चालू घडामोडी 2025


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Экономика


Admin : @ChaluGhadamodiAdmin
महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Экономика
Статистика
Фильтр публикаций


गट ब सध्या Cutoff बाबत बरेच Message आले आहेत काही Tension घेऊ नका निवांत रहा

नक्की Result येईल आणि कोणाच्या अंदाजित Cutoff वर तर अजिबात विश्वास ठेवू नका

❗️Mains चा अभ्यास सुरू करा❗️

आणि ज्यांना Cutoff बाबत शंका असेल त्यांनी गट क चा अभ्यास करायला हरकत नाही


7b4cea01-5368-43ee-8743-f04525634875.pdf
480.4Кб
◾️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

◾️ प्रथम उत्तरतालिका आलेली आहे.

📝 गट ब पेपर 👇
https://t.me/ChaluGhadamodi2023/90835


◾️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत़

◾️सुधारित दिनांक - 21 सप्टेंबर 2025


Coast_Guard_CGEPT_02_2025_Detailed_Notification_SarkariResult_Com.pdf
959.5Кб
🔔 भारतीय तटरक्षक दल ICG नाविक GD
भरती 2025


◾️अर्ज सुरू: 11 फेब्रुवारी 2025
◾️शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2025
◾️परीक्षा फी - 300 रुपये
◾️पात्रता - 12 वी उत्तीर्ण

🎯अर्ज करणे 11 तारीख ला सुरू होईल
https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/


#MorningBooster

🤩 लतिका कट्ट यांचे निधन
◾️भारतीय शिल्पकार
◾️जन्म - 20 फेब्रुवारी 1948 संयुक्त प्रांत , भारत
◾️वयाच्या 76 व्या वर्षी निधन (जयपूर)
◾️कट्ट हे भारतातील सर्वात प्रतिभावान शिल्पकारांपैकी एक होत्या
◾️वाराणसी येथील दशॉमेठ घाट येथे मकर संक्रांती" या तिच्या कांस्य कामासाठी तिला बीजिंग आर्ट बिएनाले पुरस्कार मिळाला होता
◾️अनेक वर्षे त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया आणि बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापन केले
◾️1980 - राष्ट्रीय पुरस्कार, ललित कला अकादमी, नवी दिल्ली
◾️1973 -गुजरात राज्य ललित कला अकादमी, अहमदाबाद
◾️1974 - अखिल भारतीय ललित कला आणि हस्तकला सोसायटी, नवी दिल्ली
◾️1974 - ललित कला अकादमी, कलकत्ता

🤩 पहिल्या जागतिक पिकलबॉल लीगचे विजेते - बेंगळुरू जवान्स
◾️विजेता - बेंगळुरू जवान्स
◾️उपविजेता - पुणे युनायटेड
◾️3 -1 असा पराभव केला


🤩 आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची अधिकृत स्थापना करण्यात आली
◾️इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) अधिकृतपणे एक करार-आधारित, आंतर-सरकारी संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे
◾️मुख्यालय - भारत 🇮🇳

🤩IBCA चे संस्थापक सदस्य 5 देश
◾️निकाराग्वा
◾️इस्वातिनी
◾️भारत
◾️सोमालिया
◾️लायबेरिया
◾️आतापर्यंत, भारतासह 27 देशांनी IBCA मध्ये सामील होण्यास संमती दिली आहे
◾️9 एप्रिल 2023 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात IBCA सुरुवात केली(बंदिपूर राष्ट्रीय उद्यानातून (कर्नाटक) येथून)
◾️29 फेब्रुवारी 2024 केंद्रीय मंत्रिमंडळाने IBCA स्थापनेला मंजुरी दिली

🤩 या उपक्रमाचा मुख्य उद्देश
◾️ वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्यूमा 🐆🐅🤩
◾️या सात प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संवर्धन करणे आहे.🤩
◾️29 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, सरकारने IBCA स्थापनेला अधिकृतपणे मान्यता दिली


🤩 आजच्या काही Oneliner
◾️जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) ने मिचिबिकी क्रमांक 6 उपग्रह वाहून नेणारे पाचवे H-3 रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित🚀 केले.
◾️चीनने बनवलेला कृत्रिम सूर्य 🌞 1000 सेंकंदापर्यत जळत रहाण्याचा विक्रम केला (एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामॅक (EAST) )
◾️चिनी अंतराळवीरांनी 🇨🇳 तियांगोंग अंतराळ स्थानकावरील चीनच्या शेन्झोउ-19 क्रूने "कृत्रिम प्रकाशसंश्लेषण" 🍀 तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रथमच ऑक्सिजन आणि रॉकेट इंधनासाठी घटक तयार केले आहेत.
◾️भारतीय रेल्वे 🚂 ने 2030 पर्यंत 3000 दशलक्ष टन (MT) मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
◾️मध्यप्रदेशात भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मंजूर (गोविंदगड, रेवा जिल्हा, मध्यप्रदेश)


