मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Kitoblar


मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके
इतर अपडेट्स
Promotion: @dappu

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri




Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish


सस्नेह नमस्कार

कळविण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या २० वर्षांपासून फिल्म सोसायटी चळवळीत मोलाचा वाटा असणाऱ्या *‘अभिजात फिल्म सोसायटी’ने पहिल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाची घोषणा केली आहे*, सदरील महोत्सव हा डिसेंबर २०२४ मध्ये होणार असून त्या अनुषंगाने लघुपट स्वीकारण्यास ऑनलाईन पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे, या लघुपट महोत्सवात लघुपट, अनिमेशन, डॉक्युमेंटरी व म्युजिक व्हिडिओ या विभागांचा समावेश करण्यात आला आहे, या प्रत्येक विभागातून निवडलेल्या कलाकृतींना त्या त्या विभागाप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्थानिक कलाकृतींना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्थानिक विशेष विभागाचा समावेशही पारितोषिकांमध्ये करण्यात आला आहे. या महोत्सवात आपल्या कलाकृती समाविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका लिंकचा वापर करावा

👉 अधिकृत वेबसाईट-
www.abhijaatfilms.org/sff-24/

👉 फिल्म फ्री वे -
www.filmfreeway.com/abhijaatshortfilmfestival

या महोत्सवाबाबत किंवा नोंदणीबाबत अधिक माहिती किंवा कोणत्याही मदतीसाठी खालील पर्यायांचा वापर करावा.
👉 ईमेल - abhijaatshortfilmfestival@gmail.com
👉 फोन/व्हॉट्सअप- 9422611264
ट्विटर(एक्स)/ इन्स्टाग्राम/ फेसबुक - Abhijaat Film Society

या महोत्सवाचा जास्तीत जास्त लघुपट निर्मात्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.


प्रा.डॉ.तारा भवाळकर - 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

◾️साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी घोषणा केली.
◾️98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन
▪️ठिकाण : तालकटोरा स्टेडियम (नवी दिल्ली)
▪️दिनांक : 21 ,22 , 23 फेब्रुवारी 2025
▪️6 व्या महिला अध्यक्ष बनल्या
▪️संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे होत आहे.

▪️अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन बाबत :
▪️पहिले संम्मेलन : 1878 न्या. महादेव गोविंद रानडे (पुणे)
▪️महिला अध्यक्ष : कुसुमावती देशपांड , दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे
▪️पहिल्या महिला अध्यक्ष :1961  कुसुमावती देशपांडे


शब्दगंध च्यावतीने साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन -
वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून
https://iyemarathichiyenagari.com/shabdagandh-appeals-to-send-books-for-literary-award/


*युट्युब व्हीडिओज साठी भन्नाट आयडिया*

https://youtu.be/ud7OnVK1Ktk

नेपाळच्या २०-२२ वर्षीय तरुणाने दोन खोल्यात एक मिनी खेडेगाव तयार करून त्यात हे असे छानपैकी व्हीडिओ बनवतो. ह्यातील ट्रक गाड्या वगैरे सर्व वर्किंग मॉडेल्स आहेत.

त्याच्या चॅनलवर २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ह्यात त्याची चांगली कमाई पण होत असणार. आणि अर्थातच त्याची मेहनतसुद्धा तशीच आहे.

पांचट व्हीडिओ बनवण्यापेक्षा , तेच ते कंटेंट कॉपी करण्यापेक्षा, काही हौशी आणि उद्यमी लोकांनी असेही प्रयोग केले पाहिजेत.

त्याच त्या व्हीडिओजला कंटाळला असाल तर
*ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.*


अश्याच नवनवीन आयडिया आणि अपडेट्ससाठी आमचे चॅनल नक्की फॉलो करा. https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k


*नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला*


सोलापूर : सोशल मीडियाद्वारे व व्हॉट्‌सॲपवर साधा कॉल, मोबाईल कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून हिंदी, इंग्रजीत बोलून समाजातील बदनामीची व अटकेची, गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून अनेकांची फसवणूक केली जात आहे. याशिवाय शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून एका महिन्यात २०० ते ३०० पट नफा कमाविण्याचेही आमिष दाखवून फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांकडून भीती दाखविले जाणारे दहा फंडे स्पष्ट केले असून त्यापासून सतर्क राहण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.


