गुजरा हुआ साल🌿
शेवटचे काही तास शिल्लक आहेत
वर्षभर असंख्य लोकांना भेटलात पण आज थोडावेळ का होईना स्वतःला भेटा.कधीतरी स्वतःला दुखावलंच असेल तर कान पकडा,माफी मागा स्वतःची.वर्षभरात काय मिळवलं हा प्रश्न विचारा स्वतःला उत्तर सकारात्मक आलं तर ठीक आहे आणि नाही आलं तरी ठीक आहे.गेलेल्या वेळेवर बोलण्यात अर्थ काय.माझा संकल्प आणि त्यासाठी केलेल्या शेड्युल वर अजिबात विश्वास नाहीय त्यामुळे असलं काही करण्यापेक्षा नॅचरल वागण्याची शक्ती मागूया ईश्वराकडे. तेवढं केलं तरी आवश्यक गोष्टी आपोआप होत जातात.जे आहे ते वागू, जसं आहोत ते दाखवू.जजलेस होऊन माणसं समजून घेऊ कारण प्रत्येक वर्षी हीच नेमकी चूक करतो आपण.आणि हो फार काही ताण घेऊ नका.माणूस आहोत आपण चूका होणारच. डोळे पुसा आणि आत्ता काय तो नियतीशी करार करा.सकाळी खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशासारखं आयुष्य बहरून काढा.
आरशासमोर उभं राहून आत्मविश्वासाने स्वतःला सांगा.
वो जो था ओ गुजरा हुआ साल था
अब नया साल
मै राजी हु, आप बताओ....
©उद्देश