धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




माझी इच्छा आहे की माझ्या मृत्यूनंतर मित्रांनी माझ्याबद्दल अत्यंत कमी वाच्यता करावी किंवा अजिबातच बोलू नये कारण माणसाची प्रशंसा व्हायला लागते तेव्हा त्याला शिल्पात बंदिस्त केले जाते. अशा मूर्तीस मग लोक उचलून देव्हाऱ्यात बसवितात आणि हे सगळे मानवजातीच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. माझ्या मते, केवळ आणि केवळ माणसाच्या कृत्यांची चिकित्सा व्हावी, मग भले ती प्रशंसा असो वा निंदा ! आणि मग ते कृत्य कोणीही केलेले असो.

सार्वजनिक हितामध्ये भर घालणारे एखादे कृत्य झाले असेल तर खुशाल त्याची स्तुती व्हावी. त्याचवेळी कृत्य जर समाजविघातक असेल, तर त्याची कडक शब्दात निंदा व्हावी आणि ते पुन्हा कधीच होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जावी. माझी इच्छा आहे की कोणत्याही प्रसंगी माझ्या थडग्याजवळ किंवा दूर, कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा धार्मिक मेळावे भरविण्यात येऊ नयेत. मला वाटते, मृत व्यक्तीवर वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष जे जिवंत आहेत, जे गरजू आहेत, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करावे.💙

©️Franscisco Ferrer,💙
Page 190, Cry for Justice by Upton Sinclair.

एका क्रांतिकारकाचे मृत्युपत्र...
शहीद भगतसिंह यांची जेल डायरी....🌾💙




Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram




थोडक्यात पण खर....

कालचा निकाल तसा अनपेक्षित होता, पण काही लोकांसाठीच....

बाकी काही असो, विद्यार्थ्यांना आता वाट बघावी लागणार, आणि वाट बघणाऱ्याला समजते वाट बगण्याचे महत्व....वाट लावणाऱ्याला नाही.....!!

फी वाढेल, परीक्षा लांबेल, रिझल्ट लवकर लागणार नाही, मुलांचे लग्न कधी होईल सांगता येणार नाही. तरुण वर्ग थकून जाईल...

बाकी मुद्दे तर मी मांडलेच नाही..!

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut








प्रत्येक गोष्ट नशिबावर सोडून चालत नसते....

प्रयत्नाने हवं ते खेचून आणता येते...
फक्त जिद्द आणी इच्छा हवी.....!

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut


❤️ रविवार - कवितेचा वार ❤️






जन्म मुलीचा होतच नसतो, जन्म भीतीचा होतो.
ती जपली जाते, जोपासली जाते, वाढवली जाते ,
आणि योग्य वेळ साधून ती दुसऱ्याच्या हाती सोपवली जाते, इतकंच होत असत! 
- स्वाती भगत
पुस्तक पान नं ५२ वरच्या ह्या ओळी वाचल्या, पुस्तक वाचून झालं
ते आजच्या दिवसापर्यंत सतत डोक्यात हे सुरूच आहे, जन्म मुलीचा होतच नसतो, जन्म भीतीचा होतो !
मुलगी म्हणजे काचेचं भांड. बाई, मुलगी म्हणजे घरची लाज मुलगी म्हणजे अस, मुलगी म्हणजे तस, मुलगी म्हणजे अमुक मुलगी म्हणजे तमुक... आणि मुलगी म्हणजे भीती !
तिच्या उठण्या बसण्यावर तिच्या घराण्याचे संस्काराचं ओझं असतं ! अवघड आहे सगळंच !

-पूजा जया






जन्म मुलीचा होतच नसतो, जन्म भीतीचा होतो.
ती जपली जाते, जोपासली जाते, वाढवली जाते,
आणि योग्य वेळ साधून ती दुसऱ्याच्या हाती सोपवली जाते, इतकंच होत असत! 

