आज चारचाकी गाडी घरासमोर रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला पार्क केली होती. आजूबाजूला काही झाडं आहेत. त्यावर किंवा बरेचदा घराच्या कुंपणाच्या भिंतींवरही बरीच माकडं येऊन बसतात. बरेचदा सोबत पिल्लं असतात. ती दंगाही करतात. कळ्या, कोवळा पाला पण खातात. पण त्यांची मस्ती बघायला मजाही वाटतेच.
आज अशीच मस्ती करताना सकाळच्या वेळी एक पिल्लू एका कुत्र्याच्या तावडीत सापडलं. आणि लगोलग कुत्र्याने ते पिल्लू समोर पार्क केलेल्या चारचाकी गाडीखाली नेलं. माकडांनी आक्रमक पवित्रा घेत गाडीला चारो ओरसे घेर लिया. माकडं प्रचंड आक्रमक झाली होती. भिती वाटण्याईतपत. विचित्र भयानक आवाज करून करून बोचकारे घेत त्या कुत्र्याला घाबरवलं. एक मध्यम चणीचं माकड गाडीखाली शिरलं आणि लगेच त्या कुत्र्याला हुसकावून बाहेर काढलं. आणि अक्षरशः त्या कुत्र्याला धरलं, त्याचे लचके तोडायला सुरुवात केली आणि मग आपसूकच त्याच तोंड उघडल्याने ते माकडाचं पिल्लू कुत्र्याच्या तोंडातून सुटलं. आई लगेचच पिल्लाला पोटाशी धरून फाटकाबाजूच्या मोठ्या भिंतीवर येऊन बसली. उरलेल्या लोकांनी त्या कुत्र्याचा यथेच्छ समाचार घेतला. आणि काही कळण्याच्या आतच माकडांचं अख्खं खांडच फाटकाबाजूच्या भिंतीमार्गे गायब झालं. कुत्रा आत्ता चालूही शकत नाहीये. लंगडतोय. अंगावरच्या जखमांनी विव्हळतोय. शॉकमध्ये होता बहुधा फार. पुन्हा कुठल्याच माकडाच्या वाटेला जाणार नाही कुत्रा मरेपर्यंत.
आपल्या बाळासोबत कुणी काही आगळीक केली तर किती भरकन धावून आलीत माकडं.... आणि सगळी आलीत बरं. वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली सगळी धावून आलीत. आणि आपलं बाळ समजून, आपल्यातल एक समजून लढलीत आणि आपला गडी दुसऱ्याच्या तावडीतून यशस्वीपणे सोडवून आणला. नाहीतर आपण माणसं लचके तोडणा-याची, लचके ज्याचे तोडले जाताहेत त्याची जात बघतोय, पुढलं मरेनाका.. ते नंतर पाहू. काय फालतूपणा आहे...
आणि कितीही संताप आला तरी बदलापूरच्या कुत्र्याला हात लावायला कायदा परवानगी नाही ना देत. त्या बाळाचं तडफडणं उघड्या डोळ्यांनी बघायच नुसतं त्याच्या आईवडिलांनी... आणि तोवर कुत्रे जिकडेतिकडे मोकाट फिरणार. काय करायच ? आपण फक्त बातम्यांमध्ये गावांची नावं वाचायची, आपल्या लेकरांचा विचार करून घाबरं व्हायचं, रिपोर्टरला किंवा अजून कुणाला शासनाचा प्रतिनिधी आणखी किती उर्मटपणे बोलू शकतो ते बघायचं आणि हळहळायच. परत दुसऱ्या दिवशी विसरायचं. त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा आहेच नवीन "नाव गाव वस्तू प्राणी"...
आपल्यापेक्षा माकडं पुरलीत... कशाला मरायला उत्क्रांती झाली ती.....
- Sneha Tompe