार) तिथे इंटरनेटचा वापर नक्की करा. किंवा चालू घडामोडी पुस्तकांचा आधार घ्या.
८) दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्याअगोदर प्रश्नानुसार वाचन करतांना काढलेल्या मायक्रो नोट्सचे रिव्हिजन करा.
९) यामुळे फक्त उपयुक्त माहितीच वाचली जाईल यात शंका नाही. अनावश्यक अवांतर वाचन टळेल.
१०) वरील ८ मुद्यांपर्यंत शक्यतो क्लासेसच्या प्रश्नपत्रिकांना हात लावू नका. शनिवार-रविवार पर्यंत वाचलेल्या उपघटकांवरील अधिकचे वाचन म्हणून क्लासेसच्या प्रश्नपत्रिकांचे फक्त विश्लेषण वाचा. यामुळे तुमचे उपघटकाचे ३ वेळा रिव्हिजन शक्य आहे.
अ) अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेनुसार विश्लेषण केल्यामुळे पहिले वाचन
ब) तुम्ही काढलेल्या मायक्रो नोट्समुळे दुसरे वाचन
क) क्लासेसच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणामुळे तिसरे वाचन

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय शक्यतो क्लासेसच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यात वेळ घालवू नका. अनेक प्रश्नांमध्ये गोंधळ होईल यामुळे हे नक्की.

दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
Читать полностью
नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
आजपासून आपले सर्व जुने सेल्फ स्टडी गृप्स पुन्हा एकदा सुरु केले आहेत.

०१) ऑफिशियल चॅनेल
https://t.me/aditya2050

०२) राज्यसेवा २०२०-२१
https://bit.ly/3bbtpAU

०३) राज्यसेवा मुख्य परीक्षा
https://bit.ly/2Vny77P

०४) राज्यसेवा मुलाखत
https://bit.ly/2xq0ytQ

०५) संयुक्त परीक्षा
https://bit.ly/2Xyqezg

०६) PSI मुलाखत
https://bit.ly/2xr9lvp

०७) वनसेवा मुलाखत
https://bit.ly/3ehxXYi

०८) लेडिज स्पेशल (फक्त मुलींसाठी)
https://t.me/joinchat/WKcqFbWtl_Ir6TIv

या लिंक्स WhatsApp वर शेअर करा जेणेकरुन तुम्हांला हे गृप्स जॉईन करता येईल. अशा लिंक्स ओपन होणार नाहीत.
Читать полностью