🤩 67 व्या ग्रॅमी पुरस्कार 2025 -भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडन यांना मिळाला
◾️अल्बमत्रिवेणी साठी पुरस्कार
◾️श्रेणी -'बेस्ट न्यू एज अल्बम, अँबियंट किंवा चांट अल्बम श्रेणी'
◾️त्यांचा हा पहिला ग्रॅमी पुरस्कार
◾️त्रिवेणी अलब्म साठी - चंद्रिका टंडन, वूटर केलरमन आणि एरु मात्सुमोटो या तिघांना पुरस्कार मिळाला आहे
◾️यामधील वूटर केलरमन (द आफ्रिका) बासरीवादक यांना 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे
◾️2011 मध्ये त्यांच्या सोल कॉल अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.  
◾️जन्म - चेन्नई
◾️शिक्षण - इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट - अहमदाबाद येथे

🎼 ग्रॅमी पुरस्कार 🎼
◾️सुरवात - 4 मे 1959
◾️संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार
◾️त्यांना मूळतः ग्रामोफोन पुरस्कार असे म्हटले जात होते
◾️नॅशनल अकादमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस , अमेरिका द्वारे दिला जातो
🎺 भारतातील ग्रामी पुरस्कार काही विजेते
◾️1968 पंडित रविशंकर, प्रख्यात भारतीय सितार कलाकार आणि संगीतकार, भारतातील पहिले ग्रॅमी पुरस्कार विजेते होते.
◾️रविशंकर - 5 ग्रामी पुरस्कार
◾️झाकीर हुसेन- 4 ग्रामी पुरस्कार
◾️रिकी केज - 3 ग्रामी पुरस्कार
◾️ए आर रेहमान - 2 ग्रामी पुरस्कार
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥


◾️ PHASE 2 पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध..

◾️ नवीन शिक्षक भरती करण्यासाठी TAIT परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाला सादर




🎯 Amazon offer शेवटचे काही तास बाकी

🍐पोलीस भरती ग्रंथ - भाग 1 व 2 🍐

🎺1260 रु.चे पुस्तक फक्त 635 रु मध्ये

❗️ मागील वर्षी निवड झालेल्या प्रत्येक पोलिसाने वापरलेले 44,000+⌨️

📚 44,000+ या पुस्तकाची नवी आवृत्ती

👼Fully अपडेटेड. मुंबई पेपर सह
👼सर्व विषय समाविष्ट
👼प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तकं

🛒 Amazon link 👇
https://amzn.in/d/eHyaShp
( फ्री delivery, cash On डिलिव्हरी )

📚 सर्व प्रमुख पुस्तक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध
(यापेक्षा जबरदस्त, दर्जेदार पुस्तक दुसर आढळलं तर तेच घ्या)


Konkan_Ad.pdf
860.9Кб
“कोकण” विभाग लेखा कोषागारे भरती 2024
जागा - 179

अर्ज करण्याची लिंक:-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html

अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025 


#NewsBooster

🤩 19 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्राल विजयी ठरला
◾️विजेता संघ - महाराष्ट्र (16 धवांनी विजयी)
◾️उपविजेता संघ - उत्तरप्रदेश
◾️ठिकाण - बीएन क्रिकेट अकादमी मैदान उदयपूर -राज्यस्थान
◾️महाराष्ट्र कर्णधार - आरोही बांबोडे
◾️सामनावीर - प्रांजली पिसे
◾️महाराष्ट्र - 138 धावा ( 20 षटकात)

🤩 87 वी टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2025
◾️विजेता - आर. प्रज्ञानंद
◾️उपविजेता - वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश
◾️ठिकाण - विजेक आन झी - नेदरलँड


🤩 आजच्या Oneliner
◾️चीन आणि अमेरिकेनंतर भारताकडे जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क आहे
◾️महाराष्ट्र केसरी कुस्तीत गैरवर्तणुकीबद्दल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने तीन वर्षांची बंदी घातली
◾️केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23778 कोटी रुपयांची तरतूद

