उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नव्या इमारतीच्या माध्यमातून न्यायदानाचे काम अधिक वेगाने, लोकाभिमुखतेने पार पडणार...
सर्वोच न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूडजी यांच्या शुभहस्ते प्रस्तावित नवीन उच्च न्यायालय संकुलाचे भूमिपूजन, फलकांचे अनावरण आणि ऑनलाईन उदघाटन समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत उपस्थित होतो. यावेळी मान्यवरांना संबोधित केले.
महाराष्ट्रातील न्यायमूर्ती हे देशाचे मुख्य न्यायाधीश असताना त्यांच्या हस्ते मुंबईमध्ये आज इमारतीचे भूमिपूजन होत आहे. गेले 7-8 वर्ष ही इमारत व्हावी, यासाठी अनेक न्यायाधीशांनी पाठपुरावा करुन कामाला गती दिली. न्यायमूर्ती चंद्रचूडजी यांच्या पुढाकारामुळे हे काम अतिशय वेगाने पुढे गेले.
🔸मा. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूडजी यांच्या शुभहस्ते करण्यात आलेले अनावरण आणि उदघाटन
✅फलकांचे अनावरण: नवीन उच्च न्यायालय संकुल आणि मा. न्यायाधीशांसाठी असणारे 'लँड्ज एंड' निवासी संकुल
✅ऑनलाईन उदघाटन: ई-सेवा केंद्रे आणि बॉम्बे डिजिटल कायदा अहवाल (BDLR)
या इमारतीचे काम रेकॉर्डब्रेकरित्या पूर्ण करणार, असे आश्वासन यावेळी दिले.
या जुन्या ऐतिहासिक इमारतीच्या उभारणीला 1862 मध्ये ₹16,44,000 इतका खर्च आला होता. आज या इमारतीकडे पाहिल्यानंतर तिचे स्थापत्य किती समृद्ध होते, हे समजून येते. लोकमान्य टिळक यांचा खटला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रॅक्टिस आणि महात्मा गांधी यांची वकिली अशा अनेक घटनांची ही इमारत साक्षीदार आहे. याच इमारतीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यातून लोकांचे जीवन बदलले आणि अनेक पाथ ब्रेकिंग व्यवस्था निर्माण झाल्या.
देशामध्ये जेवढ्या लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यातील सर्वाधिक विश्वास हा आपल्या न्यायव्यवस्थेवर आहे; पण अलिकडच्या काळात अराजकता पसरवण्याची प्रवृत्ती तयार होत आहेत. अशा प्रवृत्तींशी लढण्याची शक्ती ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात आहे, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मला विश्वास आहे की, पुढील काळात या प्रतिष्ठित इमारतीच्या माध्यमातून न्यायदानाचे काम अधिक वेगाने आणि लोकाभिमुखतेने पार पडेल.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #Mumbai #HighCourt