चालू घडामोडी 2025


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Экономика


Admin : @ChaluGhadamodiAdmin
महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Экономика
Статистика
Фильтр публикаций


आजच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा

◾️पहिलाच वेळ कमी असतो व्यवस्थित पेपर सोडवा
◾️इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवू नका
◾️घड्याळ नक्की न्या
◾️गणित बुद्धिमत्ता शेवटी वेळ राहुद्या
◾️Xerox आणि ओळखपत्र पुन्हा आहे का पहा
◾️black पेन घेऊन जा
◾️गोल व्यवस्थित पाहून करा यात चुकू नका

▪️उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30
▪️प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
▪️परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

तुमचा सर्व अभ्यास झाला आहे फक्त पेपर व्यवस्थित देऊन या 100% Result येईल 🔥✌️

तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा😊 💐💐


🔰 My Strategy: गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024


1)First Sense is Last Sense: स्वतःवर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय सर्वात आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
जास्त डोके लावून सोडवले प्रश्न चुकतात हा माझा अनुभव आहे.


2) Elimination Method काळजीपूर्वक वापरा. बहुपर्यायी व जोड्या लावा इत्यादी प्रश्नात योग्य पर्याय हेरून लवकर उत्तर काढावे.

3) शेवटी गोल करू नका
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या,
ह्यामुळे तुमचे साधारण 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.

4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे प्रश्न Skip करा.

5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

6) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना भीती वाटते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपले प्रेरणास्थान आठवा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

7) Avoid Silly Mistakes:
प्रश्न नीट वाचत चला .
गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा.
चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.

8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांना जमवून गप्पा मारणे टाळा.

9) तुक्के कसे माराल?:
सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏

- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime (Rank 11 th)
ASO 2023(Rank 38)


#Combine पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच तयार असुद्या..🙏

👉 Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या. ब्लॅक & व्हाईट असेल तरी चालेल..
👉ओरिजिनल ID CARD आणी त्याची झेरॉक्स काढून घ्या.
👉 BLACK Pen (2) असावेत.
👉 घड्याळ (Digital नसावे)
👉 पाणी बॉटल.
टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर लवकरच निघा..
महत्वाचे :

◾️ उद्याचा
#Combine पेपर हा Time Management चा विषय आहे..

👉 पहिल्या 35-38 मिनिटांत GS मधील 80 प्रश्न पूर्ण करणे:
पहिले 10 मिनिटे: 22 प्रश्न
20 मिनिटे: 44 प्रश्न
30 मिनिटे: 66 प्रश्न
37 मिनिटे: 80 प्रश्न
Imp : दर 10 मिनीटांनी घड्याळ पाहत average स्पीड maintain करणे महत्त्वाचे आहे.⌚⌚⌚
👉 शेवटचे 22-25 मिनिटे फक्त गणितासाठी ठेवा.
कितीही आत्मविश्वास असेल, तरी पेपरच्या सुरुवातीला गणित सोडवायचे नाही. गणित हा output देणारा विषय आहे. एकदा उत्तर बरोबर लागले की 95-100% output मिळतो.. Attempt 90+ असुद्या.. 🙏

परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐


महिला व बालविकास विभाग

2 Feb 5 PM पासून खालील लिंक वर हॉल तिकीट उपलब्ध होतील

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html




🛒 Amazon ऑफर फक्त आज उद्या 😍पोलीस भरती ग्रंथ - Amazon वर सुद्धा Best seller 🎉

1780 पानांचे पुस्तकं आज फक्त 777 रु.

(43 पैसे प्रति पेज म्हणजे xerox पेक्षा अर्ध्या किमतीत)


🚨 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, विद्यार्थ्यांच्या आवडीचे पुस्तक - पोलीस भरती ग्रंथ

🔔 मुंबईच्या पेपरसह 🔔

👼पोलीस भरती सोडा, MPSC मध्ये सुद्धा एवढे मोठे पुस्तकं नाही.
👼वाचायला सुटसुटीत असल्यामुळे मोठे असूनही कंटाळा येत नाही.
❤️ या पुस्तकाला दुसरा पर्याय नाही.❤️

🚨 यावर्षी पोलीस झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासलेले.🔔

💙पोलीस भरती ग्रंथ - भाग 1❗️ - GK व मराठी - 1064
💙 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता❗️ - 716 पाने
(एकत्रित 1,780 पाने)

💼 दुकानात, अभ्यासिकेत जाऊन पहा.आवडल तरच घ्या.

