📌परकीय नागरिकत्व असणारा व्यक्ती भारतात आमदार बनू शकतो???
तेलंगणा उच्च न्यायालयाने भारत राष्ट्र समितीचे माजी आमदार चेन्नमनेनी रमेश यांचे भारतीय नागरिकत्व रद्द केले आहे.
तसेच जर्मनीचे नागरिकत्व लपवून ठेवल्यामुळे आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.
👉 लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे भारतीय नागरिकत्व गमवावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वी. विज रेड्डी म्हणाले की, २००९ पासून चेन्नमनेनी रमेश यांनी केलेल्या कृतीमुळे सामान्य भारतीय नागरिकाचा अधिकार हिरावला गेला. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने चेन्नमनेनी रमेश यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णयही उच्च न्यायालयाने कायम ठेवला.
याचिकाकर्ते व्ही. रोहित आणि काँग्रेसचे आदी श्रीनिवास यांनी याचिकेत सांगितले की, १९९० साली चेन्नमनेनी रमेश जर्मनीत नोकरीसाठी गेले होते. तिथेच त्यांचे लग्न झाले आणि त्यांचे कुटुंबही तिथेच होते. त्यांच्याकडे नैसर्गिक जर्मन नागरिकत्व आहे.
२००९ साली चेन्नमनेनी रमेश हे तेलंगणाच्या वेमुलवाडा येथून निवडून आले तेव्हापासून त्यांनी चारवेळा याठिकाणाहून आमदारकी भूषविली.
२००९ साली चेन्नमनेनी रमेश यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही जर्मन नागरिकत्व आणि पासपोर्ट कायम ठेवला होता.