Prabuddha TV


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Религия


हे प्रबुद्ध टीव्हीचे ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल आहे, येथे आपणास, बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ तसेच इतर पोस्ट, फोटो, व्हीडिओ, व व्हीडिओ लिंक येथे पोस्ट केल्या जातात.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Религия
Статистика
Фильтр публикаций


विटंबना होते का!
-- प्रवीण दीपक जामनिक ✍🏻🇮🇳

संविधान केवळ "माझ्याच आंबेडकरांचं" म्हणणं सोड,
आणि "तुझ्याच आंबेडकरांचं" म्हणणं सुरू कर,
मग बघ, विटंबना होते का!

त्या मूर्त्यांतील आंबेडकर सोड,
आणि तुझ्यातील आंबेडकर जागव,
मग बघ, विटंबना होते का!


ढोल-ताशे, DJ आणि मिरवणुकीतील आंबेडकर सोड,
आणि पुस्तकातील आंबेडकर डोक्यात घे,
मग बघ, विटंबना होते का!


उदो-उदो आणि जयघोषातील नावापुरता आंबेडकर सोड,
आणि विचारांत आंबेडकर आण,
मग बघ, विटंबना होते का!


निषेध, धरणे, आणि मोर्चातील आंबेडकर सोड,
आणि सर्वांगीण विकासाच्या कार्यात आंबेडकर आण,
मग बघ, विटंबना होते का!


तुझ्या त्या राग आणणाऱ्या भाषणातील आंबेडकर सोड,
आणि समाजहिताच्या कार्यात कृतीत आंबेडकर आण,
मग बघ, विटंबना होते का!


-- प्रवीण दीपक जामनिक
(संचालक, प्रबुद्ध टिव्ही)


स्पर्धकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना!

सर्व स्पर्धकांना कळविण्यात येते की संविधान गौरव महापरीक्षेची नियोजित तारीख (26 नोव्हेंबर) पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती अनेक स्पर्धकांनी केली आहे, ज्यात (१) सहभागी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते, ज्यांना २६ नोव्हेंबर रोजी सुट्टी मिळणार नव्हती. (२) आपले अनेक स्पर्धक काही काळ निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. तसेच (३) आपले बरेच स्पर्धक विविध ठिकाणी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून काम करत आहेत. अशा कारणांमुळे २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त होणाऱ्या परीक्षेला अडचण होत असल्याची बाब लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

आता आपली परीक्षा 8 डिसेंबर 2024 (रविवार) ला घेण्याचा निर्णय आयोजकांद्वारे घेण्यात आला आहे.

— आयोजक, राज्यस्तरीय संविधान गौरव महापरीक्षा २०२४ ☸️💙🇮🇳


संविधान गौरव महापरीक्षा 2024

अभ्यासक्रमाचे वर्गीकरण

भारतीय संविधान : मूलभूत संकल्पना, प्रस्तावना आणि संविधानाचे भाग 3, 4 आणि 16 (प्रश्न 12)

11वी चे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक (महाराष्ट्र राज्य) (प्रश्न – 5)

● राज्यसभा टिव्ही द्वारा निर्मित "संविधान मालिका" (एकूण 10 भाग) (प्रश्न – 10)

● एबीपी माझा द्वारा निर्मित 'सर्वव्यापी आंबेडकर' या मालिकेतील "घटनाकार आंबेडकर" हा भाग (प्रश्न – 3)

धम्म भारत या संकेतस्थळावरील 10 निवडक लेख (प्रश्न – 6)

मराठी विकिपीडियावरील 'बाबासाहेब आंबेडकर' लेख (प्रश्न – 4)

या परीक्षेत एकूण 40 प्रश्न हे एकूण 200 गुणांसाठी विचारले जातील (प्रत्येकी पाच गुण).






ABP माझा द्वारा निर्मित ‘सर्वव्यापी आंबेडकर‘ या मालिकेतील “घटनाकार आंबेडकर” हा भाग

https://youtu.be/evEFEGmO5fs?si=pbDsmtCxc8IqZIIx


राज्यसभा टिव्ही (आताचे संसद टीव्ही) द्वारा निर्मित “संविधान मालिका”

https://youtube.com/playlist?list=PLVOgwA_DiGzoFR3j1mSGn5Z_OQLxgodQi&si=xoMxRYysLJj3tg6d
Samvidhaan
Samvidhaan: The making of the Constitution of India, is the untold story of how the Constitution of the largest Democratic Republic in the world was created.






नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) ☸️💙

- प्रबुद्ध टीव्ही ☸️


भीमा कोरेगाव येथून प्रबुद्ध टीव्ही लाईव्ह | 2024

#bhimakoregaon #shauryadivas #prabuddhatv #vijayastambha #jaybhim💙 #jaybhim #जयस्तंभ #भीमाकोरेगाव #शौर्य_दिवस #प्रबुद्धटीव्ही #pravinjamnik




डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्य यावर आधारित पुस्तक 'माझी आत्मकथा', लेखक ज. गो. संत


भीमा कोरेगाव येथून प्रबुद्ध टीव्ही लाईव्ह


मनुस्मृती दहन दिवस - स्त्री मुक्ती दिवस


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना कोटी-कोटी नमन!🙏🏻🙏🏻🙏🏻




राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा - 2023☸️💙

उत्तर पत्रिका लिंक👇
https://www.dhammabharat.com/answer-sheet-dhammadnyan-exam/

सदरील माहितीत, मुख्य परीक्षेत आलेले एकूण 50 प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे, तसेच त्या प्रश्नांचे संदर्भ देखील दिलेले आहेत.


- प्रबुद्ध टीव्ही आणि संबोधी टूर्स (आयोजक - राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा - 2023)


राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षेची आज मुख्य परीक्षा!


हे प्रबुद्ध टीव्हीचे ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल असून, येथे आपणास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ तसेच इतर पोस्ट, फोटो, व्हीडिओ, व व्हीडिओ लिंक येथे मिळतील तरी, या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करावे.
लिंक
https://t.me/prabuddhatv

Показано 20 последних публикаций.