❗️यापेक्षा दर्जेदार पुस्तक असेल तर ते घ्या.
हे पुस्तक घेण्याचा तसा आग्रह नाही.
❗️

🛒 ऑनलाईन खरेदी link 👇
https://amzn.in/d/ge4nJZv
(35% Discount, 🎁 Delivery)

🤩 पोलीस भरती, 🌳 वनरक्षक यांचे फ्री व पेड कोर्सस*- MPSC व TCS मधून निवडलेले शिक्षक शिकवणार

ऑफर फी - फक्त 400 रु. -🎉

https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app


भारतात आणखी 4 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश

👼सक्करकोट्टई पक्षी 🦩अभयारण्य -तमिळनाडू
👼थेरथंगल पक्षी अभयारण्य 🦢 - तमिळनाडू
👼खेचोपल्री वेटलँड 🪶 - सिक्कीम (पहिलीच) 
👼उधवा तलाव 🐬- झारखंड ( पहिलीच)

या चार पाणथळ जागा आहेत ज्यांना रामसर साइट टॅग मिळाला आहे,

◾️भारतात आता एकूण "89 रामसर स्थळे" झाली आहेत
◾️जागतिक पाणथळ दिवस -2 फेब्रुवारी
◾️सिक्कीम आणि झारखंड यांना पहिल्यांदाच रामसर यादीत स्थान मिळाले आहेत
◾️पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी घोषणा केली
◾️आशियातील सर्वात जास्त रामसर - भारतात
◾️जगात रामसर यादीत भारताचा 3 रा क्रमांक लागतो

🇳🇴UK - 176 रामसर स्थळे
🇲🇽मेक्सिको - 144 रामसर स्थळे
🇮🇳भारत - 89 रामसर स्थळे
➖➖➖➖➖➖➖➖➖
🚫 रामसर बाबत : हे लक्षात ठेवा 🚫
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 रामसर स्थळा बाबत खूपच म्हटवाच्या गोष्टी आहेत सर्व वाचा
📣 रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे
◾️रामसर हे एक इराण देशातील शहर आहे
◾️2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते
◾️भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये यात सामील झाला 🇮🇳

◾️भारतात एकूण 89 रामसर स्थळे आहेत
⭐️तमिळनाडू : 20 रामसर स्थळे
⭐️उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे

◾️भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले ( 2 आहेत)
⭐️चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊
⭐️केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राज्यस्थान)🐆

◾️भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदरबन ( प.बंगाल)
◾️भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल) -0.2 SqKm


🚩 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत 🦌🐬🦩
⭐️नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (2019)🪶
⭐️लोणार सरोवर (2020) 🪶
⭐️ठाणे खाडी(2022) 🐠


आयोगाचा सर्वात आवडता विषय आहे हा , 4 नवीन रामसर ठिकाणे आजच समाविष्ट झालेली आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025 🔥


Budget Highlights 2025-26.pdf
2.7Мб
◾️आर्थिक विवरण पत्रक 2025-2026

◾️प्रमुख वैशिष्ट्ये


◾️महिन्याला 1 लाख उत्पन्न असेल तर कोणताही कर असणार नाही

❗️नवी कर प्रणाली अशी असेल ❗️
◾️0 ते 4 लाख - कर नाही
◾️4 ते 8 लाख - 5% कर असेल
◾️8 ते 12 लाख - 10% कर असेल
◾️12 ते 16 लाख - 15% कर असेल
◾️16 ते 20 लाख - 20% कर
◾️20 ते 24 लाख - 25% कर
◾️24 लाख पुढे - 30% कर असेल


Key Features of Economic Survey 2024-25.pdf
2.7Мб
भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025

➡️ मराठीतून

➡️ राज्यसेवा आणि Combine मुख्य साठी उपयुक्त


🌳 Special वनरक्षक बॅच 🌳

💘 TCS, MPSC मधून निवडलेले शिकवणारी एकमेव बॅच 🤩

➡️ TCS पॅटर्न नुसार 📚
➡️ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व GK विषय
➡️ Live + Recorded video📹
➡️ झालेले व सराव पेपर ⬜️
➡️ प्रश्न विश्लेषण 📝

🤩 कालावधी - 1 वर्षे

💴 Fee 1,000 रु. ( आज 400 रुपये)

😍 ऑफर - 400 रु.

🤩 🏆मार्गदर्शक 🏆.