🤩 WHO सध्या खूप चर्चेत आहे
◾️अमरिकेने याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चेत आहे
◾️WHO ( World Health Organisation )
◾️WHO ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे
◾️मुख्यालय : जीनेव्ह ( स्वित्झर्लंड)
◾️स्थापना : 7 एप्रिल 1948
◾️अध्यक्ष :टेड्रोस अधानंम
◾️सदस्य :194 देश
◾️भारत देश याचा सदस्य आहे
◾️अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अमेरिकेला बाहेर काढण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. (20 जानेवारी 2025)


🤩 राज्यघटनेच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन
◾️कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी प्रकाशन केले.
◾️संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त
◾️या प्रकल्पात शंकरा आय हॉस्पिटल बेंगळुरू आणि सीआयआय यंग इंडियन्स (वाई) बेंगळुरू यांचे सहकार्य


🤩 संविधान बद्दल या गोष्टी पाहून घ्या
◾️26 नोव्हेंबर 1949 भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले
◾️26 जानेवारी 1950 संविधान अंमलात आले
◾️भारतीय संविधान स्वीकारण्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ उद्यापासून सुरू होणार ऐतिहासिक वर्षभराचा उत्सव शासनाने सुरू केला आहे
◾️थीम - हमारा संविधान, हमारा स्वाभिमान
◾️constitution75.com ही वेबसाईट पण शासनाने बनवली आहे
भारतीय
◾️भारतीय संविधानाचे  संस्कृत आणि मैथिली भाषेतील अनुवाद करण्यात आला (26 नोव्हेंबर 2024 ला)
◾️2015 पासून देशात 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिवस म्हणून साजरा होतो
◾️सरकारने जुन्या संसद भवनाचे नाव बदलून संविधान सदन असे ठेवले आहे.

🤩 हे व्यवस्थित वाचा
◾️1949 मूळ संविधान - इंग्रजीमध्ये संविधान लिहिले गेले
◾️घनश्याम गुप्ता (31 सदस्य) समितीने या इंग्रजी भाषा संविधानाचे रूपांतर हिंदी भाषेत केले
◾️घनश्याम गुप्ता - हे छत्तीसगड चे होते
◾️24 जानेवारी 1950 रोजी घनश्याम गुप्ता यांनी संविधानाची अनुवादित हिंदी प्रत डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली.
◾️संविधान सभेने कलम 344 अंतर्गत संविधानाचे हिंदीमध्ये भाषांतर करण्याची तरतूद केली. 
◾️24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन प्रतींमध्ये भारतीय संविधानावर स्वाक्षरी केली


🥲आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण 💙 वाचून झोपा रे एवढं ❤️
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥


आता उर्वरित परीक्षा काहीच दिवसात होत आहेत.🔥🔥

सर्व TCS पॅटर्न परीक्षांसाठी वरील बॅच उपयुक्त आहे.

⭐️ खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच मी उपलब्ध करून दिली आहे.


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272


#RTI
♦️राज्यसेवा जागा सद्यस्थिती 4 फेब्रुवारी 2025 ला आलेले उत्तर..

TOTAL जागा : 401


51e0d995-e337-44c3-9a96-9614a31f9c8b.pdf
959.5Кб
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे


#MorningBooster

😀 सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक वेळ अंतराळात चालण्याचा विक्रम केला
◾️Space Walk - 16 जानेवारी
◾️वेळ - 62 तास आणि 6 मिनिटे.
◾️सुनीता विलियम्स यांचा 9 वा स्पेस वॉक ठरला
◾️त्यांनी पेगी व्हिटसनने यांचा 60 तास 21 मिनिटांचा विक्रम मोडला

🥷 International Space Station (ISS) मधून बाहेर येऊन  सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी 6.5 तासांसाठी स्पेसवॉक केला
◾️सुनीता विलियम्स यांचा नववा स्पेस वॉक ठरला
◾️बुच विल्मोर यांचा पाचवा स्पेस वॉक ठरला
◾️सर्वात जास्त अंतराळात दिवस पेगी व्हिटसन यांनी घालवले आहेत - 675 दिवस


👍 सुनीता विल्यम्स कधी गेल्या आहेत
◾️5 जुन ला अंतराळात गेल्या 👩‍🚀
◾️सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघे जण
◾️बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाने गेल्या
◾️26 जून ला परत येणार होत्या
◾️अंतराळ यान ISS वर पोहोचल्यानंतर काही वेळातच यानातून हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले.
◾️हे बोइंगचे स्टारलाइनर हे - 6 सप्टेंबर रोजी अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतले
◾️त्यामुळे आजून अंतराळात आडकले आहेत