लेखिका - स्वाती भगत




*अनुभव :* एखाद्या गोष्टीची हवा आणि त्या गोष्टीचा पगडा तात्पुरता असतो. कालांतराने तो नाहीसा होऊन जातो. तरीही काही लोक सतत काही दिवस त्याच माहोल ( zone ) मध्ये राहून एकदम हवेत जातात आणि स्वतःला फार वेगळे समजू लागतात. ते एका वेगळ्याच भ्रमात जगत असतात पण त्यांना कोणी शेरास सव्वाशेर भेटला की मग मात्र त्यांचा भ्रम तुटतो आणि ते जमिनीवर येतात. असा प्रकार आपल्यासोबत अनेकदा घडतो ... चार पाच दिवस गणपतीच्या मिरवणुकीत हवा करून आपण कोणीतरी मोठे आहोत असं आपल्याला वाटतं पण नंतर जाणीव होते नाही हे फार काही मोठं नाही... गावात सरपंच होऊन आपल्याला फार मोठं वाटतं पण गाव सोडून तालुक्याचा सभेला गेल्यानंतर आपण फार काही नाही याची कल्पना येते कारण तिथे ढीग सरपंच असतात,  जेव्हा आपण कोणाला समर्थन करत असतो आणि तो व्यक्ती जिंकतो पुष्कळदा तेव्हाही आपण खूप मोठ्या माणसासोबत आहोत असे आपल्याला वाटते पण कोणी आपल्याच माणसाला छोटे करून विसरून गेले तर आपली हवा त्यासोबत निघून जाते, इन्स्टाग्रामवर कोणता आमदार त्याचे नुसते रील पाहून आपल्याला हवा वाटते पण पुढच्या पाच वर्षांनी तो पडतो मग त्यासोबत आपलीही हवा जिरते अर्थात सांगायचा उद्देश यातून हा की, असं काहीतरी तडफदार , नेतृत्वशाली , विजयी ट्रेंड येत राहतो कधी कोणत्या क्रिकेट खेळाडू चा कधी बिग बॉस चा तर कधी निवडणुकीचा कधी इतर कशाचा आणि या ट्रेंडमध्ये आपण केवळ एक मनोरंजक म्हणून कधी कधी एवढे मगशुल होतो तर होतो पण ते पाहताना आपणही अशी स्वप्ने पाहतो आपल्यालाही आपलं आयुष्य असं असावं वाटतं पण ते वाटणं फक्त तो ट्रेंड सुरू आहे ती हवा सुरू आहे तोपर्यंतच असतं प्रत्यक्षात ना आपण काही करतो ना आपल्याला ते खरंच मिळवायचं असतं किंवा जरी पुढे मिळवळच तरी तिथे पोहचल्यावर मात्र या प्रवासात हवा एक दिवसाची अन अडचण 300 दिवसांची हेच आव्हानात्मक स्वरूप आपल्या लक्षात येते त्यामुळे हे असं ट्रेंड हे असे विजय अशा काहीतरी तडफदार गोष्टी समाजात सुरूच असतात आणि आपण फक्त मला पण असं हवं मला पण तसं हवं करत कायम अस्थिरपणे हे सर्व पाहतो त्यात मगशुल होतो आणि करत काहीच नाही घडत काहीच नाही शेवटी हाती येते ती निराशा त्यामुळे तुम्हाला कोणाची हवा बघून स्वतःची हवा करायची असेल आयुष्यात तर स्वतःवर काम करा स्वतःला काय हवं एकदाच ठरवा आणि त्यावर लक्ष देऊन काम करा उगाच हे पाहिलं ते पाहिलं आज असं वाटलं उद्या तसं वाटलं या गोष्टींमध्ये भरकटुन जाऊ नका मी स्वतः भरकटलेलो होतो म्हणून तुम्हाला सांगतो आहे. बऱ्याच गोष्टींची हवा क्षणिक असते त्यामुळे केवळ ती हवा पाहून त्या क्षेत्रात पडण्यापेक्षा आपल्याला खरंच कोणत्या क्षेत्रात काय करायचे आहे यावर लक्ष दिले तर आपली हवा आपल्या माणसात आपोआप होते काळजी करू नका. कामाला लागा दुसऱ्यांची हवा बघून रमू नका स्वतःची हवा लोक करायला येतील दोन चार का असेनात असे स्वतःला घडवण्यावर असे आयुष्य जगण्यावर भर द्या 🙏❤‍🩹



Показано 20 последних публикаций.