Marathi Jokes मराठी जोक्स विनोद


Гео и язык канала: Индия, Маратхи


✅ मराठी जोक्स @Marathi_Jokes_vinod
✅ मराठी मिम्स @Meme_Marathi
✅ आमचा ग्रुप @Jokes_Marathi
✅ पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup
Boost : https://t.me/boost/Marathi_Jokes_vinod
Contact : @dappu
Sponsored:
t.me/boinker_bot?start=_tgr_kGrpaKA5N2Q1

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Статистика
Фильтр публикаций


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
गल्लीबोळ्यांमधे कलाकार तयार व्हावेत, हीच सरकारची इच्छा 😅


बायको: “अहो, चहात साखर कमी का टाकली?”🤨

नवरा: “साखर महाग झालीय ना!”😇

बायको: “मग चहा गोड कसा होणार?”🤔

नवरा: “तू माझ्याशी दोन गोड शब्द बोल… साखरेचा खर्च वाचेल!” 😂☕💰

😂🤣😂🤣😊


एक तरूण मुलगा मितालीला भेटायला होस्टेलमध्ये गेला. मुलांना रूम्समध्ये प्रवेश निषिध्द होता म्हणून त्याने गोड बोलून प्रवेश मिळवायचं ठरवलं.

आत शिरल्यावर त्याने इकडे-तिकडे पाहिले असता रिसेप्शनमधील सोफ्यावर एक मध्यमवयाची स्त्री दिसली.

मुलगा: मॅडम , मला आत जाऊ द्या ना प्लीज. मला मितालीला भेटायचंय.

बाई: अरे पण मुलांना आत जायला बंदी आहे ना ?
मुलगा: हो, तशी बंदी आहे पण मला जाऊ द्या, मी विनंती करतो.
बाई: का ? काय कारण ?🤔
मुलगा: अहो , मी तिला सरप्राईज देणार आहे. मी भाऊ आहे तिचा. विचार करा किती धक्का बसेल तिला. 😇
बाई: अरे, मला किती मोठा धक्का बसलाय याचा विचार कर.😧

मुलगा (कुतूहलाने): तुम्हाला का धक्का बसला मॅडम?🤔

बाई : मी आई आहे ना तिची .........😳

😂🤣😂🤣😊


जन्माष्टमीच्या संदर्भात पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता.🤨

तेव्हा नवरा गर्वाने म्हणाला: 🤔
माझ्या लहानपणी, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, शाळेत मला कृष्ण बनवण्यात आले होते!😎

बायको पुढे म्हणाली: तुझ्या शाळेतले बाकीचे सगळे मुले गोरे असतील, म्हणूनच...!!! 🫣

😂🤣😂🤣😊


लग्न झालेल्या पुरुषांचं कसं झालं माहिती आहे का? 🤔
#बायको बोलायला लागली की #नुसतं #किटकिट 🙆🥴
कोणी #दुसरी #बोलायला लागली की #कोयल #सी #तेरी #बोली. 😉🥰

#मित्र #सांगत #होता 🫣

😂🤣😂🤣😊




नवरा :- अग मी बाहेर जात आहे,
येताना काही "घेंऊंन" येऊ का..?🤔😉😎

बायकों :- येताना "घेऊन" येऊं नका
एवढंच..🤦🏻‍♀️🫣

😂🤣😂🤣😊


😎 *फॅशनचा जमाना* 😎


😜 मिडी गेली, साडी गेली,
फ्रॉक तर दिसेनासाच झाला l
बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा *पंजाब* होऊन गेला ll

😜 कुंकू गेलं, टिकली आली, तीही न्हाणी घरात गेली l
आणि अवघी न्हाणी
*सुवाशीण* झाली ll

😜 बाबा कधीच गेला, बिचाऱ्या आईनं अंथरून धरलं l
काल जन्माला आलेल मूल *मम्मी-पप्पा* बोलू लागलं ll

😜 फेटा राहिला कार्यापुरता,
गांधी टोपीचे दिवस सरत आले l
पंचविशीच्या पोरांचे
*केस* फारच पिकू लागले ll

😜 गावात रंगलेला गप्पांचा पार,
कधीचाच ओस पडला l
हिंडता फिरताना माणूस *एकटाच* बोलू लागला ll

😜 यंत्र आणि तंत्रामुळे
कष्ट फारच कमी झाले l
धक्का-धक्की च्या जीवनात *मरण* बाकी स्वस्त झाले ll

😜 कंप्युटर आणि इंटरनेटमुळे,
जग फारच जवळ आलं!
माणसांच्या या गर्दीत
*माणूसपण* हरवून गेलं ll

😜 अहो, असाकसा हा
फॅशनचा जमाना आला l
एवढी गर्दी असूनही
माणूस *एकटाच* राहिला ll

😂🤣😂🤣😊


शेजारीण: काय हो भाऊजी, आज चहा प्यायला येऊ का?

