दोनेक दिवसांपूर्वी इथं पुण्यात कौटुंबिक वादातून बहिणींनीच आपल्या ‘बाहूबली’ भावाला संपवलं..
अश्या घटना कदाचित यापूर्वीही घडल्या असतील पण आता आपल्या कृत्याच्या कबूलीसह त्याचं समर्थनही केलं जातंय..
परवा ‘हॅाटस्पॅाट’ दिलं नाही म्हणून अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीची चक्क हत्या केली कारण काय तर इतकीशी गोष्ट त्या व्यक्तीनं चक्क ऐकली नाही..
हे सगळं असं अचानक झालंय?होतंय? अजिब्बात नाही..
ज्या पद्धतीच्या वातावरणात आपण रहातोय ते सगळं बघता या आणि अश्या घटना केवळ प्रातिनिधीक आणि हिमनगाचं टोक आहेत..
प्रचंड वेगानं बदललेल्या तंत्रज्ञानामुळं सतत उत्तेजना,झटपट समाधान आणि अखंड लक्ष वेधून घेण्याची वृत्ती यामुळं ‘संयम’ नावाची गोष्ट कधीच हरवलीये..
वैयक्तिक महत्वाकांक्षा डोईजड झाल्यानं ‘स्वकेंद्रितपणा’ वाढलाये..
‘चटकन निर्णय पटकन निकाल’ या आधुनिक मंत्रामुळं वाट बघणं-वेळ देणं या गोष्टी कधीच कालबाह्य झाल्यात..
साधं ‘बीग बॅास’ नामक तथाकथित खेळाचं स्वरुप बघा ना..“आरडाओरड म्हणजे आपलं मत मांडणं,भांडण करणं म्हणजे भूमिका घेणं,समोरच्याला अपमानजनक बोलणं म्हणजे व्यक्त होणं,चिडणं म्हणजे आपलं अस्तित्व सिद्ध करणं,शिव्या देणं म्हणजे स्पष्ट बोलणं,हमरीतुमरीवर येणं म्हणजे खेळणं” स्क्रीप्टेड असेल वा नसेल मनोरंजनविश्व हे असं इतकं उथळंय..
“म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो”
या सगळ्यातून अगदी सहजपणे संयमी म्हणजे मंद,
सहनशील म्हणजे भित्रा,मितभाषी म्हणजे बावळट असं चित्र बिंबवलं जातंय..
एका बाजूला विनम्रता-सहनशीलता-औदार्य-दयाभाव या गोष्टींचं अवमूल्यन आणि दुसऱ्या बाजूला उद्धटपणा-उतावीळपणा-स्वार्थी वृत्ती-निर्दयीपणा यांचं उदात्तीकरण आणि विखारी वृत्तीचं सुलभीकरण हे ‘कॅाकटेल’ भयंकर डेडली आहेच पण हे सगळं तर आजुबाजूला घडतंय,आपलं आलबेल चाललंय असं प्रत्येकाला वाटतं हे त्याहून भयंकर आहे !
#ThursdayThoughts
- प्रज्ञावंत