लडाखमध्ये १४,३०० फूट उंचीवर पेंगाँग सरोवराच्या किनारी भारतीय लष्कराने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.
चीनलगत असलेल्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे.
लेहमधील अत्यंत धाडसी म्हणून ओळख असलेल्या लष्कराच्या १४ व्या तुकडीने म्हटले आहे की, या महान राजाबद्दलचा आदर आणि त्यांनी दिलेला वारसा कायम प्रेरणेचा स्रोत असल्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले.