*कॉम्रेड सीताराम येचुरी यांना समर्पित*
हा जो देह निस्तेज पडला आहे
त्यानं केलंय स्वतःचं दान
शोध अन् शैक्षणिक उद्देशासाठी
या शरीराच्या
आजूबाजू उभारून
एनॉटमी शिकतील जे
त्यांना माहित असायला हवं की,
प्राण असताना
हे शरीर
भरून राहायचं अक्षय्य ऊर्जेनं
कायम
खेळकर राहिलाय हा चेहरा,
बेरंग ऋतुंमध्ये ही
की,
अतूट प्रतिबद्धता राहिलीय
या शरीराची
गणतांत्रिक सप्नांसाठी
अभ्यासू चिकित्सकानों,
तुम्हाला माहिती हवं की,
याचे जे डोळे आहेत ना
संघर्षाच्या अथक चेतनेने भारलेले होते
अभ्यासू चिकित्सकानों ,
चाकू लावा या शरीराला
पण
जरा आदरानं अन् सन्मानानं
आमच्या काळाच्या
एक महान नेत्यानं
तुम्हाला उजळवण्यासाठी
स्वतःला पेश केलय
- *प्रीती चौधरी*
मराठी अनुवाद- *सुदेश इंगळे*
हा जो देह निस्तेज पडला आहे
त्यानं केलंय स्वतःचं दान
शोध अन् शैक्षणिक उद्देशासाठी
या शरीराच्या
आजूबाजू उभारून
एनॉटमी शिकतील जे
त्यांना माहित असायला हवं की,
प्राण असताना
हे शरीर
भरून राहायचं अक्षय्य ऊर्जेनं
कायम
खेळकर राहिलाय हा चेहरा,
बेरंग ऋतुंमध्ये ही
की,
अतूट प्रतिबद्धता राहिलीय
या शरीराची
गणतांत्रिक सप्नांसाठी
अभ्यासू चिकित्सकानों,
तुम्हाला माहिती हवं की,
याचे जे डोळे आहेत ना
संघर्षाच्या अथक चेतनेने भारलेले होते
अभ्यासू चिकित्सकानों ,
चाकू लावा या शरीराला
पण
जरा आदरानं अन् सन्मानानं
आमच्या काळाच्या
एक महान नेत्यानं
तुम्हाला उजळवण्यासाठी
स्वतःला पेश केलय
- *प्रीती चौधरी*
मराठी अनुवाद- *सुदेश इंगळे*