🤩 अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 भारताने जिंकला
◾️विजेता संघ - भारत
◾️उपविजेता - दक्षिण आफ्रिका
◾️ठिकाण - बायुमास ओव्हल (क्वालालंपूर मलेशिया)
◾️सामना दिनांक - 02 फेब्रुवारी 2025
◾️दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने विजय
◾️भारताचे कर्णधार - निकी प्रसाद
◾️दक्षिण आफ्रिकेची कर्णधार - कायला रेनेके
◾️एकूण संघ - 16 होते
◾️सर्वाधिक धावा - गोंगाडी त्रिशा 425 धावा (भारत)
◾️सर्वाधिक विकेट्स - वैष्णवी शर्मा 17 विकेट
◾️सामनावीर आणि मालिकावीर - गोंगाडी त्रिशा (तेलंगणा च्या आहेत)
◾️2027 ची स्पर्धा बांगलादेश आणि नेपाळ मध्ये होणार आहे
◾️सलग दोन्ही स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत (2023 आणि 2025)
◾️BCCI ने 5 करोड रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे

🏏 पहिली U19 -T20 2023
◾️विजेता - भारत
◾️उपविजेता - इंग्लंड
◾️ठिकाण - दक्षिण आफ्रिका
◾️संघ - 16


🤩 आजच्या Oneliner
◾️जागतिक पाणथळ दिवस - 4 फेब्रुवारी 2025 (थीम - Protecting Wetlands for Our Common Future.)
◾️बेल्जियमचे नवीन पंतप्रधान - बार्ट डी वेव्हर
◾️हरियाणा कॅडरचे IPS अधिकारी शशांक आनंद यांची जम्मू ते कठुआ पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काम करणाऱ्या जम्मू फ्रंटियरसाठी सीमा सुरक्षा दलाचे (BSF) नवीन महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🤩 एकुवेरिन संयुक्त लष्करी सराव ' - भारत-मालदीव
◾️ठिकाण - मालदीव
◾️दिनांक - 2 फेब्रुवारी 2025 ला सुरू
◾️13 वी आवृत्ती
◾️14 दिवसांचा युध्द अभ्यास आहे
◾️भारत आणि मालदीवमध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो
◾️दिवेही भाषेत 'एकुवेरिन' म्हणजे 'मित्र' असा अर्थ होतो (दिवेही ही मालदीव ची अधिकृत भाषा आहे)
◾️2023 ला हा सराव उत्तरप्रदेश मध्ये आयोजित केला होता


🤩 GK Booster
अंतराळ संस्था  देश आणि त्यांची नावे

◾️रशिया - Roscosmos
◾️अमेरिका - National Aeronautics and Space Administration
◾️सौदी अरेबिया - Saudi Space Commission
◾️जपान - Japan Aerospace Exploration Agency
◾️UAE - Mohammed bin Rashid Space Centre
◾️बांगलादेश - Space Research and Remote Sensing Organization
◾️इजिप्त - Egypt Remote Sensing Center
◾️बहरीण - National Space Science Agency
◾️स्पेन - Instituto Nacional de Técnica Aeroespacial
◾️जर्मनी - German Aerospace Center
◾️चीन - China National Space Administration
◾️पाकिस्तान - Pakistan Space and Upper Atmosphere Research Commission
◾️ऑस्ट्रेलिया - National Space Program
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥


RRBNTPCAll SHIFT 2019.pdf
117.1Мб
➡️ RRB #NTPC 2019 झालेले पेपर..

◾️ झालेले पेपर पाहून घ्या..
◾️ यावेळी पेपर मराठी मध्ये होईल.

