मराठी व्याकरण घटक 2 : संधी - विसर्ग संधीपोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.विसर्ग संधी१) विसर्ग उकार संधी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो.
नोट: या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो.
उदा. यशः + धन =
यशोधन मनः + रथ =
मनोरथ अधः + वदन =
अधोवदन तेजः + निधी =
तेजोनिधी मनः + रंजन =
मनोरंजन तपः + बल =
तपोबल मनः + राज्य =
मनोराज्य रजः + गुण =
रजोगुण यशः + गिरी =
यशोगिरी२) विसर्ग र् संधी विसर्गाच्या मागे 'अ/आ' खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.
उदा. निः + अंतर =
निरंतर दुः + जन =
दुर्जन बहिः + अंग =
बहिरंग दुः + आत्मा =
दुरात्मा निः + विकार =
निर्विकार धनुः + विद्या =
धनुर्विद्या निः + इच्छा =
निरिच्छा निः + लोभ =
निर्लोभ३) विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असून पुढे 'क, ख, प, फ' हे वर्ण आले तर विसर्गाचा 'ष्' होऊन संधी होते.उदा. निः + कर्ष =
निष्कर्ष दुः + काळ =
दुष्काळ निः + कारण =
निष्कारण निः + पाप =
निष्पाप निः + फळ =
निष्फळ निः + कपट =
निष्कपट दुः + कीर्ती =
दुष्कीर्ती बहिः + कृत =
बहिष्कृत दुः + परिणाम =
दुष्परिणाम बहिः + कार =
बहिष्कार👉
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N४) विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे 'क, ख, प्, फ्' ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो.उदा. रजः + कण =
रजःकण प्रातः + काल =
प्रातःकाल अधः + पात =
अधःपात इतः + पर =
इतःपर तेजः + पुंज =
तेजःपुंज इतः + उत्तर =
इतउत्तर अतः + एव =
अतएव५) पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास 'र्' चा विसर्ग होतो.उदा. अंतर् + करण =
अंतःकरण चतुर् + सूत्री =
चतुःसूत्री६) पहिल्या पदाच्या शेवटी 'स्' येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो. Join
@Marathi_Grammarउदा. मनस् + पटल =
मनःपटल तेजस् + कण =
तेजःकण👉
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N७) विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र्' तसाच राहून संधी होते.उदा. पुनर् + जन्म =
पुनर्जन्म अंतर् + आत्मा =
अंतरात्मा अंतर् + गत =
अंतर्गत पुनर् + उक्ती =
पुनरुक्ती पुनर् + उच्चार =
पुनरुच्चार८) विसर्गाच्या पुढे 'च् / छ' आल्यास विसर्गाचा 'श्' होतो. 'त् / थ्' आल्यास 'स्' होतो.उदा. निः + चल =
निश्चल दुः + चिन्ह =
दुश्चिन्ह मनः + ताप =
मनस्ताप निः + तेज =
निस्तेज मनः + चक्षु =
मनश्चक्षु९) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूची रूपे असल्यास विसर्गाचा 'स्' होऊन संधी होते.Join
@Marathi_Grammarउदा. नमः + कार =
नमस्कार पुरः + कार =
पुरस्कार वयः + कर =
वयस्कर१०) विसर्गाच्या पुढे: - च, छ आल्यास → विसर्गाचा
श् होतो
- ट, ठ आल्यास → विसर्गाचा
ष् होतो
- त, थ आल्यास → विसर्गाचा
स् होतो
उदा. अधः + तल =
अधस्तल / अधःस्थल शनैः + चर =
शनैश्चर अधः + छवि =
अधश्छवि चक्षुः + तेज =
चक्षुस्तेज रामः + टीकते =
रामष्टीकते११) विसर्गाच्या पुढे श्, स्, ष् आल्यास विसर्ग कायम राहतो.उदा. दुः + शासन =
दुःशासन निः + स्वार्थी =
निःस्वार्थी निः + संदेह =
निःसंदेह निः + संशय =
निःसंशय निः + शेष =
निःशेष१२) विसर्गाच्या मागे इ / उ असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो; परंतु पुढे पुन्हा र् आल्यास मागील र् चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. Join
@Marathi_Grammarउदा. निः + रव =
नीरव निः + रस =
नीरस📌 संस्कृत संधी व निव्वळ मराठी संधी तुलना: - मंत्र + आलय =
मंत्रालय - मंत्री + आलय =
मंत्रालय - एक + ऊन =
एकोन - एक + ऊन = एकूण
- एक + एक = एकैक
- एक + एक = एकेक
- किती + एक = कित्येक
- किती + एक = कितीक
⭐ वैशिष्ट्यपूर्ण संधी:
अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स् आल्यास, स् चा ष् होतो.
उदा.
अनु + संग = अनुषंग
📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81Nपोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.