जेंडर बजेटिंग
विनियोगावर ठरणार यशापयश!
‘भारतीय स्त्रियांचा एकूण कामगार वर्गातील खालावलेला सहभाग’ लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक, ३.२७ लाख कोटी रुपयांचा निधी हा स्त्रियांसाठीच्या विविध योजनांसाठी जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागांतील रोजगारनिर्मिती, उद्याोजिका घडवणे, नोकरदार स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणाघरे उघडणे, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान आदी क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग वाढवणे, या उपक्रमांद्वारे स्त्रियांच्या सक्षमीकरणाला बळकटी देण्याचा प्रयत्न असला तरी या निधीचा योग्य विनियोगच त्याचे यशापयश ठरवणार आहे.