सायबर गुन्हेगार सुरवातीला मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे किंवा व्हॉट्‌सॲपवर लिंक पाठवतात. लिंक उघडल्यावर त्यावेळी तुमचा मोबाईल आपोआप सायबर गुन्हेगाराकडून हॅक केला जातो. तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेतली जाते. फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरचॅट, व्हॉट्‌सॲप बऱ्याच दिवसांपासून वापरत नाहीत म्हणजे त्याचे टु स्टेप प्रमाणीकरण (व्हेरिफिकेशन) झालेले नसते. अशी सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक करून त्यातील लोकांचे फोटो एडिट (मॉर्फिंग) करून, अश्लील व्हिडिओ, बदनामीकारक मेसेज आपल्या ओळखीच्या व्यक्तींना पाठविण्याची धमकी दिली जाते. त्यातून समाजात बदनामी होईल, गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखविली जाते. पण, अशा धमक्यांना व आमिषाला कोणीही बळी न पडता तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी, असेही आवाहन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून दाखविली जाणारी भीती...

●तुमचे बनावट सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहे.

●तुमच्या बॅंक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाले आहेत.

●तुमच्याकडून इन्कमटॅक्स नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

●तुम्हाला पोलिस कोणत्याही क्षणी अटक करतील.

●तुमच्या नावावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

●आम्ही क्राईम ब्रॅंच मुंबई- दिल्लीतून तसेच इडी कार्यालयातून बोलत असून तुमच्या नावाने अटक वॉरंट निघाले आहे.

●तुमच्या बॅंक खात्याची चौकशी सुरू होणार आहे किंवा चौकशी सुरू केली आहे.

●तुमच्या बॅंक खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत.

●तुमचे किंवा तुमच्या मुलाचे रेप केसमध्ये नाव आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

●तुमचा मोबाईल क्रमांक पॉर्न व्हिडिओ बनविणाऱ्या ग्रुपमध्ये मिळून आला आहे.

*प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहावे*

विविध प्रकारची भीती दाखवून सायबर गुन्हेगार लोकांची नावे, बॅंक खात्याची माहिती, राहण्याचे ठिकाण, घरातील लोकांची माहिती, दागिन्यांची व व्यवसाय आणि अन्य मालमत्तेची माहिती घेतात. त्यानंतर त्यांना समाजाची व पोलिसांची भीती दाखविली जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी सतर्क राहायला हवे, बरेच दिवस वापरत नसलेले सोशल मिडियावरील अकाऊंट लगेच बंद करावे. जेणेकरून त्याचा वापर सायबर गुन्हेगार करणार नाही.

-- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर


ट्यूशन, शाळांमध्ये रिकाम्या वेळात होणाऱ्या गप्पा, धिंगाणा, एकमेकांची खेचाखेची, उनाडपणाची जागा आज मोबाईलने घेतली आहे.

तिकडे गणेश मंडळात चालणाऱ्या कॅरम, चेस, बैठे खेळ, इत्यादी गोष्टींची जागाही मोबाईलनेच घेतली आहे.

इकडे पालक म्हणतात आमचा मुलगा हूशार आहे ओ पण सध्या त्याला काय झालय माहीत नाही.
कशातच लक्ष नसतं त्याचं.

सध्याच्या मुलांची संभाषण क्षमता तर अक्षरशः कीव यावी अशी झाली आहे.

आपण सगळेच या मोबाईलपायी भयंकराच्या दारात येऊन उभे आहोत.
येणार्‍या काळात खूप काही पाहायला मिळणार आहे.
जितकं दक्ष आणि सजग राहता येईल तितकं राहूयात.
मुलांनाही समजून घेऊयात आणि या मोबाईलचं वेड कमी करण्याचा प्रयत्न करूयात!

- चंप्या


*🤩आधारकार्ड यूजर्सना मोठा दिलासा, आता 'या' तारखेपर्यंत करु शकतात फ्री अपडेट*


▪️यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने 10 वर्ष आणि त्याआधी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांना फ्री अपडेटची सुविधा 14 सप्टेंबर 2024 पर्यंत दिली होती. ही डेडलाइन आज संपत होती. पण अथॉरिटीने आधार अपडेट आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️आता तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत फ्रीमध्ये हे काम करु शकतात. आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत संपल्यानंतर अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI द्वारा निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल. हा खर्च 50 रुपये आहे. यूआयडीएआय द्वारा देण्यात येणारी आधार कार्ड अपडेट करण्याची ही फ्री सर्विस केवळ myAadhaar Portal वर उपलब्ध आहे.

📣 *आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी जॉईन करा* 👉 https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
➖➖➖➖➖➖➖➖➖


दुकानासमोरच आठवडी बाजार भरतो. काल 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील एक शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला घेवडा घेऊन बाजारात विकायला आलेला.
घेवड्याचं पोतं खांद्यावर घेऊन तो दुकानात आला. मला म्हटलं एवढं तुमच्या काट्यावर वजन करून द्या. ते 20 किलो भरलं. मग त्याने तो घेवडा एका पसरलेल्या पोत्यावर ओतला.आज बाजारात गिर्हाईक कमीच होतं. त्याने 10 रु पाव किलो दर काढला. थोड्या वेळाने तिथे बाजारात इतर भाजीपाला विकणारे तिघेजण आले. त्यांनी शेतकऱ्याकडे प्रत्येकी 5 किलो घेवडा मागितला. याने 35 रु किलो दर सांगितला. त्यांनी 30 रू किलोनी त्याच्याकडून घेवडा घेतला. तोही मी आमच्याच काट्यावर वजन करून दिला. प्रत्येकाला 5 किलो. त्यात प्रत्येकाने पाव किलो जादा मागून घेतला. शेतकर्यानेही कोणतीही कुरबुर न करता दिला. त्यांनी तो माल विकून झाल्यावर त्याचे पैसे आणून दिले. या व्यापाऱ्यानी एक रुपयाही पदरचा न गुंतवता पैसा मिळवला. त्या शेतकऱ्याने मात्र जमिनीची नांगरट करून त्यात बिया, खते, औषधं, इतर मजुरांचा खर्च, तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च परत बाजारात बसून विकण्यासाठी घालवलेला वेळ अशी कितीतरी गुंतवणूक केलेली. पण इतके गुंतवून त्याला मिळाले किती? हा खरंच संशोधनाचा विषय आहे.
शेतकऱ्याचा मालही तासा-दोन तासात संपला. त्यानंतर तो माझ्याकडे दुकानात आला अन माझ्याकडे 10 रु दिले. मी विचारलं हे कशाचे? तर म्हणाला मघाशी ती वजनं केली नाहीत का, त्याचे हे पैसे?.... हे ऐकून मी स्तब्धच झालो. मी ते पैसे त्याला परत दिले. त्याच्याशी काय बोलावे हेच कळेना. तरीही त्याला म्हटलं
बिचाऱ्या इतकाही चांगला वागू नको रे या दुनियेत... नाहीतर आयुष्यभर दुसऱ्याची पोटं भरून तू मात्र मरेपर्यंत असाच उपाशी राहशील.

© -संतोष माणकापूरे

#आयुष्याची_शाळा


दोनेक दिवसांपूर्वी इथं पुण्यात कौटुंबिक वादातून बहिणींनीच आपल्या ‘बाहूबली’ भावाला संपवलं..

