मराठी कविता समूह


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


मायबोली मराठीच्या समृद्धीसाठी....
मराठीतून कविता, चारोळ्या, गझल लिहिण्याची अथवा वाचण्याची आवड असलेल्या मित्रांसाठी....
आपण ही आपल्या स्वलिखित कविता, चारोळ्या मला पाठवू शकता...
आपल्या नावानिशी प्रसिद्ध केल्या जातील....
Admin : @Ni3_Ahirrao 👈 येथे पाठवा.

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri




ये जानेमन जाने जाना
मुझे छोड़ कर जाने से
पहले बस एक अखरी मेरे लिए
काम करने जाना

अपने हातो से खाने में
जहर मिलाकर प्यार से
मुझे बस खाना खिलाकर जाना

✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143








प्रेमात कधी पडल्यावर
प्रियसी आणि प्रियकर या दोघांना
या नात्याचा प्रवास कधी
नकळत अचानक
नवरा बायको नात्यामध्ये
रूपांतर होतो

हेच कळत नाही
मग अहो ऐका ना
बोलण्यापासून सुरुवात
त्याचं बोल ना बायको म्हणणं

तसचं वागण
नवरा म्हणून काळजी करणं
बायको म्हणून जीवापाड प्रेम करणं

कित्येक वर्षे कित्येक महिने
लग्न न करता पणं

नवरा बायको म्हणून
नात जपण टिकवण

एकमेकांच्या हातात हात घेऊन
नवरा बायको म्हणून भविष्याची
स्वप्ने पाहत

काही ही झालं
किती अडचण आली तरी चालेल
घरच्यांचा विरोधात जाऊन
लग्न करायचं झालं तरी चालेल पण
तुझ्या सोबत लग्न करणार

मग ती एकवेळेस जीव देईल
पण बायको /नवरा म्हणून
मरेपर्यंत साथ सोडणार नाही
ते वचन त्या शप्पथ

त्यामध्ये
ऐक दिवस आई बापाच
लग्नसाठी दबाव
आमच्या पसंतीचे
नात्यागोत्याच लग्नं
केलं पाहिजे
ती आई बापाची
जीवे मारण्याची धमकी

मग ते सॉरी बोलण
ते रडणं

त्या प्रियकरास सांगणं
मी आई बाबा विरोधात
नाही जाऊ शकत म्हणणं

क्षणात कित्येक वर्षेच
कित्येक महिने नात तोडण

आईबापाच्या मर्जी लग्न करण
आपला संसार नवीन जोडीदार
सोबत करण

मग त्या प्रियकर मात्र
तिचा दुःखात डिप्रेशन जाणं
तरी ही तिच्या आठवणी
दुःख विसरता विसरता येत नाही

म्हणून शेवटी गळ्याला फास
लावून जीव देणं आणि स्वतःच संपविणे

हिचं मनापासून जीवपड प्रियासीला बायको
समजून खरं प्रेम केल्याची किमंत
मोजावी लागते त्या मुलाला

✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143




हम वह शख्स है
इस प्यार भरी दुनिया में
जो आपके लब्जो से
बेइंतहा मोहब्बत कर बैठे हैं

ये नादान कबखत्त दिल
क्यू अक्सर आपके ही
खयालों में गुम रहता हैं

✍🏻 विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143






ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल
तो क्षणच अनंत - चतुर्दशी !

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव
होतील तीच अनंत - चतुर्दशी !

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा...

थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया...

इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा...

मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद...

जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला...

बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे...

किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख...

पाहुणा आहे ईथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............

( गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या 🙏💐 )




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मनःपूर्वक शुभैच्छा ....

दि.१७.०९.२०२४
!!!!! आजचा षटकार !!!!!
!! मराठवाडा !!

कधी ओला नशिबी तर
कधी चक्क कोरडा असतो
अन् ह्या ना त्या कारणामुळे
सदैव पदरात ओरडा असतो

तरी मराठवाडा कणखर पहा
परिस्तिथी पुढे झुकत नाही
विषय असो कितीही गंभीर
स्वतः कधीच चुकत नाही

रामेश्वर किरडे पाटील
चाटोरीकर




बाप्पा चल निघोची येळ ईली,
अकरा दिस आनंद उत्साह व्हावत हूतो..
आज निघताना पाय जड हुतले,
पण आपलो मुक्काम एव्हढोच हूतो..

होय मूषकराज निघायची तयारी करा,
दर्शनाने आपल्या सारे आनंदित झाले..
भक्तगण माझे जमले इथून तिथून,
सेवा करतो म्हणत राब राब राबले

काय देवा थोडासा राबून सगळ्यांनी रे,
काय काय मागितला तुका काय सांगू..
म्हणतत ना आवळो देवन कोहळो,
ही रीत ह्यांची तुका कशी समजावू..

माहीत नाही का मला मनुष्य प्राणी,
दिलेल्या बुध्दीचा वापर कुठे करावा..
हाती असलेली कला कशी जोपासावी,
याचा जरा ही ह्यांना बोध न व्हावा..

असांदे देवा तू दिलेली बुध्दी वापरतत,
स्मरणात तुझ्या तीच सुबुद्धी व्हावी..
मागितलेल्या मागण्या तू पुऱ्या करतलस,
तरी विश्वप्रार्थनेची त्यांनी कास धरावी..

शुभप्रभाती निरोपाची किरणे उजळली..
शुभेच्छा देताना तुझी मूर्त आठवली..

✍🏻साधे शब्द, विठ्ठल घाडी,मुंबई








*कॉम्रेड सीताराम येचुरी यांना समर्पित*

हा जो देह निस्तेज पडला आहे
त्यानं केलंय स्वतःचं दान
शोध अन् शैक्षणिक उद्देशासाठी

या शरीराच्या
आजूबाजू उभारून
एनॉटमी शिकतील जे

त्यांना माहित असायला हवं की,
प्राण असताना
हे शरीर
भरून राहायचं अक्षय्य ऊर्जेनं

कायम
खेळकर राहिलाय हा चेहरा,
बेरंग ऋतुंमध्ये ही

की,
अतूट प्रतिबद्धता राहिलीय
या शरीराची
गणतांत्रिक सप्नांसाठी

अभ्यासू चिकित्सकानों,
तुम्हाला माहिती हवं की,
याचे जे डोळे आहेत ना
संघर्षाच्या अथक चेतनेने भारलेले होते

अभ्यासू चिकित्सकानों ,
चाकू लावा या शरीराला
पण
जरा आदरानं अन् सन्मानानं
आमच्या काळाच्या
एक महान नेत्यानं
तुम्हाला उजळवण्यासाठी
स्वतःला पेश केलय

- *प्रीती चौधरी*
मराठी अनुवाद- *सुदेश इंगळे*



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.