१) जी व्यक्ती भारतात राहात होती २) ज्या व्यक्तीचा भारताच्या राज्यक्षेत्रात जन्म झाला होता
३) ज्या व्यक्तीच्या माता-पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते
४) जी व्यक्ती संविधानाच्या सुरुवातीच्या तात्काळआधी किमान ५ वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे. अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल.
👉कलम ६- पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व.
१) अशा व्यक्तीचे माता-पिता किंवा आजी-आजोबा यापैकी कोणाही एकाचा 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९३५' मध्ये स्पष्ट केलेल्या भारतात जन्म झाला असेल किंवा
२) अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ पूर्वी भारतात स्थलांतर करून त्या स्थलांतराच्या दिनांकापासून भारताच्या राज्यक्षेत्रात राहात असेल.
३) अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ रोजी किंवा त्यानंतर भारतात स्थलांतर करून 'डोमिनियन ऑफ इंडिया' सरकारच्या अधिकाऱ्याकडे रितसर अर्ज करून भारतीय नागरिक म्हणून नोंदणी केली असेल. अशी प्रत्येक व्यक्ती संविधानाच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल. टीप : अशी व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करण्याच्या दिनांकाच्या तात्काळपूर्वी किमान ६ महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवास केल्याशिवाय तिची नोंदणी केली जाणार नाही.
👉कलम ७ - भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व : १ मार्च १९४७ नंतर जी व्यक्ती भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली आहे, ती भारताची नागरिक असणार नाही.
👉कलम ८ - मूळची भारतीय असलेल्या मात्र भारताबाहेर निवास करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व :
१) ज्या व्यक्तीचे माता-पिता किंवा आजी-आजोबा यापैकी कोणीही एक 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५' मध्ये स्पष्ट केलेल्या भारतात जन्मले होते, आणि २) अशा भारताबाहेरील कोणत्याही देशात राहणाऱ्या व्यक्तीने त्या देशातील भारताच्या राजदूत किंवा वाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रतिनिधींकडे भारतीय नागरिकत्वासाठी नोंदणी केली असेल तर ती भारताची नागरिक मानण्यात येईल.
❗कलम ९- मूळच्या भारतीय व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेले असल्यास तिचे भारतीय नागरिकत्व संपष्टात येईल