केन-बेटवा नदी जोडणारा राष्ट्रीय प्रकल्प
▪️अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्त मध्य प्रदेशातील केन-बेटवा नदी जोडो राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली.
▪️या प्रकल्पांतर्गत केन नदीचे पाणी बेटवा नदीत स्थानांतरित केले जाणार आहे.
▪️या दोन्ही नद्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत.
▪️या प्रकल्पाचे व्यवस्थापन जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय जल विकास संस्था (NWDA) करत आहे.