अश्या घटना कदाचित यापूर्वीही घडल्या असतील पण आता आपल्या कृत्याच्या कबूलीसह त्याचं समर्थनही केलं जातंय..

परवा ‘हॅाटस्पॅाट’ दिलं नाही म्हणून अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीची चक्क हत्या केली कारण काय तर इतकीशी गोष्ट त्या व्यक्तीनं चक्क ऐकली नाही..

हे सगळं असं अचानक झालंय?होतंय? अजिब्बात नाही..

ज्या पद्धतीच्या वातावरणात आपण रहातोय ते सगळं बघता या आणि अश्या घटना केवळ प्रातिनिधीक आणि हिमनगाचं टोक आहेत..

प्रचंड वेगानं बदललेल्या तंत्रज्ञानामुळं सतत उत्तेजना,झटपट समाधान आणि अखंड लक्ष वेधून घेण्याची वृत्ती यामुळं ‘संयम’ नावाची गोष्ट कधीच हरवलीये..

वैयक्तिक महत्वाकांक्षा डोईजड झाल्यानं ‘स्वकेंद्रितपणा’ वाढलाये..

‘चटकन निर्णय पटकन निकाल’ या आधुनिक मंत्रामुळं वाट बघणं-वेळ देणं या गोष्टी कधीच कालबाह्य झाल्यात..

साधं ‘बीग बॅास’ नामक तथाकथित खेळाचं स्वरुप बघा ना..“आरडाओरड म्हणजे आपलं मत मांडणं,भांडण करणं म्हणजे भूमिका घेणं,समोरच्याला अपमानजनक बोलणं म्हणजे व्यक्त होणं,चिडणं म्हणजे आपलं अस्तित्व सिद्ध करणं,शिव्या देणं म्हणजे स्पष्ट बोलणं,हमरीतुमरीवर येणं म्हणजे खेळणं” स्क्रीप्टेड असेल वा नसेल मनोरंजनविश्व हे असं इतकं उथळंय..

“म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो”
या सगळ्यातून अगदी सहजपणे संयमी म्हणजे मंद,
सहनशील म्हणजे भित्रा,मितभाषी म्हणजे बावळट असं चित्र बिंबवलं जातंय..

एका बाजूला विनम्रता-सहनशीलता-औदार्य-दयाभाव या गोष्टींचं अवमूल्यन आणि दुसऱ्या बाजूला उद्धटपणा-उतावीळपणा-स्वार्थी वृत्ती-निर्दयीपणा यांचं उदात्तीकरण आणि विखारी वृत्तीचं सुलभीकरण हे ‘कॅाकटेल’ भयंकर डेडली आहेच पण हे सगळं तर आजुबाजूला घडतंय,आपलं आलबेल चाललंय असं प्रत्येकाला वाटतं हे त्याहून भयंकर आहे !

#ThursdayThoughts
- प्रज्ञावंत




आज चारचाकी गाडी घरासमोर रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला पार्क केली होती. आजूबाजूला काही झाडं आहेत. त्यावर किंवा बरेचदा घराच्या कुंपणाच्या भिंतींवरही बरीच माकडं येऊन बसतात. बरेचदा सोबत पिल्लं असतात. ती दंगाही करतात. कळ्या, कोवळा पाला पण खातात. पण त्यांची मस्ती बघायला मजाही वाटतेच.

