MPSC


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8857


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8854
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8855
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8856


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8852
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8853


जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8851


जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8846


जा. क्र. 013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022-उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.20 एप्रिल 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8842


जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी दि.2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय,नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8841


जा.क्र.351/2023 प्राध्यापक वृक्कविकारशास्त्र (Nephrology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाच्या छाननी प्रक्रियेतून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8840


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8837
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8838
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8839


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8834
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8835
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8836


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8831
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8832
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8833


पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8827


जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8826


जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ, आयुष संचालनालय संवर्गातील एक पदाच्या भरतीकरीता दि.10 मे 2023 रोजी प्रसिध्द जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8820
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8821
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8822


जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****


जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.

Показано 20 последних публикаций.