*नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला*
सोलापूर : सोशल मीडियाद्वारे व व्हॉट्सॲपवर साधा कॉल, मोबाईल कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून हिंदी, इंग्रजीत बोलून समाजातील बदनामीची व अटकेची, गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून अनेकांची फसवणूक केली जात आहे. याशिवाय शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून एका महिन्यात २०० ते ३०० पट नफा कमाविण्याचेही आमिष दाखवून फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांकडून भीती दाखविले जाणारे दहा फंडे स्पष्ट केले असून त्यापासून सतर्क राहण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.
सायबर गुन्हेगार सुरवातीला मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे किंवा व्हॉट्सॲपवर लिंक पाठवतात. लिंक उघडल्यावर त्यावेळी तुमचा मोबाईल आपोआप सायबर गुन्हेगाराकडून हॅक केला जातो. तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेतली जाते. फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरचॅट, व्हॉट्सॲप बऱ्याच दिवसांपासून वापरत नाहीत म्हणजे त्याचे टु स्टेप प्रमाणीकरण (व्हेरिफिकेशन) झालेले नसते. अशी सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक करून त्यातील लोकांचे फोटो एडिट (मॉर्फिंग) करून, अश्लील व्हिडिओ, बदनामीकारक मेसेज आपल्या ओळखीच्या व्यक्तींना पाठविण्याची धमकी दिली जाते. त्यातून समाजात बदनामी होईल, गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखविली जाते. पण, अशा धमक्यांना व आमिषाला कोणीही बळी न पडता तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी, असेही आवाहन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारांकडून दाखविली जाणारी भीती...
●तुमचे बनावट सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहे.
●तुमच्या बॅंक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाले आहेत.
●तुमच्याकडून इन्कमटॅक्स नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
●तुम्हाला पोलिस कोणत्याही क्षणी अटक करतील.
●तुमच्या नावावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
●आम्ही क्राईम ब्रॅंच मुंबई- दिल्लीतून तसेच इडी कार्यालयातून बोलत असून तुमच्या नावाने अटक वॉरंट निघाले आहे.
●तुमच्या बॅंक खात्याची चौकशी सुरू होणार आहे किंवा चौकशी सुरू केली आहे.
●तुमच्या बॅंक खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत.
●तुमचे किंवा तुमच्या मुलाचे रेप केसमध्ये नाव आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
●तुमचा मोबाईल क्रमांक पॉर्न व्हिडिओ बनविणाऱ्या ग्रुपमध्ये मिळून आला आहे.
*प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहावे*
विविध प्रकारची भीती दाखवून सायबर गुन्हेगार लोकांची नावे, बॅंक खात्याची माहिती, राहण्याचे ठिकाण, घरातील लोकांची माहिती, दागिन्यांची व व्यवसाय आणि अन्य मालमत्तेची माहिती घेतात. त्यानंतर त्यांना समाजाची व पोलिसांची भीती दाखविली जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी सतर्क राहायला हवे, बरेच दिवस वापरत नसलेले सोशल मिडियावरील अकाऊंट लगेच बंद करावे. जेणेकरून त्याचा वापर सायबर गुन्हेगार करणार नाही.
-- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर