पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन
बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दिनांक २०,२१,२२ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुणे महानगरपालिका व संवाद पुणे यांच्या मार्फत भरविण्यात येत आहे.संमेलन अध्यक्ष मा.श्री.शेखर गायकवाड अति महासंचालक यशदा, स्वागताध्यक्ष मा.श्री.राजेन्द्र भोसले महापालिका आयुक्त पुणे आणि निमंत्रक मा.श्री.सुनिल महाजन संवाद पुणे हे राहणार आहेत.या संमेलनाच्या चर्चासत्र व परिसंवाद मध्ये अनेक माजी व आजी अधिकारी सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या संमेलनात २५ आयएएस अधिकारी विविध सत्रात सहभागी होणार आहेत.