आज अशीच मस्ती करताना सकाळच्या वेळी एक पिल्लू एका कुत्र्याच्या तावडीत सापडलं. आणि लगोलग कुत्र्याने ते पिल्लू समोर पार्क केलेल्या चारचाकी गाडीखाली नेलं. माकडांनी आक्रमक पवित्रा घेत गाडीला चारो ओरसे घेर लिया. माकडं प्रचंड आक्रमक झाली होती. भिती वाटण्याईतपत. विचित्र भयानक आवाज करून करून बोचकारे घेत त्या कुत्र्याला घाबरवलं. एक मध्यम चणीचं माकड गाडीखाली शिरलं आणि लगेच त्या कुत्र्याला हुसकावून बाहेर काढलं. आणि अक्षरशः त्या कुत्र्याला धरलं, त्याचे लचके तोडायला सुरुवात केली आणि मग आपसूकच त्याच तोंड उघडल्याने ते माकडाचं पिल्लू कुत्र्याच्या तोंडातून सुटलं. आई लगेचच पिल्लाला पोटाशी धरून फाटकाबाजूच्या मोठ्या भिंतीवर येऊन बसली. उरलेल्या लोकांनी त्या कुत्र्याचा यथेच्छ समाचार घेतला. आणि काही कळण्याच्या आतच माकडांचं अख्खं खांडच फाटकाबाजूच्या भिंतीमार्गे गायब झालं. कुत्रा आत्ता चालूही शकत नाहीये. लंगडतोय. अंगावरच्या जखमांनी विव्हळतोय. शॉकमध्ये होता बहुधा फार. पुन्हा कुठल्याच माकडाच्या वाटेला जाणार नाही कुत्रा मरेपर्यंत.

आपल्या बाळासोबत कुणी काही आगळीक केली तर किती भरकन धावून आलीत माकडं.... आणि सगळी आलीत बरं. वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली सगळी धावून आलीत. आणि आपलं बाळ समजून, आपल्यातल एक समजून लढलीत आणि आपला गडी दुसऱ्याच्या तावडीतून यशस्वीपणे सोडवून आणला. नाहीतर आपण माणसं लचके तोडणा-याची, लचके ज्याचे तोडले जाताहेत त्याची जात बघतोय, पुढलं मरेनाका.. ते नंतर पाहू. काय फालतूपणा आहे...

आणि कितीही संताप आला तरी बदलापूरच्या कुत्र्याला हात लावायला कायदा परवानगी नाही ना देत. त्या बाळाचं तडफडणं उघड्या डोळ्यांनी बघायच नुसतं त्याच्या आईवडिलांनी... आणि तोवर कुत्रे जिकडेतिकडे मोकाट फिरणार. काय करायच ? आपण फक्त बातम्यांमध्ये गावांची नावं वाचायची, आपल्या लेकरांचा विचार करून घाबरं व्हायचं, रिपोर्टरला किंवा अजून कुणाला शासनाचा प्रतिनिधी आणखी किती उर्मटपणे बोलू शकतो ते बघायचं आणि हळहळायच. परत दुसऱ्या दिवशी विसरायचं. त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा आहेच नवीन "नाव गाव वस्तू प्राणी"...

आपल्यापेक्षा माकडं पुरलीत... कशाला मरायला उत्क्रांती झाली ती.....

- Sneha Tompe


कलाकार हवेत :
पुण्यात एका दोन अंकी प्रायोगिक नाटकासाठी साधारण एक पुरुष पात्र व एका स्त्री पात्राची आवश्यकता आहे. पुरुष पात्र साधारण 22 ते 25 व मुलगी 18-20 वर्षाची असावी. तालीम बावधन इथे असेल. तालमीला वेळ देऊ शकणाऱ्या , अभिनयाची जाण असणाऱ्या व शुद्ध भाषा बोलू शकणाऱ्या कलाकारांनी 9822440845 ह्या नंबर वर संपर्क साधावा. धन्यवाद.

२२ - ८ - २०२४
(सोशल मीडियावरुन साभार 🙏)




विधानसभा निवडणूक-2024
मतदार यादीत आपले नाव आजच तपासा
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात सुरु केलेला यावर्षीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मतदान यादीत नाव तपासणे का गरजेचे आहे?

अनेकदा असं दिसतं की नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात. अशावेळी त्यांचे नाव मतदान यादीत न आढळल्यास ते मताधिकाराला मुकतात.

बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदार केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही असे समजून ते मतदानाला मुकतात.

मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलात चुका असतील तर, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक आहे.

