मराठी व्याकरण (Official)™


Channel's geo and language: India, Hindi
Category: Quotes


★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट
➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 30 सराव प्रश्न
💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ अत्यंत महत्वाचे 80,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Quotes
Statistics
Posts filter


"चपळ घोड्याने शर्यत जिंकली - या वाक्यातील विशेषण ओळखा. "
Poll
  •   चपळ घोड्याने
  •   शर्यत जिंकली
  •   चपळ
  •   जिंकली
1 votes


स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Poll
  •   संबंधवाचक
  •   "आत्मवाचक"
  •   पुरुषवाचक
  •   तटस्थ
1 votes


पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे ?(Clerk 2007)
Poll
  •   क
  •   ष
  •   ह
  •   ळ
2 votes


👍 वाक्यप्रचार व त्याचे अर्थ 😄

● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.

● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.

● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.

● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.

● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.

● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.

● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.

● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.

● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.

● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.

● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.

● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.

● दगा देणे : फसवणे.

● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

● दात धरणे : वैर बाळगणे.

● दाढी धरणे : विनवणी करणे.

● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 जॉईन करा https://t.me/SampurnMarathiVyakran


‘मुलांनो तात्काळ बाहेर जा’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Poll
  •   A. स्वार्थ
  •   B. विद्यार्थ
  •   C. आज्ञार्थ
  •   D. संकेतार्थ
1 votes


पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Poll
  •   A. तिने गाणे म्हटले
  •   B. प्रभा भरभर चालते
  •   C. रामाने रावणास मारले
  •   D. अमृता आंबे खाते
2 votes


👍 मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ 🔻

● गय करणे - क्षमा करणे

● न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

● जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

● जीव ओतणे - मन लावून काम करणे

● सुपारी देणे - आमंत्रण देणे

● तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

● डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

● परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

● ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

● कागाळी करणे - तक्रार करणे

● खांदा देणे - मदत करणे

● खोबरे करणे - नाश करणे

📱 जॉईन करा https://t.me/SampurnMarathiVyakran


शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
Poll
  •   संबोधन
  •   करण
  •   अधिकरण
  •   कर्ता
1 votes


खालील वाक्यांचा काळ ओळखा 'वैशाली दरररोज अभ्यास करते'
Poll
  •   साधा वर्तमान काळ
  •   रिती वर्तमान
  •   अपूर्ण वर्तमान
  •   साधा भविष्य
2 votes


पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?
Poll
  •   तुरुंग
  •   ओसरी
  •   दगड
  •   डोंगर
3 votes


तात्काळ या शब्दाला प्रत्यय जोडून तात्कालिक हा शब्द तयार केलेला आहे.
Poll
  •   कर्मणी
  •   भावे
  •   कर्तरी
  •   यापैकी नाही
1 votes


👍 समानार्थी शब्द 🧠

● निफड - गरज, जरूरी, लकडा
 
● निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
● निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
● पंगत - भोजन, रांग, ओळ
 
● पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
● पान - पर्ण, पत्र, दल
 
● परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
● प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
● पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
● पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
● पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
● पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
● प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
● पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
● पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
● पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
● प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
● पाय - चरण, पाऊल, पद
 
● पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
● प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
● प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
● फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
● फट - चीर, खाच, भेग
 
● फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
● फरक - अंतर, भेद


📱 जॉईन करा https://t.me/SampurnMarathiVyakran


गटात न बसणारा वर्ण कोणता?
Poll
  •   अ
  •   इ
  •   ई
  •   उ
2148 votes


'हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे' सतानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती?
Poll
  •   उथळ पाण्याला खळखळाट फार
  •   अर्धी टाकून सगळीला धावणे
  •   दुरून डोंगर साजरे
  •   हजीर तो वजीर
1846 votes


पुढीलपैकी कोणता शब्द ' सामान्यनाम' आहे ?
Poll
  •   1) दांडगाई
  •   2) अरवली
  •   3) आग्यावेताळ
  •   4) आमराई
1752 votes


📚 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द 📚

● अनुकूल x प्रतिकूल

● उत्तीर्ण x अनुत्तीर्ण

● यश x अपयश

● आरंभ x अखेर

● रसिक x अरसिक

● उंच x सखल

● आवक x जावक

● कमाल x किमान

● उच्च x नीच

● आस्तिक x नास्तिक

● अल्पायुषी x दीर्घायुषी

● अर्वाचीन x प्राचीन

● उगवती x मावळती

● अपराधी x निरपराधी

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री


विशेषण ओळखा
Poll
  •   ढगाळ
  •   चांदणे
  •   आकाश
  •   ढग
1628 votes


📚 समानार्थी शब्द

● एकता - ऐक्य, एकी, एकजूट,
● ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
● ओज - तेज, पाणी, बळ 
● ओढ - कल, ताण, आकर्षण 
● ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
● ओळख - माहिती, जामीन, परिचय 
● कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
● कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
● श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
● माधव 
● कपाळ - ललाट, भाल, निढळ 
● कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
● कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
● काक - कावळा, वायस, एकाक्ष 
● किरण - रश्मी, कर, अंशू 
● काळोख - तिमिर, अंधार, तम 
● कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
● करुणा - दया, माया, कणव, कृपा 
● कसब -  कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
● कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
● कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
● कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
● खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
● खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
● खच - गर्दी, दाटी, रास 
● खट्याळ - खोडकर, व्दाड, खट


खालीलपैकीं भाववाचक नाम कोणते?
Poll
  •   नवलाई
  •   पुस्तक
  •   लेखणी
  •   हिमालय
1743 votes


'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यातील उद्देश कोणते?
Poll
  •   गावा
  •   आम्ही
  •   जातो
  •   आमुच्या
1732 votes

20 last posts shown.