अखेर रशियात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी, पुतिन यांनी मुलीला दिला लसीचा डोस
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या लसीची मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा याच लसीचा ड...