*बाप खुर्चीत बसला आणि तेथेच शांत झाला.....धरणी पूजायला गेलेला बाप आपली काया शांत करून गेला...*
*आणि आभाळा एवढ्या बापाला मी क्षणार्धात पोरका झालो...तो कायमचाच..आईचा आवाज आणि बहिणीचा हुंदका...हातातील मडके पाहून माझ्या खांद्यावर बाप जबाबदारी देऊन गेला याची मला जाणीव झाली आणि बाप म्हणजे काय कळायला सुरूवात झाली...मारकुटा बाप आपलासा वाटायला लागला...घरची जबाबदारी सांभाळताना मेटाकुटीला यायचो आणि बापाच्या आठवणीने ढसाढसा रडायचो.*
*बाप गेला तसा शेळ्या विकल्या.आईने एक म्हैस कशीतरी सांभाळली नंतर ती ही विकून टाकली....आज मी माझ्या पायावर उभा आहे पण बाप नसलेली खंत सतत जाणवते.*
*बाप शिव्या देणारा, मारणारा का असेना...पण बाप पाहीजे..आणि बापाला अडाणी समजण्याची हिंमत कुणीच करू नये...कारण आपल्या समजूतदारपणासाठी त्याने अडाणी राहणे पसंद केलेले असते..कारण बाप हा बाप असतो तो आभाळापेक्षा उंच असतो..बाप उमजायला लय अवघड हाय..कारण ज्यावेळी तो कळतो त्यावेळी तो जवळ नसतो..असतानाच काळजी घ्या..नंतर धाय मोकलून रडण्यात काही अर्थ नाही..कधीतरी जवळ जावून मिठी मारून बघा...बापाच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओल्या होतील.*
*बाप हा विषय बोलायला शब्दही अपुरे पडतात...तो बाप असतो..ज्योती वर भाळणारे सगळेच असतात पण जळणाऱ्या तेलाकडे कोण पाहत नाही ही मोठी शोकांतिका आहे..*
*शेवटी माझा बाप म्हणायचा तसेच झाले...बाप गेला आणि मला नोकरी लागली.हा नियतीचा खेळ असेल किंवा बापाची तीव्र इच्छा...पण बाप नसल्याची खंत नक्की जाणवते.कारण आई कोणालाही म्हणू शकतो पण बाप कोणाला म्हणू.*
*शेवटी एवढंच वाटतं बाप जायला नको होता...*
✍️ प्रसाद सुतार
9970820227