⚡️अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)

👼गणित 30 प्रश्न
👼बुद्धिमत्ता 30 प्रश्न
👼GK 40 प्रश्न

➡️ अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
👼गणित 35 प्रश्न
👼बुद्धिमत्ता 35 प्रश्न
👼GK 50 प्रश्न


💘 मराठी भाषेबद्दल या गोष्टी वाचून घ्या

◾️1 मे : महाराष्ट्र दिन
◾️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'
◾️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’
➖➖➖➖
◾️1 मे महाराष्ट्र स्थपणा दिवस
◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर)
◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा
◾️मराठी भाषा मंत्री - उदय सामंत
◾️पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार : 1955 साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला

◾️भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा
⭐️पहिला क्रमांक - हिंदी
⭐️दुसरा क्रमांक - बंगाली
⭐️तिसरा क्रमांक - मराठी
⭐️चौथा क्रमांक - तेलगू

◾️मराठी भाषा भवन - जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) मुंबई येथे उभारले जात आहे


❗️मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा❗️
◾️3 ऑक्टोबर 2024 ला
◾️मराठी सोबत एकूण 5 भाषांना मराठी , पाली , बंगाली , आसामी , प्राकृत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला
◾️सध्या एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे

-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥


#NewsBooster

🤩 'सन्मानाने मरण्याचा अधिकार' देणारे कर्नाटक भारतातील दुसरे राज्य बनले
◾️31 जानेवारी ला निर्णय
☑️पाहिले राज्य - केरळ
☑️दुसरे राज्य - कर्नाटक
◾️कर्नाटक सरकारने, सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी 2023 च्या निर्णयाचे पालन केले आहे
◾️यामध्ये इच्छामरणाचा समावेश होत नाही
◾️बरे होण्याची आशा नसलेल्या किंवा अशा गंभीर आजारी रूग्णांसाठी 'सन्मानाने मरण्याच्या अधिकाराला' परवानगी दिली आहे
◾️कर्नाटक सरकारने खासगी आणि सरकारी रुग्णालयांसाठी हा आदेश जारी केला आहे
◾️कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी याची घोषणा केली
📝 सर्वोच्च न्यायालय निकाल 2018 आणि 2023 निर्णय
◾️राईट टू डाय विथ डिगनीटी" 2023
◾️घटनेच्या कलम 21 नुसार सन्मानाने मरण्याचा अधिकार मान्य केला
◾️गंभीर आजारी रुग्णाला जीवनरक्षक औषधांचा लाभ मिळत नसेल आणि सुधारणा होण्याची आशा नसेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो


🤩 आजच्या Oneliner
◾️ 67 वा ग्रॅमी पुरस्कार भारतीय अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडन यांना 'त्रिवेणी' अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज, अॅम्बियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला
◾️रशियाच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष (रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह) व्याचेस्लाव वोलोदिन भारताच्या दौऱ्यावर आहेत
◾️ऑल इंडिया रेडिओ आणि संस्कृती मंत्रालयाने शास्त्रीय संगीत मालिका 'हर कंठ में भारत' लाँच केली.


🤩 न्यूझीलंडमधील माऊंट तारानाकी ह्या पर्वताला व्यक्ती कायदेशीररित्या घोषित करण्यात आले
◾️एखाद्या व्यक्तीप्रमाणे समान कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आला आहे
◾️पूर्वीचे नाव - माउंट एग्मोंट
◾️आताचे नाव- तारानाकी मौंगा
◾️हा पर्वत एक सुप्त ज्वालामुखी आहे
◾️तेथील स्थानिक आदिवासी माओरी लोकांसाठी पर्वताचे महत्त्व मान्य करत हा कायदा केला
◾️पर्वताला कायदेशीर नाव देऊन आणि त्याच्या सभोवतालच्या शिखरांचे आणि जमिनीचे संरक्षण कायदा न्यूझीलंड संसदेत मंजूर केला गेला
💡 हे एकदा पाहून घ्या
◾️ते उरेवरा राष्ट्रीय उद्यान न्यूझीलंड -एखाद्या व्यक्तीसारखे समान कायदेशीर अधिकार दिले जाणारे जगातील पहिले नैसर्गिक संसाधन बनले आहे (2024 )
◾️वांगानुई नदी न्यूझीलंड - 2017 मध्ये या नदीला व्यक्तिप्रमाणे कायदेशीर अधिकार दिले गेले

🥁आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण 💙 वाचून झोपा रे 🎯
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥


🔔GATE 2025 ADMIT CARD

🌐 DOWNLOAD Link -
https://goaps.iitr.ac.in/login


Difficulty level:-

2020 moderate
2021 moderate
2022 easy
2023 easy to moderate
2024 easy to moderate

vacancies:-

Year      STI    ASO
2020:-   89     67
2021:-   609   100
2022:-   78     42
2023:-   159   70
2024:-   480 (OEOC)

Cut off:- open male

Year    STI       ASO
2020   53.75   54.75
2021   46.50   53.75
2022   61         62.75
2023   54.25    54.25

2024  ??

Показано 20 последних публикаций.