विजयदुर्ग खाडीत बुडवून बनवणार भारताचे पहिले अंडरवॉटर म्युझियम🤑भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आता पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे.
🤑महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ही युद्धनौका ताब्यात घेतली आहे. विजयदुर्ग खाडीत ही नौका बुडवून देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारले जाणार आहे.
🤑आयएनएस गुलदारने ३० डिसेंबर १९८५ पासून नौदलात सेवा बजावली. १२ जानेवारी २०२५ रोजी ४० वर्षांची सेवा पूर्ण करून ही नौका निवृत्त होणार आहे.
🤑 एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, युद्धनौकेला शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल.
🤑पर्यटकांना दोन पद्धतींनी या युद्धनौकेचे दर्शन घेता येणार आहे. प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या मदतीने पाण्याखाली जाऊन नौका पाहता येईल. स्कुबा डायव्हिंगची भीती असणाऱ्यांसाठी एमटीडीसी पाणबुडीची सोय करणार आहे.
🤑विजयदुर्गची निवड अनेक कारणांमुळे करण्यात आली आहे. मराठ्यांच्या काळात १०५ वर्षे हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. येथील वाघवटं खाडी ४२ किलोमीटर लांब आणि ४०-५० मीटर खोल आहे. दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ही खाडी नौकांसाठी सुरक्षित मानली जाते.
🔚🔔
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.🔚🌐
जॉईन करा-
https://t.me/megabharti_75000