जेवलास का? जेवलीस का? या प्रश्नांवर बनलेले काही मिम्स बघितले. थोडी गम्मत वाटली.
एक साधा प्रश्न जो काही पिढ्यांसाठी जिव्हाळ्याचा होता तो अचानक नव्या पिढ्यांसाठी विनोदाचा विषय बनतो, हे बघून विशेष गम्मत वाटली.
भारतात उपाशी झोपण्याचा, इतकेच काय उपासमारीने मरण्याचा मोठा इतिहास आहे. माझे आजोबा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगतांना सांगत की, भुकेचा त्रास होऊ नये म्हणून पोटाला कापड घट्ट बांधून ते बऱ्याच वेळेला झोपायचे. मोठ्या दुष्काळात लहान बाळांना पिठात पाणी टाकून ते दुधासारखे पाजणे इथपासून ते विविध रान वनस्पतींचा पाला नुसता मीठ पाण्यात उकडून खाण्यापर्यंत चे कित्येक किस्से ऐकत लहानाचे मोठे झालो. गावात असतांना दारात आलेल्या पै- पाहुण्याला जेवलास का हा प्रश्न आई हमखास विचारायची. आजही आई कित्येक लोकांना त्यांची बॉडी लाँग्युएज पाहून ओळखते की या व्यक्तीला भूक लागली असेल आणि कित्येक वेळा त्यांना पोटभर खाऊ घालून पाठवते.
वयाच्या १५ व्या वर्षांपासून मला घरापासून दूर राहावे लागले. तेव्हा घरच्यांशी फोनवर बोलणे झाले तर त्यांचा पहिला प्रश्न असायचा, "जेवलास का?". या प्रश्नाचे उत्तर नेहमी "हो" असेच नसायचे. कित्येक वेळा सांगायचो, "आज मेस बंद होती, फक्त केळी खाल्ली, पारले बिस्कीट खाल्ले, आज काहीच खाल्ले नाही.", हे ऐकून आई वडिलांचा मोठा बेचैन पॉज ऐकून लक्षात यायला लागले की आपण जेवलो नाही तर ते लै बेचैन होतात. मग "जेवलास का?" या प्रश्नावर खोटे खोटे "हो" म्हणायची सवय लावून घेतली.
चतुर्थ श्रेणी किंवा त्यापुढच्या कामगारांना सहज हा प्रश्न रँडमली विचारून बघत जा, बऱ्याच वेळेला उत्तर नाही असे येते. झोमॅटो. ऍमेझॉन वगैरे डिलिव्हरी बोईज, वेटर वगैरे लोक कधी जेवतात हे त्यांना सहज विचारून बघा.
हे सगळे सांगतांना "जेवलीस का?" हे मिम्स बघून मी ऑफ़ेन्ड झालोय असे सांगायचे नाहीये. तर मला इतकेच म्हणायचे आहे की, बाळांनो "जेवलीस का?" या पिढ्यानपिढ्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज हसू यावे इतकी प्रगती आपला देश, समाज करतो आहे. याविषयी अभिमान बाळगा. आज तुम्हाला जरी, या प्रश्नावर बनलेला मिम गमतीशीर वाटत असेल, तरीही या स्थितीवर यायला आपल्या आधीच्या पिढ्यांनी काय कष्ट घेतले असतील याचीही जाणीव ठेवूया.
हे मिम्स बंद करू नका, ते बघून कुणी ऑफ़ेन्ड होत असेल तर त्यांना सरळ कोलून टाका. कारण आजच्या पिढीला हा प्रश्न विनोद वाटतो यातच हा प्रश्न सोडवणाऱ्यांचे यश आहे.
मला हे म्हणायचे नाहीये आज भारताने भुकेचा प्रश्न सोडवला आहे, पण या प्रश्नाची तीव्रता मागच्या २-३ दशकात नक्कीच कमी आलीय, असे मला वाटते.
चांगभलं!