मी ज्याच्यावर प्रेम् केल, तो हा नव्हेच....!!
एकदा एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी दगड बघायला एका डोंगरावर गेला. बरेच दगड त्याने बघितले. बऱ्याच वेळानंतर त्याला हवा तसा एक दगड दिसला, तो त्या दगडाच्या दिशेने जाऊ लागला. जसा जवळ गेला तस त्याला दगडाच्या बाजूला एक झाड दिसले. त्या झाडाला सुंदर फुल लागले होते.फुल एवढे सुंदर होते की बगताक्षणी त्याचा मोह व्हावा, अगदी तसेच मूर्तिकाराला झाले. तो दगडाजवळ जाण्याऐवजी त्या फुलाजवळ गेला.तो त्या फुलात एवढा रमला की त्याची नजर दुसरीकडे वळतच नव्हती. बराच वेळ गेल्यानंतर त्याने ते फुल हातात घेतले व घराच्या दिशेने जाऊ लागला. घरी पोहचल्यावर लक्षात आले की आपण ज्यासाठी गेलो ते तर मागेच राहिले. त्याने फुल अलगद बाजूला ठेवले व तो परत डोंगरावर जायला निघाला. डोंगरावर गेल्यावर तो दगड जिथे होता तिथे गेला. बघतो तर काय दगड त्या जागेवर नव्हता. सगळीकडे बघितले पण ते दगड काय त्याला मिळाला नाही. शेवटी उदास होऊन तो घरी परतला.
तात्पर्य : कहाणी मागील उद्देश एवढाच की आपण सुद्धा स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत असतो. वाटेत प्रेम नटून थटून उभ असतंच. मोह शेवटी कोणाला होत नाही? आपणही त्यात अडकतो, आपला बराच वेळ त्यात जातो आणि तोपर्यंत कोणीतरी प्रेमाकडे दुर्लक्ष करून त्या पोस्टपर्यंत पोहचतो आणि ती पोस्ट घेऊनही जातो. आपण मात्र क्षणिक सुखाच्या नादात आपल ध्येयच विसरून जातो.
हे बऱ्याच जनांच्या बाबतीत होत. माझा प्रेमाला विरोध नाही, प्रेम आयुष्यात एकदातरी करावंच. पण कधी ते आपण ठरवून घेतलं पाहिजे. प्रेमात अटी नसल्या तरी मर्यादाची रेघ आपण आखून घेतली पाहिजे. प्रेम आजनतेने होत असले तरी आपण जाणून त्यापासून दूर राहू शकतो.योग्य वयात आणी योग्य वेळी केलेल्या गोष्टीला कोणाचा विरोध नसतोच.. म्हणून आधी आपल्याला महत्वाचे काय ते समजून घेतले पाहिजे आणी त्या दिशेनेचं आपला प्रवास असला पाहिजे. नाहीतर वेळ गेल्यावर म्हणायची वेळ येते,

( मुद्दा छोटासा आहे पण विचार करायला लावणारा आहे. बघा जमलंच तर विचार करा आणी योग्य प्रवासाला वाटचाल करा.....रस्त्यात प्रेम , मोह नटून थटून बसून असतेच .....)
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut