सत्या नाडेला यांचे वडील बी एन युगंधर हे देशातील नावाजलेले प्रशासक होते. १९६२ साली त्यांची IAS म्हणून निवड झाली. ग्रामविकास या विषयाचा ध्यास घेऊन त्यांनी काम केले. विशेष म्हणजे ते डाव्या विचारसरणीने प्रभावित होते. त्यांची सचोटी व कामसू स्वभावामुळे पुढे ते लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी (LBSNAA) चे संचालक झाले.
सत्या हा त्यांचा एकुलता एक मुलगा. तो समजा प्रशासनात आला असता व IAS अधिकारी म्हणून काम केले असते व तर महिन्याला सर्वाधिक म्हणजे अडीच लाख रुपये वेतन मिळवले असते (म्हणजे वर्षाला 30 लाख)
सत्या यांचे सध्याचे वेतन त्याच्या 221 पट अधिक आहे. नुसता पैशाचा मुद्दा नाही. ते जगाच्या कार्यक्षमतेत महत्त्वाची भर घालत आहेत. हा पैसा त्यांनी आपल्या कर्तुत्वाने व बुद्धीचा सुयोग्य वापर करून मिळवला आहे.
हे दोघे (वडील व मुलगा) एक प्रकारे गतभारत व नवभारताचे प्रतीक आहेत.
एकीकडे समाजवादी देशात डाव्या विचारांनी प्रभावित होऊन प्रशासनात कामगिरी करणारे वडील, दुसरीकडे भांडवलशाही देशात मोठ्या भांडवली कंपनीत सीईओ म्हणून काम करणारा मुलगा, दोघे आपापल्या परीने योग्य आहेत.
✍ भूषण देशमुख