Forward from: History By Sachin Gulig
🟢 महात्मा गांधीजी 🟢
तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं! गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात. पिढ्यानपिढ्या मेल्या तुला मारुन मारुन, तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू....असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस, अरे बदनाम करुनही बधत नाहीस? असं त्यांना पुरुन उरायचं नसतं. मारलं की निमुट मरायचं असतं !!
तू ना... एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं, मारलं की निमूट मरायचं असतं...तू..जाऊदे ठिके, पुढच्या वर्षी नक्की मर,
ओके !!!
- अतुल कुलकर्णी