डोनाल्ड ट्रम्प वि कमला हॅरिस
दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष तांत्रिकदृष्ट्या त्या एका देशाचा राष्ट्रप्रमुख असला तरी तो जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि अर्थकारणावर प्रभाव टाकू शकतो. म्हणून कोण निवडून येणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष असते.
अमेरिकेतील द्विपक्षीय प्रणाली अमेरिकेतील नागरिकांसाठी काही बाही फरक करत असेल. पण अमेरिकेच्या बाहेरच्या जगासाठी कोण सत्तेवर येणार यामुळे फारसा फरक पडत नाही.
याचे कारण रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षात अमेरिकेच्या लष्करी, राजनेतिक, आर्थिक , व्यापारी, डॉलर विषयक आणि साम्राज्यवादी हितसंबंध केंद्रस्थानी ठेवण्यावर एकमत आहे. मग त्यांचे उमेदवार जाहीर भाषणातून काहीही बोलू देत. कोणीही निवडून आला तर फार तर फार प्राधान्यक्रम वर खाली होतील पण धोरणांचा लंबक दुसऱ्या टोकाला कधीही जात नाही.
ज्या देशात ताकदवर राज्यकर्ता वर्गाची घट्ट पकड तयार होते, त्या देशात कोण पक्ष, नेता राज्य करतो हे दुय्यम बनते. सत्ता नेहमीच राज्यकर्त्या वर्गाची असते.
_____
डोनाल्ड ट्रम्प किंवा कमला हॅरिस यांच्यापैकी कोणीही सत्तेवर आले तरी खालील मुद्द्यांवर त्यांच्यात व्यापक सहमती आहे.
१. इस्रायलच्या पाठीशी निःसंदग्धपणे उभे राहणे, इस्रायला हवा तो शस्त्रपुरवठा करणे.
२. चीनच्या जगातील वाढत्या प्रभावाला रोखणे आर्थिकच नाही तर लष्करी, राजनैतिक देखील.
३. गेल्या ३० वर्षात आपली उत्पादन केंद्रे इतर देशात हलवलेल्या अमेरिकन कंपन्यांना घरवापसी करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
४. संरक्षण सामग्रीवर चढत्या क्रमाने खर्च करतच राहणे.
५. महाकाय अर्थसंकल्पीय त्रुटी सुरूच ठेवणे
६. युनायटेड नेशन्स (युनो) , जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) यांना लंगडतच ठेवणे. नाणेनिधी (आयएमएफ) चे लोकशाहीकरण रोखून धरणे. अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या पुठ्याखाली ठेवणे
७. डॉलर या अमेरिकन चलनाची दादागिरी सुरूच राहील हे पाहणे ; आंतरराष्ट्रीय पर्यायी चलनाचे प्रयत्न हणून पाडणे
८ पृथ्वीवरील २०० हुन अधिक लष्करी / नाविक तळ सुरूच ठेवणे , त्यात भर घालणे
✍ संजीव चांदोरकर