🛑 समानार्थी शब्द - मराठी व्याकरण 🛑
अरण्य - जंगल, कानन, वन, विपिन, रान, अटवी
आकाश - गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ, योम, ख, अंतरिक्ष, वितान
अश्व - तुरंग, घोडा, वारु, वाजी, हय, तुरंगम
आश्चर्य - अचंबा, नवल, विस्मय
अमृत - सुधा, पीयूष
आहार - खाद्य, भोजन
अनल - अग्ग्री, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर
आठवण - स्मृती, स्मरण
आमूलाग्र - मुळापासून शेंड्यापर्यंत
अभिषेक - अभिषव, अभिशेष
आई - जननी, माय, माऊली, माता, मातोश्री, जन्मदात्री
अभिनय - अंगविक्षेप, हावभाव
अही - सर्प, साप, भुजंग
आकांक्षा - इच्छा
अर्जुन - भारत, पार्थ, धनंजय, किरीट, फाल्गुन
आमरण - मरेपर्यंत
आण - शपथ
अमित - असंख्य, अगणित, अमर्याद
आळशी - कामचुकार, ऐदी, मंद, सुस्त, कुच्चर, निरुद्योगी, उठवळ, उठाळ, उंडगळ, आळसट
अर्थ - भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय
अगत्याने - स्वागतशील दृष्टीने
आस्था - आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य
अभ्यास - व्यासंग, सराव, परिपाठ
ईश्वर - परमेश्वर, प्रभू, देव, अलख, अलक्ष, आनंदघन, ईश
अवहेलना - अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष
अंगना - स्री
अक्षय - न संपणारा
इंद्र - नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणि, सहस्राक्ष
अस्त - मावळणे, शेवट होणे
अभियान - मोहीम
आनंद - संतोष, हर्ष, प्रमोद, तोष, मोद
इंदू - चंद्र, शशी, रजनीनाथ, सुधाकर, सोम
कपाळ - ललाट, कपोल, निढळ, अलिक, भाल
इच्छा - आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आकांक्षा, आरजू
उतारू - प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू
किरण - कर, रश्मी, अंशु, मयुख
उदरनिर्वाह - चरितार्थ
कावळा - काक, वायस, एकाक्ष, काऊ
उंट - उष्टर, उष्ट्र
उपनयन - मुंज
कृष्ण - कन्हैया, मुरलीधर, देवकीपुत्र, वासुदेव, कान्हा, मुरारी, विष्णूचा आठवा अवतार
ऊन - लोकर, ऊर्ण
उत्कर्ष - वाढ, संपन्नता, भरभराट
ऐतोबा - काम न करणारा
क्रीडा - खेळ, मौज, मनोरंजन, क्रीडन, विहार, विलास
अंबर - आकाश, नभ, आभाळ, गगन, अवकाश, अंतरिक्ष, अंतराळ, तारांगण
किंकर - दास, सेवक, भृत्य, अनुचर
खूण - चिन्ह, निशाणी, संकेत
कोकीळ - कोयल, कोकिल, पिक, कोगुळ
खग - पक्षी, द्विज, विहंग, शकुंत.
खल - नीच, दुष्ट, दुर्जन