धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri




🎪लग्न की झटपट श्रीमंत व्हा स्कीम? 🎪

-मुलीचे वडील वय वर्ष 62
-हिशोबणीस म्हणून निवृत्त
-तालुक्याला घर आहे
-त्यावर 11 लाखांचं कर्ज अजून सुरू
-शेती नाही
-मोठी इस्टेट नाही
-मुंबई पुण्यात फ्लॅट नाही
-आई हाऊस वाईफ
-मुलगी बीकॉम पास
-नौकरी करत नाही
-नौकरित फारसं स्वारस्य नाही
-स्वयंपाक येत नाही
-लग्नानंतर नौकरी करेलच याची खात्री नाही

♦️आणि मुलीच्या अपेक्षा -
-मुलाचा पुण्या मुंबईत फ्लॅट असावा
-गावी स्वतःच घर असावं
-स्वतःची शेती असावी
- मुलाकडे स्वतःची गाडी असावी
-मुलाला atleast 15 लाखांचं पॅकेज
-लग्नानंतर काही दिवस घरचे सोबत नको
-मुलीच्या आई वडिलांची जबाबदारी घ्यावी
-लहान बहिणीच्या पण लग्नाची जबाबदारी

या तपशिलासह हे ठिकाण माझ्या मित्रासाठी आलंय. बऱ्याच चर्चेअंती केवळ मुंबईत फ्लॅट नाही म्हणून बोलणी फिस्कटली.  लग्न करताना अपेक्षा ठेवणं बिलकुल गैर नाही. इव्हन मुलीच्या आई वडिलांची जबाबदारी घेणं हे तर दोघांचं कर्तव्य आहे. पण आजकाल लग्न करताना सगळं स्थिर स्थावर कसं मिळणार. लग्न करणं आणि झटपट श्रीमंत होणं यातला फरक आपण विसरत चाललोय का? समान दर्जा हवा असेल तर सगळा भार पुरुषानेच का ओढावा?

संसारतले आर्थिक ताळेबंद ही सुद्धा दोघांची जबाबदारी आहे.
माझ्या जबाबदाऱ्या त्या नवऱ्याच्या,
माझे खर्च ते ही नवऱ्याचे पण नवऱ्याच्या कसल्या liability माझ्या नाहीत.
संपत्ती संचय हा फक्त मुलानेच करावा का?
कर्जाची जबाबदारी त्याने एकट्यानेच घ्यावी का? सगळ्या प्रकरणांमध्ये असच घडतं अस नाही पण बहुतांश आहेत. त्यामुळे वेगळेच प्रश्न तयार होतायत.

- सौरभ कोरटकर






सगळीच स्वप्न वयावर नाही तर काही स्वप्न जिद्दी वर पण अवलंबून असतात..!


~ हर्षवर्धन❤️


















तुझ्याकडं गाडी बंगला असो नसो.
तुझ्याकडं पैसाअडका असो नसो
तुझ्याकडं भारीतले कपडे, मोबाईल असो नसो... तुझं लग्नं झालेलं असो नसो
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस आजन्म राहो... ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. ही तुझी आहे...
तुला आत्मसन्मान शिकवणारी...

#साऊ❤️




Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish




माई,

प्रत्येक मुलीची पाटी कोरी होती, त्यावर अक्षरे गिरवताना तुझ्या पाठीवर मात्र चिंधड्या उडवल्या. तुझ्या अस्तित्वावर बोट उचलले, पण शिक्षणाचे दूध पाजून प्रत्येक मुलीचे आयुष्य तू वाढवले आणि प्रत्येक मुलीच्या आत्मविश्वासाचा पाळणा उंचावला आणि आजही तो उंच जातोच आहे फक्त तुझ्यामुळे...
तू कोण आहेस हे सगळ्यांना ठाऊक आहे पण तू काय केलंस हे मात्र अजूनही अधुरेच...पण एक माई, तू उंचावलेला पाळणा कधी खाली येणार नाही यासाठी प्रयत्न करू आम्ही सगळे मिळून.....

- तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut




*🍁...आयुष्याचा वळणावर...🍁*
          
*✒️पाठीमागे घडलेले सोडून पुढे जाण्याची क्रिया म्हणजे नवीन सुरुवात...गतकाळ विसरून नव्याची सुरूवात करायची आहे आणि याची सुरुवात आपण करतो ते नवीन वर्षापासून आणि पाठीमागे राहीले ते जुने सोडून आपण नवीन वर्षात पदार्पण करतो*
*तसे जुने म्हणता येणार नाही न सांगता आलेली आजवरची सगळी दुःखे पुढच्या वर्षी आपण घेऊन जातोच की*
*म्हणजेच जखम वाळली तरी व्रण राहतोच की*
.*वर्ष नवीन आल्याने कॅलेंडर ची पाने पलटतील पण पण मनाचे पान कसे बदलणार,पण आपण  भूतकाळात का जगा*
*त्या पेक्षा वास्तवात जगूया ना*
*आपण कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच,कोणाला तरी जास्त संधी मिळणारच,कोणीतरी आपल्यापेक्षा सुंदर असणारच कोणाला बदलायचा प्रयत्न करा स्वभाव बदलणार का नाही हे आपण विसरतो आणि मग दुःखी होऊन जातो...त्यापेक्षा इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्यापेक्षा आपल्या स्वाभाविक ध्येयावर व कृतीवर लक्ष्य केंद्रित करावे.आपली परिस्थिती मर्यादा कौशल्ये यांना साजेशी आपली जगण्याची गती ठेवावी अन्यथा इतरांपेक्षा वेगळं आहोत पुढे जाण्याचा नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेतो*
*म्हणून पुढे जाऊन एकटं पडण्यापेक्षा*
*सवगंडयासोबत मागे राहिलेले उत्तम आहे ना ...*
      *आपण आयुष्याचा वळणावर इतरांपेक्षा नक्कीच पुढे जाऊ पण* *योग्य वयात आणि वेळेत करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.आपल्याला काय गरजेचे आहे हे पहिल्यांदा पाहणे गरजेचे आहे गरज व आपली चैन यातला फरक ओळखता आला पाहिजे* *सगळी धावतायेत म्हणून आपण धावण्यात काही अर्थ नाही आपले जगणे चहा सारखं पाहिजे सगळे प्रमाणशीर साखरेसारखे गोड हवे चहा पावडर चा कडूपणा ही हवा आणि दुधासारखा मुलायमपणा ही हवा...नुसतीच साखर झाली तरआणि नुसतीच पावडर टाकली तर ...कधी आयुष्याला मुंग्या लागल्या हे सुद्धा कळणार नाही आणि चहासारखे उकळणे ही पाहिजे बर का नाहीतर आयुष्याला संघर्ष ही कळणार नाही.*
     *एखादे मोठे यश मिळवण्याचा नादात रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण*
*निसटून जाऊ देऊ नका...*
*आईस्क्रीम त्यावेळीच चांगली लागते ज्यावेळी ती वितळलेली नसते नाहीतर डबी सकट फेकून द्यावी लागते म्हणजेच तेव्हाचे क्षण तेव्हाच जगून घ्या..*
*आला दिवस ढकलू नका प्रत्येक क्षण समरूसून जगा.*
*तारूण्यात शक्ती असते वेळ असतो पण पैसा नसतो...पुढे जाऊन शक्ती असते पैसा असतो पण वेळ नसतो.. म्हातारपणात पैसा असतो वेळ असतो पण शक्ती नसते*
*बिल गेट्स यांचे एक वाक्य आहे हरवलेल्या वस्तू गवसतील पण वेळ नाही आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यावर "निरोगी कसं जगावं" हे पुस्तक वाचून काय उपयोग...*
*म्हणून यातील सुवर्णमध्य गाठून समरसून जगा.आपली सकारात्मकता वाखाणली गेली पाहिजे आणि नकारात्मकता टाळली पाहिजे अशा मार्गावर या नवीन वर्षात सुरूवात करूया संकल्प करूया मला कोणाशी स्पर्धा करायची नाही आहे जे माझ्यात उत्तम आहे ते मी करणार आहे.माझ्या कामात मी आनंद निर्माण करणार आहे..माझा कृतीवर लक्ष्य केंद्रित करणार आहे.मी सर्वांसोबत असणार आहे.मग बघा आपण एकटे असणार नाहीत तर आपल्या बरोबर असतील आपले हक्काचे सवंगडी.*
*आयुष्याचा वळणावर एकटं नसाल तर सर्वांसोबत यशाच्या मानवी मनोराच्या उंच अशा शिखरावर असाल आणि तुम्हाला तोलणारे ही आपलेच असतील...मग करता येईल आयुष्याचा वळणावर महोत्सव 😊*

*माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐*

हे वर्षं तुम्हाला आनंद दायी आरोग्यमय जावो ही शुभ कामना
गतवर्षी आपण माझ्यावर असेच प्रेम केलंय
यावर्षी ही असेच माझ्या तुटक्या फुटक्या शब्दावर प्रेम कराल ही भावना व्यक्त करतो...आणि हो माझ्या कडून न कळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील मनापासून क्षमस्व
चला तर मग विसावू आयुष्याचा या वळणावर
🙏🙏🙏


        *@✒️प्रसाद सुतार*
              *
9970820227*

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.