Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
🔷'आरोग्यपथ': आरोग्यसेवा पुरवठा साखळीत आपत्कालीन पुरवठ्याच्या वास्तविक-वेळेत उपलब्धतेसाठी संकेतस्थळ
- आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत उपलब्ध व्हावा, या उद्देशाने वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) 'आरोग्यपथ' या नावाने एक राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठा साखळी संकेतस्थळ कार्यरत केले आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना हे व्यासपीठ सेवा पुरविणार.
- कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, जिथे पुरवठा साखळीत चिंताजनक व्यत्यय येत आहे, तिथे आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून "आरोग्यपथ" नावाचे माहिती व्यासपीठ विकसित केले गेले आहे.
▪️ठळक बाबी
- महत्वपूर्ण आरोग्य सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी प्रदान करणारे हे एकात्मिक सार्वजनिक व्यासपीठ ग्राहकांना नियमितपणे अनुभवाला येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.
- या समस्यांमध्ये मर्यादित पुरवठादारांवर अवलंबून असणे, चांगल्या प्रतीची उत्पादने ओळखण्यासाठी वेळ घेणारी प्रक्रिया, अपेक्षित वेळेत वाजवी दराने प्रमाणित उत्पादनांचा पुरवठा करणार्या पुरवठादारांना मर्यादित प्रवेश, नव्याने सुरु झालेल्या उत्पादनांच्या संदर्भात जागरूकता नसणे, इत्यादी समस्यांचा समावेश आहे.
- रोगनिदान प्रयोगशाळा, वैद्यकीय दुकाने, रुग्णालये इत्यादींसारख्या संभाव्य मागणी केंद्रांमधील संपर्कातील अंतरांवर मात करुन हे उत्पादक आणि पुरवठादारांना विविध ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्यास मदत करते.
---------------------------------------------------
जॉईन करा.@chaluGhadamodi