● बिरसा मुंडा जयंती- बिरसा मुंडा यांचा जन्म चालकड(आजचे झारखंड )येथे झाला.
- खुणखट्टी जमीनधारण प्रणालीच्या जागी ब्रिटिशांनी जुलमी जमीनदारी प्रणाली आणल्याचा विरोध केला.
- १८९४ मध्ये ब्रिटिश आणि डीकू (बाहेरचे लोक) यांच्याविरुद्ध मुंडा उल्गुलान (बंड) जाहीर केले.
- लोक त्यांना 'धर्ती आबा' (पृथ्वीचे वडील) म्हणून ओळखू लागले.
- १८९९ मध्ये सशस्त्र संघर्ष सुरू केला. पोलीस ठाणी, जमीनदारांचे घरे, चर्च आणि ब्रिटिश मालमत्ता जाळण्यात आली.
- मार्च १९०० मध्ये जामकोपाई जंगल, चक्रधरपूर येथे अटक झाली.
- ९ जून १९०० रोजी ब्रिटिश कोठडीत मृत्यू झाला.
- त्यांच्या बंडामुळे छोटानागपूर भूसंपत्ती कायदा, १९०८ लागू झाला, ज्यामुळे आदिवासी जमिनी बिगर-आदिवासींना हस्तांतरित करण्यास प्रतिबंध आला.
- केंद्र सरकारने त्यांची जयंती "जनजातीय गौरव दिवस" म्हणून घोषित केली.
Join @VJSeStudy | #vaibhavshivade
#PSIROptionalByVaibhavShivade
#MPSC2025 #UPSC2025 #MPSC
#psiroptional #birsamunda