नवरा: या ना! पण चहा साधा घेणार की साखरेचा?

शेजारीण: साखरेचा चहा म्हणजे काय?

नवरा: म्हणजे साखर घातलेला नाही… साखरेच्या भावाचा विचार करून प्यायचा चहा! 😂

शेजारीण: एवढी महाग झाली का साखर?

नवरा: अहो, आता चहात दोन चमचे साखर टाकली की बायको विचारते— “चहा करतोय की मुलीचं लग्न ठरवतोय?” 🤣

बायको: आणि तुम्ही शेजारणीला रोज चहा पाजता, त्याचं काय?

नवरा: अगं, तिच्या चहात साखर कमी असते.

बायको: मग?

नवरा: तिच्याशी गोड बोलून साखरेची भरपाई करतो! 😜

😂🤣😂🤣😊


मी: "ओके गुगल, माझ्या पत्नीला कॉल करा आणि सांगा की मला आज घरी यायला उशीर होईल!"
गुगल असिस्टंट (गोड आवाजात): "सर, कोणत्या नंबरवर कॉल करू? फोनमध्ये 'बायको १' आणि 'बायको २' असे दोन नंबर सेव्ह आहेत."
मी(चकित होऊन): "अरे, माझ्या आयुष्यात तर एकच बायको आहे. हे दोन नंबर कुठून आले?"
गुगल असिस्टंट: "सर, पहिला नंबर तुमच्या खऱ्या बायकोचा आहे... आणि दुसरा नंबर 'चिऊ' नावाच्या मुलीचा आहे, जिच्याशी तुम्ही रोज रात्री ३ वाजेपर्यंत चॅटिंग करता!"
मी (घाबरून, कपाळावर घाम पुसत): "बाप रे!गुगल दीदी, प्लीज हा दुसरा नंबर डिलीट करा. माझी बायको बघेल तर अनर्थ होईल." 🥴

गुगल असिस्टंट: "क्षमस्व सर, मी नंबर डिलीट करू शकत नाही. कारण, मी तुमचा फोन आधीच तुमच्या बायकोच्या फोनशी 'सिंक' (Sync) केला आहे आणि तिनेच मला हे विचारायला लावले होते!" गुगल असिस्टंट शेवटी हळूच म्हणाली: "भावा, गुपचूप घराच्या बाहेर पळ, कारण वहिनी स्वयंपाकघरातून लाटणं घेऊन निघाल्या आहेत!" 🏃‍♂️💨

😂🤣😂🤣😊




बायको (माझा फोन चेक करताना रागाने): "अहो, तुम्ही व्हॉट्सॲपवरून 'ती' सगळी चॅटिंग का डिलीट केली? नक्की काहीतरी गडबड आहे!"🤔

मी (घाबरून, कपाळावर हात मारून): "अगं वेडे, त्यात काहीच नव्हतं. फोनची 'मेमरी' (Storage) फुल झाली होती म्हणून डिलीट केली!"🥴

बायको (टोमणा मारत): "मला शहाणपणा शिकवू नका... मेमरी फुल झाली असती तर फोन हँग झाला असता, तुमचा चेहरा नाही!" 🫣😭🥶

😂🤣😂🤣😊


Old Monk सोडून आताच कुठे आम्ही चहावर shift झालो होतो 😉

तर लगेच साखर पण महाग झाली 🫣

😂🤣😂🤣😊


दुपारचे 3 वाजले होते. सर्व मुले शिक्षक डबा खाऊन परत आपापल्या जागी येऊन बसतात. विज्ञानचे सर वर्गात येतात. तेव्हा सर्व मुले उभे राहतात. पण इथे गण्या वळवळ असतो. शिक्षक सर्वांना बसायला सांगतात तसे सर्व बसतात.

आणि गुरुजी फळ्यावर काही लिहू लागतात. थोड्याच वेळात वर्गात सगळीकडे दुर्गंधी येते सर्व मुले नाक धरतात गुरुजी पण. नाक धरून वैतागून मुलांना विचारतात

गुरुजी : कोणी रे घाण घातली वर्गात?🤔

संजू : सर गण्याने आज चण्याची उसळ खाल्ली होती आणि खाल्ल्यापासून त्याला पोटात कसे तरी होत होते. त्यानेच घातली असणार!