↗️विठ्ठल बडे (निवड PSI, MPSC 2 वेळा निवड)
↗️ज्ञानेश्वर बांगर (PSI 2 वेळा मुलाखत)
↗️ज्ञानदेव बडे (निवड PSI, TCS 2 वेळा निवड)

🤩 App link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link ↪️
https://wa.me/919158585909


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram


अर्थसंकल्पांचा दशकवेध


#NewsBooster

🤩 महाकुंभ दुर्घटना - समितीची स्थापना
◾️अध्यक्ष - हर्ष कुमार( अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ) + 3 सदस्यीय न्यायिक आयोग आहे.
◾️या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले.


🤩 वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) नवीन महासंचालक (DG) म्हणून पदभार स्वीकारला
◾️1991 च्या बॅचचे आसाम-मेघालय केडर
◾️18 जानेवारी 2025 रोजी या पदावर नियुक्ती झाली
◾️30 नोव्हेंबर 2027 रोजी निवृत्त होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील
◾️ते याअगोदर आसाम चे महासंचालक होते
◾️पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांची सुरक्षा हाताळली.
◾️2013 ते 2019 पर्यंत, ते राष्ट्रीय तपास संस्थेत (NIA) महानिरीक्षक (IG)


🤩 गुजरातने स्वतः चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले
◾️नाव - 'इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी'
◾️गुणेरी गाव - जिल्हा कच्छ
◾️32.78 हेक्टर क्षेत्र 'जैवविविधता हेरिटेज साइट' (BHS) म्हणून घोषित केले आहे
◾️मुख्यमंत्री - भूपेंद्रभाई पटेल
◾️राज्यपाल - आचार्य देवव्रत
◾️विधानसभा जागा - 182 (राज्यसभा - 11 , लोकसभा -26 जागा)


🤩 3 रे विश्व मराठी साहित्य संमेलन उद्घाटन
◾️ठिकाण - फर्ग्युसन कॉलेज (पुणे)
◾️दिनांक - 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (3 दिवस)
◾️उद्घाटन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
◾️तिसरी आवृत्ती


🤩 हे पण एकदा वाचा
◾️डॉ. सदानंद मोरे -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
◾️डॉ. रवींद्र शोभणे - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
◾️लक्ष्मीकांत देशमुख - भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष
◾️डॉ. तारा भवाळकर- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा
◾️उषा तांबे - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा
◾️डॉ. अविनाश आवलगावकर - मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू
◾️किरण कुलकर्णी - मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती
◾️प्रा. रंगनाथ पठारे - मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष
◾️ज्ञानेश्वर मुळे - अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष (सदस्य डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, संजय नहार)

🤩 पहिला साहित्यभूषण पुरस्कार - मंगेश कर्णिक यांना
◾️विश्व मराठी साहित्य संमेलनादरम्यान दिला जाणार आहे
◾️मराठी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
◾️साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार

🤩 आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर जाणारे करणारे पहिले भारतीय अंतराळवीर -  कॅप्टन शुभांशु शुक्ला
◾️शुक्ला यांची NASA आणि ISRO ने Axiom Mission-4 वर जाण्यासाठी निवड झाली आहे
◾️त्यांची मिशन पायलट म्हणून निवड झाली आहे
◾️शुभांशु शुक्ला यांचा जन्म यूपीची राजधानी लखनऊ येथे झाला.
◾️शुभांशु शुक्ला 2006 मध्ये हवाई दलात फायटर पायलट झाले
◾️2019 मध्ये, त्याने रशियातील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीर प्रशिक्षण घेतले.
◾️Axiom-4 च्या क्रूमध्ये चार अंतराळवीरांचा समावेश आहे
◾️शुक्ला हे गगनयान मिशन चा पण भाग आहेत
🥁आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण 💙 वाचून झोपा रे 🎯
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥

24k 0 350 262



Mahatet2024 चा निकाल जाहीर .....💐


लिंक -
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login


47bd294e-cbe5-4b03-933f-45b27236aa41.pdf
47.4Кб
PSI 2023 मुलाखत

उमेदवारांची यादी


MPSC OMR Sheet 2023 C.pdf
1.0Мб
MPSC #OMR Sheet यांची प्रिंट काढून प्रॅक्टिस चालू राहूद्या

कुठे काय भरायचे हे नीट पाहून जा 2 फेब्रुवारी च्या पूर्व परीक्षासाठी..


Economic Survey Complete PDF.pdf
46.2Мб
भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025

जे विद्यार्थी मित्र लगेच परीक्षा देत आहे 2 तारखेची त्यांनी हा करण्याची गरज नाही.


पंचवार्षिक योजना

Save करून घ्या एक प्रश्न Fix असतो

Показано 20 последних публикаций.