या सगळ्यासाठी आपण वेळोवेळी मतदार यादीत आपले नाव तपासले पाहिजे. जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो, तसेच आपल्या वैयक्तिक तपशिलात- पत्त्यात बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करायची गरज असेल तर त्यासाठीचे अर्जही वेळेत भरू शकतो. यामुळे आपण ऐन मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ आणि विलंब टाळू शकतो.

मतदान यादीत नाव कसे तपासावे?
ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक electoralsearch.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा Voter Helpline App.
आपल्याला, आपले वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदार ओळखपत्रासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्युआर कोड या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्युआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरुपातील मतदार यादी उपलब्ध असते. आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाऊनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता.

यासोबतच आपण जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तिथे उपलब्ध असलेल्या मतदारयादीच्या प्रतीतही आपण आपले नाव तपासू शकतो. तेव्हा, त्वरित आपले नाव तपासा आणि आपला मताधिकार सुनिश्चित करा.


आठवत का कुणाला?


लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे.

असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे.
सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील.
त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील.
संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७

(पहिलं वाक्य जिव्हारी लागलं😔)

7.9k 0 20 32 23

ही असते सामाजिक जाणिवेच्या कवितेची आणि तशा कविता लिहिणाऱ्या कवीची ताकद. 🙏


सी ए फाउंडेशनच्या परीक्षा चालू आहेत. येत्या २६ जूनला त्या संपतील. सीए कोर्सच्या तीन परीक्षांपैकी पहिल्या (फाउंडेशन) आणि शेवटच्या (फायनल) परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना पुरेसा वेळ मिळतो. पण मधली परिक्षा म्हणजे 'इंटरमिजिएट' साठी मात्र इनमीन नऊ महिने हाताशी असतात. त्यामुळे इंटरमिजिएट परीक्षा हा सीए कोर्समधील मोठ्ठा बॉटलनेक आहे. सगळ्यात जास्त गळती याच परीक्षेत होते.

इंटरमिजिएट म्हणजे काय? याची तयारी करताना कधीपासून प्लॅनिंग करावे लागते? मुलांना व पालकांना काय काय माहिती असणे आवश्यक असते? याबद्दल बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ असतात. परीक्षा झाल्यावर रिझल्ट लागेपर्यंत अगदी आरामात राहतात. रिझल्ट जर नकारात्मक लागला तर संपूर्ण घर हतोत्साहित होते आणि विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. आणि रिझल्ट जर सकारात्मक लागला तर मग घाईघाईने मित्र सांगतील त्या क्लासला प्रवेश घेऊन, कुठल्याही प्लॅनिंगशिवाय पुढील अभ्यास सुरु होतो. शेवटी परीक्षा जवळ आली की मुलं ढेपाळतात. हे होऊ नये म्हणून माझ्या क्लासमधील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे एक मोफत काउन्सेलिंग सेशन मी दरवर्षी घेतो.

यंदा पालकांच्या आग्रहास्तव ती पद्धत बदलून एकापेक्षा जास्त काउन्सेलिंग सेशन्स आयोजित केली आहेत. यातील काही ऑफलाईन सेशन्स आहेत तर काही ऑनलाईन आहेत. जेणेकरून पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही याचा लाभ घेता येईल.

या मोफत सेशन्सला उपस्थित रहाण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही लिंक https://bit.ly/WhatAfterCAFC किंवा या पोस्टसोबत जोडलेल्या इमेजमधील क्यू आर कोड स्कॅन केला तरी चालेल.

तुमच्या घरात, सोसायटीत, मित्रमंडळीत आणि नातेवाईकांत कुणी सीए फाउंडेशनची परीक्षा देत असेल तर हा मेसेज त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. देशपातळीवर चालणाऱ्या या परीक्षेसाठी भरपूर वेळ, श्रम आणि पैसे खर्च करण्याआधी योग्य प्लॅनिंग करण्यासाठी त्यांना याचा नक्की उपयोग होईल.

शेअर केल्याबद्दल आगाऊ धन्यवाद

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.