गुरुजी : गण्या, खरे आहे का हे? 🤔(वैतागून रागाने )

गण्या : सर मी नाही घातली. ती तर आपणच बाहेर आली. आता बरे वाटले सर 😅

हे ऐकून वर्गात हश्या पिकला. सर वैतागून रागावलेल्या चेहऱ्याने बघत राहिले.

दुर्गंधी असो वा सुगंधी शेवटी बाहेर ती तर पडणारच 🫣

😂🤣😂🤣😊


🪷

याह्या
ह्या ह्या ह्या

या हू
ह्या ह्या ह्या

आताच एक मेसेज व्हॉट्स अप वर आला.

पुणे म्हणजे प्रेम यावरून हा मेसेज पुन्हा वाचला

लय हसलो...

वाचा.

येमेनचा ३० वर्षीय शिया मुस्लिम याह्या, सुमारे ७ वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये निर्वासित झाला. काही महिन्यांनंतर त्याची भेट जेसिका नावाच्या ७३ वर्षीय जर्मन करोडपती महिलेशी झाली. त्यांनी लग्न केले.

एका पत्रकाराने त्याला विचारले की, त्याने इतक्या मोठ्या वयाच्या स्त्रीशी लग्न करण्यास कसे होकार दिला.

याह्याने उत्तर दिले: “आम्ही येमेनमध्ये शिकलो की प्रेमाला वय किंवा रूप माहीत नसते. मला जेसिकाचे निर्मळ मन आवडले; ती अद्भुत आहे.”

प्रेम आणि प्रणयाने भरलेल्या ६ वर्षांच्या सहवासानंतर जेसिकाचे निधन झाले आणि याह्याने तिच्यासाठी एका भव्य अंत्यविधीचे आयोजन केले.

काही दिवसांनंतर, याह्याला हॅम्बर्ग शहर परिषदेकडून एक पत्र मिळाले, जे जेसिकाचे मृत्युपत्र होते. त्यात लिहिले होते:

"नमस्कार माझ्या प्रिय याह्या, मला खूप आनंद आहे की तू माझ्या आयुष्याच्या या शेवटच्या वर्षांमध्ये माझ्यासोबत होतास आणि मी ते कधीही विसरणार नाही.

"मला तुला हेही सांगायचे होते की मी माझी संपूर्ण संपत्ती दानधर्म करणाऱ्या संस्था आणि बेघरांना दान केली आहे, कारण तू त्या वयात माझ्यावर प्रेम केलेस तेव्हा तुझ्याकडून मी माणुसकी शिकले."

क्रेडिट : क्षणस्थलीन बाकी शून्यच

😂🤣😂🤣😊


*चौथा पेग भरायचा नाही.* 🤓

बायको सिरीयल बघत होती. कुकरच्या तीन शिट्ट्यांचा आवाज ऐकून बाबाने धावत जाऊन कुकरचा गॅस बंद केला.

बायको : आत जाऊन काय केलंत? 🤔

बाबा : तू सिरीयल बघत होतीस. तुला उठायला लागू नये म्हणून कुकरचा गॅस बंद केला .😇

*बायको : तीन पेग ऑलरेडी झाले आहेत. आता चौथा भरायचा नाही.*

बाबा : अग,पण त्याचा काय संबंध? 🤔

बायको : तीन शिट्ट्या शेजारच्या घरात झाल्या. *आपल्या गॅसवर काहीही ठेवलेलं नाही. गॅस बंदच होता.* 🫣
🥃🥃🥃

😂🤣😂🤣😊


मी याला सांगणार होतो की हा AI चा क्लास मोठ्यांसाठी आहे ..
पण नंतर कळलं की हा पोरगाच आपला ट्रेनर आहे ..🫣

😂🤣😂🤣😊


“चहा कडक असला तरी चालेल…
पण साखरेचा भाव ऐकून आता चेहराच गोड ठेवावा लागतो! 😂☕

मित्तर, गोडवा जपून वापर… 😉
साखर झालीय सत्तर! 🫣”

😂🤣😂🤣😊


.. पुढच्या महिन्यापासून सगळं *बरं* होईल असं दिसतय.. 😉

सप्टें→"बर"
ऑक्टो→"बर"
नोव्हें→ "बर"
डिसें→"बर"

😂🤣😂🤣😊


जो पर्यंत शूर्पणखेच्या कापलेल्या नाकाचा तुकडा सापडणार नाही 😉

नाशिकचं खोदकाम थांबणार नाही 🫣

😂🤣😂🤣😊

Показано 20 последних публикаций.