आज माझ्या क्लिनिकमधे आलेली पेशंट. खाजवण्याचं निमित्त झालं अन ह्या काकूंच्या हातावर ही भलीमोठी जखम झाली. चिघळली आहे. दुर्गंधी येतेय.
तर गोष्ट अशी आहे कि ही काकू डॉक्टरकडं येण्याआधी दोन बुवा बाबा कडं जाऊन आलेली. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर जवळ सानगढी गाव आहे अन त्याला लगतच सासरा नावाचे आणखी एक गांव आहे. त्या गावात बाबागिरी करणारे काही भोंदू (बोगस ) डॉक्टर्स दुकान थाटून बसले आहेत. ते इंजेक्शन्स लावतात, औषधं देतात अन गंडा दोरा पाणी देऊन मंत्र मारतात. एकेका व्यक्तीकडून हजार दोन हजार रुपये घेतात. दिवसभर लोकांची गर्दी असते म्हणतात तिथं.
बरं दोन तीन हजार रुपये खर्च करूनही काकूंची जखम बरी न होता आणखीच चिघळत गेली. तेव्हा घाबरून काकू माझ्याकडं आल्या.
मी जखम स्वच्छ करून antibiotic चे इंजेक्शन लावले. ड्रेसिंग केले. औषधं लिहून दिलीत. काकूंना म्हटलं द्या आता हजार रुपये, तर त्या गालात गोड हसल्या. ह्या हसण्याचा अर्थ असा कि "कशाला मस्करी करता डॉक्टर साहेब?"
मी तशी गंमतच केली म्हणा. माझी दोनशे रुपये फी घेऊन काकूंचं थोडं प्रबोधन करायचा प्रयत्न केला. तिला सांगितलं हे करणी कवटाळ बाहेरचं वगैरे काही नसतं काकू. हे ऐकून त्या काहीच बोलल्या नाहीत परंतु त्या मौनाचा अर्थ असा होता, "तुम्हाला काय कळतं ह्यातलं डॉक्टर साहेब?"
ह्या काकूंचा एकुलता एक मुलगा दारूच्या व्यसनापायी कॅन्सर आजाराने गेला. त्याच्याही आजारपणात ह्यांनी असंच "बाहेरचं" करण्यात वेळ वाया घालवला होता. आता पाच वर्ष झालीत. म्हातारा नवरा कुणाच्या हाताखाली सुतारकाम करतो. तरुण पोरगा मेल्याचं दुःख, त्याची आठवण म्हातारीला व्याकुळ करते, तिला तो स्वप्नात दिसतो म्हणे. ती घाबरते. अन मग भीतीपायी अश्या भोंदू बुवा बाबांकडं जाते.
ती क्लिनिक बाहेर गेली पण माझ्या डोक्यात अनेक प्रश्न पेरून गेली. खरंच ह्या लोकांचं प्रबोधन शक्य आहे का? प्रबोधनाचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. दाभोलकरांसारख्या विद्वान माणसांना समाजाकडून काय मिळालं? अन ह्या भोंदू बाबांना समाज काय देतो? माझ्या सारख्या डॉक्टरला हजार रुपये कमावण्यासाठी पाच ते सात पेशंट बघावे लागतात. तर हे भोंदू बाबा एकेका रुग्णाकडून हजार दोन हजार किंवा त्याहूनही अधिक पैसे घेतात. तरीही त्यांच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात.
आणि सर्वात मोठा प्रश्न, महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा, तसेच देशभरात ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट लागू असतानाही आणि अंनिस सारख्या संस्था ऍक्टिव्ह असतानाही हे भोंदू खुलेआम बाजार मांडून बसले आहेत. ह्यांना कुणाचा धाक कसा नाही?
✍️डॉ. विजय रणदिवे